काराकास
| काराकास Caracas |
|||
| व्हेनेझुएला देशाची राजधानी | |||
| |||
| देश | |||
| राज्य | व्हेनेझुएला राजधानी जिल्हा | ||
| स्थापना वर्ष | २५ जुलै इ.स. १५६७ | ||
| क्षेत्रफळ | १,९३० चौ. किमी (७५० चौ. मैल) | ||
| समुद्रसपाटीपासुन उंची | २,९३५ फूट (८९५ मी) | ||
| लोकसंख्या (२००९) | |||
| - शहर | १८,१५,६७९ | ||
| - घनता | १,४३२ /चौ. किमी (३,७१० /चौ. मैल) | ||
| - महानगर | ४१,९६,५१४ | ||
| www.alcaldiamayor.gob.ve | |||
काराकास (स्पॅनिश: Santiago de León de Caracas, सांतियागो दे लिओन दे काराकास; इंग्लिश उच्चारः केरकस) ही दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. काराकास शहर व्हेनेझुएलाच्या उत्तर भागात आन्देस पर्वतरांगेच्या ईशान्येकडील कॅरिबियन समुद्र किनाऱ्याजवळ पसरलेल्या पर्वतराजींमध्ये वसले आहे.
काराकास शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ४१ लाख आहे. काराकास महानगर क्षेत्रामध्ये व्हेनेझुएला राजधानी जिल्हा (काराकास शहर) व मिरांदा राज्यातील चार महानगरपालिकांचा समावेश होतो.
इतिहास
[संपादन]
काराकास खोऱ्यामध्ये स्थानिक लोक अनेक शतके वसले होते. १५६२ साली दक्षिण अमेरिकेत दाखल स्पॅनिश लोकांनी येथे वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक लोकांनी तो हाणून पाडला. ५ वर्षांनंतर २५ जुलै १५६७ रोजी दियेगो दे लोसादा ह्या स्पॅनिश योद्ध्याने तामांको ह्या स्थानिक अदिवासी नेत्याच्या सैन्याला पराभूत केले व सांतियागो दे लिओन दे काराकासची स्थापना केली. १८व्या शतकात येथील कोकोच्या शेतीमुळे काराकासची भरभराट झाली व १७७७ साली काराकासला व्हेनेझुएला स्पॅनिश वसाहतीचे (कापितानिया हेनेराल दि व्हेनेझुएला) राजधानीचे शहर बनवण्यात आले. फ्रांसिस्को दे मिरांदा व सिमोन बॉलिव्हार ह्या काराकासमध्ये जन्मलेल्या क्रांतिकाऱ्यांच्या मदतीने ५ जुलै १८११ रोजी व्हेनेझुएलाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली.
विसाव्या शतकात व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध लागल्यानंतर दक्षिण अमेरिकेचे काराकास हे मोठे आर्थिक केंद्र बनले ज्यामुळे काराकासचा विकास झपाट्याने झाला.
भूगोल
[संपादन]काराकास शहर व्हेनेझुएलाच्या सागरी पर्वतरांगेच्या खोऱ्यात वसले आहे. कॅरिबियन समुद्र जवळ असून देखील काराकासची समुद्रसपाटीपासूनची साधारण उंची २,८५४ - ३४२२ फूट इतकी आहे. काराकास खोरे अतिशय उंचसखल असल्यामुळे शहराची वाढ भौगोलिक रचनेला अनुसरून झाली आहे.
हवामान
[संपादन]क्योपेन हवामान वर्गीकरणानुसार काराकासचे हवामान उष्णकटिबंधी असून येथे वर्षाकाठी ९०० ते १,३०० मिमी पाउस पडतो. उंचावर वसले असल्यामुळे काराकासमधील तापमान ह्या भागातील इतर स्थानांपेक्षा सौम्य असते.
