सहा ऋतू व त्यांचे मराठी महिने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to searchBroom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


संकल्पना[संपादन]

ऋतू या शब्दाची व्याख्या-सौरं मासद्वयं राम ऋतुरित्यभिधीयते | हे रामा,सौर मासद्वयाला ऋतू असे म्हणतात असे पुरुषार्थ चिन्तामणि ग्रंथात सांगिले आहे. ऋतू हे सूर्याच्या गतीवर अवलंबून असतात .सध्या आपण चैत्र-वैशाख=वसंत ऋतू अशी गणना करीत असलो तरी ऋतू हे चंद्रमासावर अवलंबून नसून ते सौरमासावर म्हणजे सूर्य संक्रांतीवर अवलंबून असतात.[१]

प्राचीन साहित्यात[संपादन]

मुखं वा एतत् ऋतूनां यद् वसन्त:-वसंत हे ऋतूंचे मुख होय असे तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथात सांगितले आहे.गीतेमध्ये ऋत्तूनां कुसुमाकर:(ऋतूंमध्ये मी वसंत आहे) असे श्रीकृष्ण म्हणतात.

तैत्तिरीय ब्राह्मण या ग्रंथात सांगितले आहे की तस्य ते वसन्त: शिर:| ग्रीष्मो दक्षिण: पक्ष:| वर्षा: पुच्छम्|शरद उत्तर: पक्ष:| हेमन्तो मध्यम्| म्हणजे वसंत हे संवत्सररूपी पक्ष्याचे मस्तक, ग्रीष्म उजवा पंख, वर्षा हे शेपूट, शरद डावा पंख, व हेमंत मध्य होय.

वर्षातल्या तीन ऋतूंच्या प्रारंभी तीन यज्ञ करण्याची बुद्धपूर्व भारतीयांची चाल होती. पुढे बुद्धाने थोडासा फरक करून तीच कल्पना स्वीकारली. वर्षाचे विविध हंगाम अशा अर्थी ऋतू हा शब्द ऋग्वेदात आला आहे पण तिथे तीनच ऋतूंचा उल्लेख आढळतो. चार महिन्यांचा एक ऋतू अशी त्यांची योजना आहे. वसंत, ग्रीष्म, शरद हे ते तीन ऋतू होत. [२] महाकवी कालिदासाचे ऋतुसंहार हे संस्कृत काव्य प्रसिद्ध आहे.

सहा ऋतू व त्यांचे प्रचलित मान्यता असलेले चांद्र महिने[संपादन]

सहा ऋतूचीं माहिती :-

- वसंत : चैत्र, वैशाख.उन्हाळा

- ग्रीष्म : ज्येष्ठ, आषाढ.उन्हाळा

- वर्षा: श्रावण, भाद्रपद.पावसाळा

- शरद : आश्विन, कार्तिक.पावसाळा

- हेमंत : मार्गशीर्ष, पौष.हिवाळा

-शिशिर : माघ, फाल्गुन.हिवाळा

महिने आणि ऋतू यांच्या समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात.

वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा ,वसंत पंचमी ही व्रते साजरी होतात.

ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात.

वर्षा ऋतूत नारळी पौर्णमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.

शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.

हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती ,मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.

शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.

चित्रदालन[संपादन]

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला