सदस्य चर्चा:Kedarlingshirale22314
विषय जोडा| |
Kedarlingshirale22314, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| Kedarlingshirale22314, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,११० लेख आहे व ४५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
| |
-- साहाय्य चमू (चर्चा) ०९:५६, १९ फेब्रुवारी २०२० (IST)
Chandrashekhar babarao shirale
[संपादन]- एक अध्यात्मिक आणी प्रेरणादायी व्यक्तीमत्व : प्रा. चंद्रशेखर शिराळे .
I रचना शब्दांची कशी करु मी सांगण्यास सामर्थ्य तुमचे I
शब्दानांही अभिमान वाटेल असेल सत्कर्म आपुले ॥
.# एक माणसातील माणुसकी जपणारा , सामाजीक बांधीलकी मानणारा, आधुनिक वैचारिक मुल्यांचा आग्रह धरणारा , शैक्षणिक कार्यालाही वाहुन घेणारं, गुरुदेव मित्र मंडळाच्या माध्यमातुन समाजहितेशी कार्य करणारं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. चंद्रशेखर शिराळे सर..
- प्रा. चंद्रशेखर शिराळे सर म्हणजे नांदेडच्या सामाजीक आणी शैक्षणिक क्षेत्रातल एक मोठं नाव.... एक आदर्श पुत्र... सामाजीक कार्य करण्याची हातोटी.... अध्यात्मिक व्यासंग.... उत्कृष्ठ वक्ता.... प्रचंड संघटन कौशल्य .... सामाजीक कार्याची जाणीव असलेलं एक आदर्श व्यक्तीमत्व.....
- त्यांनी आज पर्यंतच्या संघर्षातुन जी प्रगती केली आहे व विदयार्थी घडविण्याचे जे काम केलं आहे ते निश्चितच अभिमानास्पद आहे..
- माझी आणी शिराळे सर यांची ओळख हॉस्टेल सघंटनेच्या निमीताने झाली. तेंव्हा पासुन ते आज पर्यंत त्यांनी अगदी जिवाभावाने माणसं आणी मैत्री जोडण्याच काम केलं आहे. सरांची संघटनेसाठी प्रामाणीकपणे काम करण्याची धडपड पाहुन मी प्रभावीत झालो.नंतर त्यांनी हॉस्टेलच्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रीत केले.जेजे चांगले दर्जेदार आहे ते ते हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना देण्याचा सर प्रामाणीक प्रयत्न करतात .विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजीत करुन त्यांच्यातील दडलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एक मोठ व्यासपीठ देण्याच काम आदरणीय प्रा. शिराळे सर इमान इतबारे करतात... विदयार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देण्यारं कदाचीत हे नांदेड शहरातील एकमेव हॉस्टेल असेल...
- गुरु आणी शिष्य यांच नात कसं असावं याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रा. चंद्रशेखर शिराळे सर होत... सरांची गुरुवर्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या विषयी असलेली अफाट श्रध्दा त्यांच्या भक्तीची आणी शक्तीची प्रचीती देते.. व महाराजांचीही सरांविषयी असलेलं प्रेम हे त्यांनी आज पर्यंतच्या सरांच्या सर्वच कार्यक्रमाला उपस्थित राहुन दाखवीले आहे.... व हे कार्यक्रम अनेकांसाठी ऊर्जेचा स्त्रोत बनले आहे... याच कार्यक्रमाच्या निमीत्ताने ते समाजातील उत्कृष्ठ काम करण्याऱ्या मान्यवरांचा गुरुदेव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करतात व त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहीत करतात .. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगीरी करणारे प्रा. गणेश चौगुले सर पासुन ते वैदयकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. वैशाली किन्हाळकर मॅडम या गुरुदेव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
Iशब्दांची पुजा करत नाही, माणं सासाठी आरती गातो |
ज्यांच्या गावात सुर्य नाही त्यांच्या हातात प्रकाश देतो ॥
व जे जे करिन ते सर्वोत्कृष्ठ करिन असचं सरांच ध्येय आहे .... Kedarlingshirale22314 (चर्चा) १०:०२, १९ फेब्रुवारी २०२० (IST)
