साईलक्ष्मी बालीजेपल्ली
Paediatrician and charity founder | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जानेवारी २५, इ.स. १९७५ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर १६, इ.स. २०२३ | ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
साईलक्ष्मी बालीजेपल्ली (२५ जानेवारी, १९७४ - १६ डिसेंबर, २०२३) ह्या एक भारतीय बालरोगतज्ज्ञ होत्या. त्या बालक आणि माता आरोग्य आणि कल्याण या क्षेत्रात काम करणाऱ्या एकम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक होत्या. याकामासाठी त्यांना भारत सरकार तर्फे २०१४ सालचा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जीवन आणि कारकिर्द
[संपादन]बालीजेपल्लीचे संगोपन भारतातील सिकंदराबाद येथे झाले. त्यांचे शालेय शिक्षण कीज हायस्कूल फॉर गर्ल्स सिकंदराबाद येथे झाले. त्यांचे आई आणि वडील, दोघेही डॉक्टर होते. यामुळे बालीजेपल्ली यांनाही डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यांची मोठी बहीण शारदा त्यांच्यासाठी एक आदर्श होती. शारदा ह्या देखील डॉक्टर असून त्या हृदयरोगतज्ज्ञ आहेत. सेंट फ्रान्सिस कॉलेज फॉर वुमन येथे त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर गांधी मेडिकल कॉलेज मधून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि डॉक्टर आणि शल्यविशारद म्हणून पात्रता मिळवली.[१]
२० जानेवारी २००१ रोजी गुजरातमध्ये भूकंप झाला, ज्यामध्ये २०,००० लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले होते. बालीजेपल्लीची परीक्षा जवळ असतानाही, त्यांनी स्वयंसेवक बनून तेथे वैद्यकीय सेवा दिली. पुढे सात वर्षांनंतर, बिहारमधील पुरामुळे नदीचा मार्ग बदलला आणि मानवी वस्तीत पाणी शिरले. येथे देखील बालीजेपल्लीने पुन्हा स्वयंसेवा दिली.[१]
बालीजेपल्ली ह्या कनिष्ठ सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांना ६० अनाथाश्रमांना कशा प्रकारे वैद्यकीय सेवा द्यायची याची जिम्मेदारी देण्यात आली होती. त्यांनी प्रत्येक अनाथाश्रमाला एक बालरोगतज्ज्ञ जोडला. परंतु कालांतराने ही योजना तितकीशी यशस्वी झाली नाही. नंतर २००९ मध्ये वरील विषयाला धरून एकम फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली.[१]

२०१५ मध्ये बालीजेपल्ली यांना त्यांच्या नेतृत्व आणि कामगिरीसाठी महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. पहिल्या आठ नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांपैकी त्या एक होत्या.[२] हा पुरस्कार जागतिक महिला दिनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रदान केला होता.[३]
२०१८ मध्ये, एकम फाउंडेशनने कांचीपुरम मधील माता आणि मुलांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याच्या उद्देशाने रॉयल एनफील्ड मोटर्स सोबत भागीदारी केली. या फाउंडेशनने चेंगलपट्टू मेडिकल कॉलेजला वैद्यकीय उपकरणे मदत म्हणून दान केली.[४]
बालीजेपल्ली यांचे १६ डिसेंबर २०२३ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी कर्करोगाच्या आजाराने त्यांचे निधन झाले.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c Chandrasekaran, N. (April 2014). Incredible Champions (इंग्रजी भाषेत). PartridgeIndia. pp. 153–160. ISBN 978-1-4828-2213-7.
- ^ "Stree Shakti Puraskar and Nari Shakti Puraskar presented to 6 and 8 Indian women respectively". India Today (इंग्रजी भाषेत). March 9, 2015. 2020-04-22 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Puraskar awardees full list". Best Current Affairs. 9 March 2017. 2020-04-18 रोजी पाहिले.
- ^ "Royal Enfield Partners with NGO EKAM Foundation". Hrdots. 2019-05-15. 2020-04-22 रोजी पाहिले.
- ^ Bureau, The Hindu (2023-12-16). "Dr. Sailakshmi Balijepally, founder of EKAM Foundation, passes away". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-12-16 रोजी पाहिले.