समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

समर्थ रामदासांनी लिहिलेली खंडेरायाची आरती

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।

खंडामंडित दंडितदानव अवलीळा ।

मणिमल्लां मर्दुनियां जो धूसर पिवळा ।

हिरे कंकणें बाशिंगें सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी ।

वारीं दुर्जन‍असुरां भव दुस्तर तारीं ॥ ध्रु० ॥

सुरवरसंवर वर दे मजलागीं देवा ।

नाना नामें गाइन ही तुमची सेवा ।

अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।

फणिवर शिणला तो किति, नर पामर केवा ॥ जय देव० ॥ २ ॥

रघुवरस्मरणीं शंकर हृदयिं निवाला ।

तो हा मल्लांतक अवतार झाला ।

यालागीं आवडें भावें वर्णीला ।

रामीं रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव० ॥ ३ ॥

-समर्थ रामदास