सदस्य चर्चा:Suraj wadekar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Suraj wadekar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Suraj wadekar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१६ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १७:५३, २९ फेब्रुवारी २०१६ (IST)[reply]


संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा 1) संघटनेची तत्वप्रणाली- त्याला मान्य असावी. संघटनेचे अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य त्याला माहित असावे. 2)समाजाबद्दल आपुलकी असावी.संघटनेच्या कार्कर्त्यांबध्दल त्याच्या मनात सद्भावना, प्रेम, आदरभाव असावा. 3)स्वत:च्या समाजाचा पूर्वेतिहास त्याला माहित असावा. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडऊ शकत नाही असे म्हटले जाते. 4)कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. संघटनेचा नेता आणि उध्दीष्ठ यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. 5)त्याला वाचनाची आवड असावी. समाजावर प्रभाव टाकणा-या समाज सुधारकांचे चरित्र समाज कार्यकर्त्याला नेहमीच प्रेरणा देत असते. 6) पदलोभी नसावा- पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते. 7) आकलनशक्ती- नेत्याच्या 'सूचक' शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. Read between the lines दर्जाची आकलन क्षमता असावी. 8) सूक्ष्म निरीक्षण- कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ति असावी. सर्वच समाजात घडणा-या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी. 9) भाषण व संभाषण चातुर्य- आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे. 10) आत्मविश्वास- निराश मनोवृत्ती नको.अपयशाचे यशात रूपांतर करतो, तोच खरा लढवय्या, नाहीतर 'रडवय्या'. मिशनरी कार्यकर्त्याच्या डिक्शनरीत 'निराशा' हा शब्दच नसतो. दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात. पराक्रमी परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी लढा देतात. 11) परिश्रम, चिकाटी आणि सातत्य- ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी. प्रयत्नांत सातत्य हवे.मधरसोड नको. 12) कार्यकर्ते जोडणारा- कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको. प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते. 13) कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक- कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्याकडे हवे. 14) शिस्त पाळणारा पाहिजे. 15) त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा. 16) तंबाखू, गुटखा, दारू वगैरे व्यसने नकोत. व्यभिचारी नसावा. धोकेबाज नसावा. श्रेय लाटण्याची मनोवृत्तीचा नसावा. 17) कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी. पुढाकार घ्यावा. किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा. 18) समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज वाटू नये. 19) अभ्यासू, चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा. 20) गुप्तता- संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा. 21) कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता यायला हवा. 22)प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा. 23) अंधश्रद्धाळू नसावा. 24)संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा हे 'पंचदान' देणारा असावा. 25)संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे. त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणांचे योगदान करणारा असावा. ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात त्या संघटनेला जगात तोड नसते. आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म कार्यकर्ता म्हणून अंगी बाणवणं अत्यावश्यक आहे.