सदस्य चर्चा:Magardhvaj
भीमा कोरेगावची लढाई
[संपादन]नमसकार,
कृपया, भीमा कोरेगावची लढाई या लेखात अनावश्यक व चूकिचे बदल करू नका.
--संदेश हिवाळेचर्चा १०:३९, २ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १०:३९, २ जानेवारी २०१८ (IST)
चुकीची माहिती लिहीत जाऊ नये. जो पर्यंत हि माहिती लिहीत राहील तोपर्यंत बदल होत राहतील.
- चुकीची आणि अतार्किक माहिती तुम्ही भरत आहात. कृपया लगेच थांबवा नाहीतर तुमचे लिहिणे कसे बरोबर आहे याचे सतार्किक उत्तर द्या.
- अभय नातू (चर्चा) १३:२४, ४ जानेवारी २०१८ (IST)
संदेश हिवाळे/अभय नातू You can see the Link Below Copy & paste in Browser (Read & Change It) Above Page Include all Information in this Link 1)http://kps193124.blogspot.in/2015/12/blog-post_98.html - (Karan Kamble- Advocate, Khed, Pune) 2)http://www.bbc.com/hindi/india-42554231 3)https://www.bbc.com/marathi/india-42541621
'मराठ्यांविरुद्धची नव्हे तर ब्राह्मणांविरुद्धची लढाई' साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे लढाईची दुसरी बाजू मांडतात. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीनं मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं. "ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता. ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला," असं कांबळे सांगतात. ते पुढे म्हणाले, "ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं. ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती." "महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती," असं कांबळे आवर्जून नमूद करतात. "मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली."
- हे सगळे लिहिलेत पण याला संदर्भ काय? कांबळे यांनी ऐतिहासिक पुराव्यावरुन हे निष्कर्ष काढले का आपली मते दिली? ईस्ट इंडिया कंपनीने अनेक देशांतून त्या त्या ठिकाणच्या लढवय्या लोकांना आपल्या सैन्यात साम, दाम, दंड, भेद वापरून शामिल करुन घेतले होते. यात दक्षिण आफ्रिका, केन्या, अफगाणिस्तान सह अनेक देश आहेत.
- चर्चापानावर लिहिल्याप्रमाणे अस्पृश्यता होती कि नव्हती हा वाद नाहीच आहे. प्रश्न आहे हे तुम्ही लिहीत असलेली विधाने ऐतिहासिक सत्ये आहेत का व्यक्तिगत मते? महारांनी ब्राम्हणांना सांगितले याचा कांबळे यांच्या कथनाशिवाय काय संदर्भ आहे? महारांनी ब्राम्हणांना हरविले हे म्हणणे, ते मान्य करणे आणि पुनरुक्ती करणे हास्यास्पद आहे. मराठा/पेशवा सैन्यात अधिकांश मराठा होते, अरब होते, फ्रेंच होते, शिद्दी होते, ब्राम्हणही होते, वैश्य होते. यांपैकी तुमचा रोख विशिष्ट जातीवरच का?
- पेशव्यांच्या हातात सत्ता असली तरी साम्राज्य छत्रपतींच्याच नावचे होते. जसे कंपनी सरकार हे इंग्लंडच्या राणी/राजाच्या नावे लढाई करीत तसेच. तेथे तुम्ही इंग्रज लिहिलेत, कंपनी नाही. बरे, या इंग्रज सैन्यात अनेक स्कॉटिश, आयरिश आणि वेल्श लोकांचा भरणा होता हे तुम्हाला माहिती आहे? हे प्रत्येक प्रदेश नसून वेगळे देश होते हे माहिती आहे? असो/नसो. पेशवाईचा अस्त होण्यात या लढाईचा मोठा भाग होता हे खरेच परंतु शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य येथे संपले.
- विकिपीडिया ही जातीयवादी भांडणे करण्याची जागा नव्हे. व्यक्तिगत आकस मांडण्याचीही नव्हे. येथे वस्तुनिष्ठ माहिती असावी हा आग्रह आहे.
- तुम्ही इतर ठिकाणीही योगदान कराल ही आशा.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १४:३९, ४ जानेवारी २०१८ (IST)
__________________________________________________________________ आता मी म्हणतो हे सगळे लिहिलेत पण याला संदर्भ काय? कोणी लिहले, काय लिहले ज्यांना हवा आहे तस लिहत गेलेत ? परिस्तिथी काय होती कोण बगायला गेलय असे बरेच गोष्टी आहेत ज्या लपून किंवा चुकीच्या सांगून ठेवलेत.आणि आत्ता त्या री वरती री ओढण्याचे काम चालू आहे जाऊदेत ............ माणसाच्या नादी लागूनये म्हणतात ते खरेच आहे.... एक म्हण आहे .... माकड काय म्हणते ................. लाल घ्या समजून द्या विषय सोडून.......... Magardhvaj