सनकादि कुमार
four sages (rishis) who roam the universe as children from the Puranic texts of Hinduism | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | group of humans, ऋषी | ||
|---|---|---|---|
| |||
सनकादि कुमार हे हिंदू धर्माच्या पुराणातील चार ऋषी आहेत जे विश्वात फिरतात,[१][२] हे चार कुमार आहे - सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार.[३] त्यांना निर्माता-देव ब्रह्माचे प्रथम मानसपुत्र म्हणून ओळखले जाते. ब्रह्माच्या मनातून जन्मलेल्या या चार कुमारांनी त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध ब्रह्मचर्यचे आजीवन व्रत घेतले. ते शिक्षणाचा एकच उद्देश घेऊन भौतिकवादी आणि आध्यात्मिक विश्वात भटकत आहे असे म्हटले जाते.[१] चारही भाऊ बालपणापासून वेदांचा अभ्यास करत असत आणि नेहमी एकत्र प्रवास करत असत.[४]
भागवत पुराणात बारा महाजनांमध्ये (महान भक्त) कुमारांना गणले आहे,[५] जे जन्मापासूनच सनातन मुक्त आत्मे असले तरी ते विष्णूच्या भक्तीकडे आकर्षित झाले.[६] ते अनेक हिंदू आध्यात्मिक परंपरांमध्ये, विशेषतः विष्णू आणि त्यांच्या अवतार कृष्णाच्या उपासनेशी संबंधित, कधीकधी शिवाशी संबंधित परंपरांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
नावे
[संपादन]या चौघांना विविध नावांनी ओळखले जाते: "कुमार", "चतुर्सन" किंवा "चतुः सन" (सनापासून सुरू होणारी चार नावे) आणि "सनकादि" (सनक आणि इतर).[७] वैयक्तिक नावांमध्ये सहसा सनक (प्राचीन), सनातन (शाश्वत), सनंदन (सदैव आनंदी) आणि सनत्कुमार (सदैव तरुण) यांचा समावेश होतो.[१][२][८] कधीकधी, सनातनऐवजी सनत्सुजाताचा वापर केला जातो. कधीकधी रिभू नावाचा पाचवा कुमार जोडला जातो. कधीकधी, सन आणि रिभू किंवा सनत्सुजात जोडून कुमारांची गणना सहा म्हणून केली जाते.[९]
महाभारतात एकूण सात पुत्रांचा उल्लेख आहे, म्हणजे: १) अनिरुद्ध, २) सन, ३) सनत्सुजात, ४) सनक, ५) सनंदन, ६) सनत्कुमार आणि ७) सनातन आणि पुढे असे नमूद करतात की, "या सात ऋषींना ज्ञान स्वतःहून येते. हे सातही निवृत्ती (आतील चिंतन) धर्माशी जोडलेले आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Bhaktivedanta VedaBase: Srimad Bhagavatam 3.12". Vedabase.net. 2 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 December 2012 रोजी पाहिले.
- ^ a b D Dennis Hudson (25 September 2008). The Body of God:An Emperor's Palace for Krishna in Eighth-Century Kanchipuram: An Emperor's Palace for Krishna in Eighth-Century Kanchipuram. Oxford University Press. pp. 355–. ISBN 978-0-19-536922-9. 22 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Hudson, D. Dennis (2008-09-25). The Body of God: An Emperor's Palace for Krishna in Eighth-Century Kanchipuram (इंग्रजी भाषेत). Oxford University Press, USA. p. 412. ISBN 978-0-19-536922-9.
- ^ James G. Lochtefeld (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: Volume Two. The Rosen Publishing Group. pp. 592–. ISBN 978-0-8239-3180-4. 17 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Bhaktivedanta VedaBase: Srimad Bhagavatam 6.3.20–21". Vedabase.net. 4 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Alain Daniélou (1 December 1991). The Myths and Gods of India: The Classic Work on Hindu Polytheism from the Princeton Bollingen Series. Inner Traditions / Bear & Co. p. 165. ISBN 978-0-89281-354-4. 26 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Mani, Vettam (1975). Puranic Encyclopaedia: a Comprehensive Dictionary with Special Reference to the Epic and Puranic Literature. Motilal Banarsidass Publishers. p. 682. ISBN 978-0-8426-0822-0.
- ^ Bhag-P 3.15.12 Bhagavata Purana Archived 2007-09-30 at the वेबॅक मशीन. "Lord Brahma said: My four sons Sanaka, Sanatana, Sanandana and Sanatkumara, who were born from my mind"
- ^ The Vishńu Puráńa: A System of Hindu Mythology and Tradition. Oriental Translation Fund of Great Britain and Ireland. 1840. pp. 38–39. 22 December 2012 रोजी पाहिले.