| काराकास साठी हवामान तपशील | |||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
| विक्रमी कमाल °से (°फॅ) | 32 (90) |
35 (95) |
35 (95) |
37 (99) |
36 (97) |
35 (95) |
37 (99) |
36 (97) |
36 (97) |
33 (91) |
32 (90) |
32 (90) |
37 (99) |
| सरासरी कमाल °से (°फॅ) | 29.0 (84.2) |
31.0 (87.8) |
31.7 (89.1) |
31.1 (88) |
31.8 (89.2) |
30.3 (86.5) |
31.0 (87.8) |
29.3 (84.7) |
30.1 (86.2) |
29.7 (85.5) |
29.6 (85.3) |
28.4 (83.1) |
30.3 (86.5) |
| दैनंदिन °से (°फॅ) | 21.1 (70) |
22.8 (73) |
23.5 (74.3) |
23.7 (74.7) |
25.0 (77) |
24.2 (75.6) |
24.0 (75.2) |
23.0 (73.4) |
23.5 (74.3) |
23.1 (73.6) |
22.7 (72.9) |
21.3 (70.3) |
23.1 (73.6) |
| सरासरी किमान °से (°फॅ) | 13.1 (55.6) |
14.5 (58.1) |
15.3 (59.5) |
16.2 (61.2) |
18.2 (64.8) |
18.1 (64.6) |
16.9 (62.4) |
16.6 (61.9) |
16.8 (62.2) |
16.4 (61.5) |
15.7 (60.3) |
14.2 (57.6) |
16.0 (60.8) |
| विक्रमी किमान °से (°फॅ) | 8 (46) |
8 (46) |
7 (45) |
11 (52) |
11 (52) |
12 (54) |
11 (52) |
12 (54) |
12 (54) |
12 (54) |
11 (52) |
7 (45) |
7 (45) |
| सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 15.3 (0.602) |
13.2 (0.52) |
11.4 (0.449) |
59.2 (2.331) |
81.7 (3.217) |
134.1 (5.28) |
118.4 (4.661) |
123.8 (4.874) |
115.4 (4.543) |
126.3 (4.972) |
72.6 (2.858) |
41.4 (1.63) |
912.8 (35.937) |
| सरासरी पर्जन्य दिवस | 6 | 4 | 3 | 7 | 13 | 19 | 19 | 18 | 15 | 15 | 13 | 10 | 142 |
| स्रोत #1: World Meteorological Organisation (UN) [१] | |||||||||||||
| स्रोत #2: weather.com[२] | |||||||||||||
लोकवस्ती
[संपादन]
काराकासमधील वस्ती शहराच्या स्थापनेपासून बहुवंशीय, बहुसांस्कृतिक आहे. २०११मध्ये मध्यवर्ती काराकास शहराची (दिस्त्रितो कापिताल) वस्ती सुमारे १९ लाख होती.[३] तर महानगरात २९ लाखांपेक्ष अधिक लोक राहत होते. २०२५मध्ये ही संख्या ३० लाखावर गेल्याचा अंदाज आहे.[४]
येथील बव्हंश लोक एकाधिक वंशाचे असून त्यांत युरोपीय, मूळचे स्थानिक रहिवासी, आफ्रिकी आणि आशियाई वंशाचे लोक आहेत.
संस्कृती
[संपादन]
काराकास व्हेनेझुएलाचे सांस्कृतिक केन्द्र आहे. येथे अनेक नाट्यगृहे, संग्रहालये आणि इतर संस्था आहेत. येथे स्पेन, इटली, पोर्तुगाल, मध्यपूर्व, जर्मनी, चीन आणि इतर अनेक देशांतून आलेल्या लोकांनी आपल्या संस्कृतीतील काही भाग येथे आणले व ते काराकासमध्ये सामावले गेले.[५][६][७][८]
शिक्षण
[संपादन]काराकास हे व्हेनेझुएलातील उच्चशिक्षणाचे मुख्य केन्द्र आहे. येथे अनेक विद्यापीठे आणि उच्चशिक्षणसंस्था आहेत.
विद्यापीठे
[संपादन]उनिव्हर्सिदाद सेंत्राल दि व्हेनेझुएला
[संपादन]व्हेनेझुएलाचे मध्यवर्ती विद्यापीठ (उनिव्हर्सिदाद सेंत्राल दि व्हेनेझुएला) सार्वजिनिक विद्यापीठ आहे. १७२१मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ व्हेनेझुएलातील सगळ्यात जुने आहे.[९] याचे काराकासमधील आवार कार्लोस राउल व्हियानुएव्हाने रचले आहे. याला २००० साली युनेस्को जागतिक वारसास्थान घोषित केले गेले.[१०]
उनिव्हर्सिदाद सिमोन बोलिव्हार
[संपादन]
उनिव्हर्सिदाद सिमोन बोलिव्हार (सिमोन बोलिव्हार विद्यापीठ) हे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देणारे विद्यापीठ आहे.
