Jump to content

सांगूले लामिझाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगूले लामिझाना
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वRepublic of Upper Volta, बर्किना फासो संपादन
स्थानिक भाषेतील नावAboubacar Sangoulé Lamizana संपादन
दिलेले नावAboubacar, Sangoulé संपादन
जन्म तारीख३१ जानेवारी 1916 संपादन
जन्मस्थानDianra संपादन
मृत्यू तारीख२६ मे 2005 संपादन
मृत्यूस्थानवागाडुगू संपादन
अपत्यMariam Lamizana संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाफ्रेंच भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, statesperson संपादन
पदpresident of Burkina Faso, Prime Minister of Burkina Faso, Minister of Foreign Affairs of Burkina Faso संपादन
Candidacy in election1978 Upper Voltan presidential election संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन

अबुबाकर सांगुले लामिझाना (३१ जानेवारी, १९१६:दिआंत्रा, बर्किना फासो – २६ मे, २००५) हे अप्पर व्होल्टाचे (१९८४ पासून बुर्किना फासो) एक लष्करी अधिकारी आणि राष्ट्राध्यक्ष होते. ते ३ जानेवारी १९६६ ते २५ नोव्हेंबर १९८० या काळात सत्तेत होते. त्यांनी ८ फेब्रुवारी १९७४ ते ७ जुलै १९७८ या काळात पंतप्रधान पदावर काम केले होते.[१][२]

चरित्र

[संपादन]

लामिझाना यांचा जन्म ३१ जानेवारी १९१६ रोजी दिआंत्रा येथे झाला.[३] १९६० मध्ये अप्पर व्होल्टा फ्रांसपासून पूर्णपणे स्वतंत्र झाल्यानंतर तेथील राजकीय पक्ष एकतर सत्ताधारी युनियन डेमोक्रॅटिक व्होल्टेइक (UDV) मध्ये विलीन झाले किंवा त्यांवर बंदी घालण्यात आली. यामुळे अप्पर व्होल्टा हा मॉरिस यामेओगो यांच्या नेतृत्वाखालील एकपक्षीय देश झाला. यामेओगो यांच्या एकपक्षीय राजवटीविरुद्ध विद्यार्थ्यांचे संप आणि मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. ३ जानेवारी १९६६ रोजी झालेल्या सार्वत्रिक संप आणि लष्करी बंडांनंतर यामेओगो यांना राजीनामा द्यावा लागला आणि सत्ता जनरल सांगुले लामिझाना यांच्याकडे सोपवण्यात आली.[४][५]

लामिझाना यांनी १४ जून १९७० रोजी नवीन राज्यघटना लागू होईपर्यंत "तात्पुरत्या लष्करी सरकार"चे प्रमुख म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी १९६६ ते १९६७ दरम्यान परराष्ट्र मंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली.

१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला पडलेल्या पाच वर्षांच्या दुष्काळामुळे आणि साहेल प्रदेशातील वाळवंटीकरणामुळे अप्पर व्होल्टामध्ये भीषण संकटाचे सावट निर्माण झाले. यामुळे जेरार्ड कांगो ओएद्रागो यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गटबाजी वाढली. पुन्हा एकदा लष्करी हस्तक्षेप करून लामिझाना यांनी सत्ता हाती घेतली आणि ते हुकूमशहा झाले.

लामिझाना यांच्या सत्तेला आंतरराष्ट्रीय मान्यता होती आणि त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची भेट घेतली होती. १५ ऑक्टोबर १९७३ रोजी लामिझाना यांनी निक्सन यांची भेट घेऊन साहेल प्रदेशातील दुष्काळाबद्दल माहिती दिली होती.

१९७७ मध्ये सार्वमताद्वारे नवीन राज्यघटना मंजूर करण्यात आली आणि १९७८ मध्ये लामिझाना यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. ही निवडणूक पश्चिम आफ्रिकेतील सर्वात लोकशाहीवादी निवडणुकींपैकी एक मानली जाते. लामिझाना यांनी व्यापारउद्योगांना समर्थन देण्याचे धोरण अवलंबिले होते.

नोव्हेंबर १९८० मध्ये, कामगार संघटना आणि नागरी गटांच्या पाठिंब्याने कर्नल सये झर्बो यांनी लष्करी बंड करून लामिझाना यांची सत्ता उलथून टाकली.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Burkina Faso - Visits by Foreign Leaders - Department History - Office of the Historian". history.state.gov. 26 April 2018 रोजी पाहिले.
  2. ↑ "Aboubacar Sangoulé Lamizana". Larousse.fr (फ्रेंच भाषेत).
  3. ↑ "Sangoulé Lamizana - Wikipédia". fr.wikipedia.org (फ्रेंच भाषेत).
  4. ↑ "Economic History of Burkina Faso". sjsu.edu. 2024-10-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-09-01 रोजी पाहिले.
  5. ↑ "Sangoulé Lamizana : un héritage gravé dans la pierre et les mémoires". AIB.media (फ्रेंच भाषेत). 5 May 2025.

बाह्य दुवे

[संपादन]