Jump to content

सप्त शिखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सप्त शिखर हे पारंपारिक सात खंडांवर असलेले सर्वात उंच पर्वत आहेत. ३० एप्रिल १९८५ रोजी, रिचर्ड बास हे सातही शिखरांवर पोहोचणारे पहिले गिर्यारोहक ठरले आहेत.[]

अमेरिकेतून प्रसिद्ध होणारे क्लाइंबिंग नावाचे मासिक आहे. हे फक्त गिर्यारोहनासाठी वाहून घेतलेले मासिक असून, त्यात जानेवारी २०२३ मध्ये असे म्हटले की, "आज, सप्त शिखर हे प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखराच्या तुलनेने सामान्य - बाब झाली आहे"[] आणि "सात शिखर" च्या टोकावर पोहोचणे आता गिर्यारोहकांमध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात नसली तरी, मोहीम चढाई तंत्रांचा वापर करून "साहसी गिर्यारोहकांसाठी" आजही हे एक लोकप्रिय आव्हान आहे.

व्याख्या

[संपादन]

या सप्त शिखरांमध्ये प्रत्येक खंडातील सर्वात उंच पर्वत शिखरांचा समावेश करण्यात आलेला आहे. या शिखरांच्या वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध असल्या तरी या यादींमध्ये सामान्यतः समान गाभा राखन्यात आला आहे. सप्त शिखर हे खंडासाठी वापरल्या जाणाऱ्या व्याख्येवर विशेषतः त्या खंडाच्या सीमेच्या स्थानावर अवलंबून आहेत. यामुळे दोन प्रमुख फरक दिसून येतात. पहिला पर्याय म्हणजे युरोपसाठी माउंट ब्लँक विरुद्ध माउंट एल्ब्रस, जो ग्रेटर काकेशस पर्वतांचा शिखर काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्रांमधील प्रदेशासाठी आशिया आणि युरोपमधील खंडीय सीमा दर्शविणाऱ्या ग्रेटर काकेशस पाणलोट क्षेत्रासाठी घेतला जातो की नाही यावर अवलंबून आहे; या वर्गीकरणामुळे माउंट एल्ब्रसचा युरोपमध्ये समावेश होतो.[] दुसरा ऑस्ट्रेलिया खंडासाठी पुंकाक जया (ज्याला "कार्स्टेन्झ पिरॅमिड" असेही म्हणतात) विरुद्ध माउंट कोसियुस्को आहे, जो साहुल शेल्फ की फक्त ऑस्ट्रेलियाचा मुख्य भूभाग, यापैकी कोणाचा समावेश आहे आहे यावर अवलंबून आहे. यामुळे "आठ शिखर स्थळे" नावाची आणखी एक यादी तयार झाली, ज्यामध्ये पुंकाक जया आणि माउंट कोसियुस्को या दोन्ही शिखरांसह इतर खंडांवरील सहा शिखरांचा समावेश होतो.

यामुळे सात शिखरांच्या पुढील प्रमाणे विविध संभाव्य आवृत्त्या तयार झाल्या आहेत:

रिचर्ड बास आणि त्यांचे गिर्यारोहण भागीदार फ्रँक वेल्स याची संकल्पना होती की प्रत्येक खंडातील सर्वात उंच पर्वतावर उभे राहणारे ते पहिले असावेत.[] त्यांनी ज्याप्रमाणे हे ध्येय ठरवले तसेच त्यांनी ते गाठले देखील. त्यांच्या यादीनुसार त्यांनी दक्षिण अमेरिकेसाठी अकोन्कागुआ, उत्तर अमेरिकेसाठी डेनाली, आफ्रिकेसाठी किलिमांजारो, युरोपसाठी एल्ब्रस, अंटार्क्टिकासाठी विन्सन, ऑस्ट्रेलियासाठी कोसियुस्को आणि शेवटी आशियासाठी एव्हरेस्ट वर चढाई केली.[]

टेक्टोनिक प्लेट्स

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Clukey, Abigail (2019-06-05). "'The Summit Is Never The Goal': Why Climbers Pursue The 7 Summits". NPR. 2019-07-22 रोजी पाहिले.
  2. ^ Noonan, Daniel (3 January 2023). "Book Review: Becoming the First American to Complete the Explorer's Grand Slam". 6 January 2023 रोजी पाहिले.
  3. ^ National Geographic Maps (Firm) (2011), Atlas of the world, Washington, D.C.: National Geographic Society, ISBN 978-1-4262-0632-0, OCLC 671359683, 2021-01-09 रोजी पाहिले
  4. ^ "Climbing the Seven Summits". www.infoplease.com.
  5. ^ "Climbing the Seven Summits: Which mountaineering challenge variation is the safest?". thehimalayantimes.com. 2024-05-19 रोजी पाहिले.
  6. ^ a b "The Adventurer: Dick Bass' Many Summits". Forbes. 12 November 2003.