इतर विद्यापीठे
[संपादन]- उनिव्हर्सिदाद मिलितार बोलिव्हारियाना दि व्हेनेझुएला (व्हेनेझुएलाचे बोलिव्हारी लश्करी विद्यापीठ, मुख्य आवार)
- उनिव्हर्सिदाद कॅतोलिका आंद्रेस बेलो
- उनिव्हर्सिदाद नॅसियोनाल एक्सपेरिमेंताल दि ला ग्रान काराकास (बृहद् काराकासचे राष्ट्रीय प्रायोगिक विद्यापीठ)
- उनिव्हर्सिदाद मेत्रोपोलिताना
- उनिव्हर्सिदाद नॅसियोनाल एक्सपेरिमेंताल दि ला आर्तेस[११] (राष्ट्रीय कला प्रायोगिक विद्यापीठ)
- उनिव्हर्सिदाद माँतेआव्हिला
- उनिव्हर्सिदाद नुएव्हा एस्पार्ता
- उनिव्हर्सिदाद सांता मरिया काराकास
- उनिव्हर्सिदाद अलेहांद्रो दि उंबोल्ट
- उनिव्हर्सिदाद नॅसियोनाल एक्सपेरिमेंताल दि ला फुएर्झास आर्मादास (राष्ट्रीय सैन्यदल प्रायोगिक विद्यापीठ)
- उनिव्हर्सिदाद नॅसियोनाल एक्सपेरिमेंताल सिमोन रॉद्रिगेझ
- उनिव्हर्सिदाद बोलिव्हारियाना दि व्हेनेझुएला
- उनिव्हर्सिदाद होजे मरिया व्हार्गास
- उनिव्हर्सिदाद पेदागोजिका एक्सपेरिमेंताल लिबेर्तादोर
- उनिव्हर्सिदाद एक्सपेरिमेंताल पोलितेक्निका आँतोनियो होजे दि सुक्रे
अर्थतंत्र
[संपादन]
काराकासची अर्थव्यवस्था सेवाकेंद्रित आहे. येथे अनेक बँका, मॉल आणि इतर ग्राहकसेवक कंपन्या आहेत. महानगरात काही प्रमाणात अवजड उद्योगही आहेत. काराकास समभाग बाजार येथे स्थित आहे. पेत्रोलेओस दि व्हेनेझुएला या देशातील खनिज तेलाच्या साठ्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे मुख्यालय येथे आहे.[१२] पेत्रोलिओस ही देशातील सगळ्यात मोठी कंपनी आहे.[१३] बंद पडण्यापूर्वी व्हियासा ही विमानवाहतूक कंपनीचे मुख्यालय येथे होते.[१४][१५]
जुळी शहरे
[संपादन]काराकासचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "World Weather Information Service - Caracas". 2012-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-31 रोजी पाहिले.
- ^ "Average Weather for Caracas, * - Temperature and Precipitation". weather.com. 8 June 2007 रोजी पाहिले.
- ^ "Archived copy" (PDF). 9 October 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 30 April 2010 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Caracas Population 2025". World Population Review (इंग्रजी भाषेत). 21 November 2025. 23 November 2025 रोजी पाहिले.
- ^ Ingham, James (20 April 2007). "Americas | Airships to tackle Caracas crime". BBC News. 28 September 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2009 रोजी पाहिले.
- ^ "Venezuela". Travel.state.gov. 11 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 July 2009 रोजी पाहिले.
- ^ "Venezuela Warnings or Dangers – Travel Guide". VirtualTourist.com. 3 May 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 July 2009 रोजी पाहिले.
- ^ Feinman, Sacha (27 November 2006). "Crime and class in Caracas". Slate. 3 June 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 July 2009 रोजी पाहिले.
- ^ Abner J. Colmenares, "Urban and Real Estate Development of the Central University of Venezuela's Rental Zone", in Wim Wiewel and David C. Perry, eds., Global Universities and Urban Development: Case Studies and Analysis (Armonk NY: M.E. Sharpe, 2008), 181. आयएसबीएन 9780765638922
- ^ "Ciudad Universitaria de Caracas". UNESCO World Heritage Centre (इंग्रजी भाषेत). Unesco. 25 March 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "UNEARTE". Universidad Nacional Experimental de las Artes. 28 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 August 2022 रोजी पाहिले.
- ^ "Sitio Web PDVSA". Pdvsa.com. 18 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 June 2010 रोजी पाहिले.
- ^ "Petróleos de Venezuela S.A." PDVSA. 14 January 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 June 2010 रोजी पाहिले.
- ^ "World Airline Directory". Flight International. 30 March 1985. p. 130. 8 December 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 June 2009 रोजी पाहिले.
- ^ "World Airline Directory". Flight International. 26 March 1988. p. 125. 12 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित..
- ^ "Sister Cities of Istanbul". 2009-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 July 2009 रोजी पाहिले.
- ^ Erdem, Selim Efe (1 July 2009). "İstanbul'a 49 kardeş" (Turkish भाषेत). Radikal. 22 July 2009 रोजी पाहिले.
49 sister cities in 2003
CS1 maint: unrecognized language (link) - ^ Madrid city council webpage "Mapa Mundi de las ciudades hermanadas" Check
|दुवा=value (सहाय्य). Ayuntamiento de Madrid. 22 July 2009 रोजी पाहिले.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2018-09-18 at the वेबॅक मशीन.
विकिव्हॉयेज वरील काराकास पर्यटन गाईड (इंग्रजी)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |


