मसुदा:समतोल आहार
Appearance
(समतोल आहार या पानावरून पुनर्निर्देशित)
समतोल आहार म्हणजे असा आहार, जो आरोग्य टिकवून ठेवण्यास किंवा त्यात सुधारणा करण्यास मदत करतो. लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका टाळण्यामध्ये याची महत्त्वाची भूमिका असते.[1] समतोल आहारामध्ये सर्व पोषकतत्त्वे आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असावा. पोषकतत्त्वे अनेक प्रकारच्या अन्नातून मिळत असतात; म्हणूनच, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेला आहार हाच समतोल आहार' मानला जातो.