Jump to content

साखरआंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साखरांबा या पानावरून पुनर्निर्देशित)

कैरी किंवा आंब्याच्या फोडींना साखरेच्या पाकात मुरवून केलेल्या खाद्यपदार्थास साखरआंबा म्हणतात.


साहित्य

[संपादन]

१वाटी कैरीचा कीस

२ ते ३ वाट्या साखर

१चमचा वेलचीपूड

चमचाभर तूप

५ ते ६ लवंगा

छोटा दालचिनीचा तुकडा

कृती

[संपादन]

कैरीची सालं काढून किसून घ्यावी . कढईत तूप घालून त्यात लवंगा व दालचिनीचा तुकडा घालावा .त्यात कैरी घालून थोडी वाफवावी .नंतर साखर घालून ढवळावे .मिश्रण चांगले शिजवावे .थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळावी .साखरआंबा तयार .