सदस्य चर्चा:117.195.43.201

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'ञ' लिहावाच लागतो असा एकच शब्द मराठीत असावा-नञ्.

दोन शब्दांदरम्यान होणाऱ्या तत्पुरु़ष समासांच्या वर्गात 'नञ् तत्पुरुष' नावाचा एक प्रकार आहे. हा नञ् शब्द लिहिताना 'ञ'चे लिखाण अनिवार्य आहे. खाद्य'चा विरुद्धार्थी शब्द 'अखाद्य'. हा शब्द बनताना अ आणि खाद्य या दोन शब्दांमध्ये समास होऊन अखाद्य हा नकारार्थी शब्द तयार झाला. या समासाच्या प्रकाराला 'नञ्' तत्पुरुष म्हणतात.

नञ् तत्पुरुष समासाची अन्य उदाहरणे :- गैरहजर, बेशरम, निःसीम, नास्तिक, निरक्षर, कमनशिबी, कुपथ्य, वगैरे.

भारतीय लिप्यांमधले ज्ञ हे अक्षर 'ज' आणि 'ञ' मिळून झाले आहे. ज+ञ=ज्ञ. हिंदीत या अक्षराचा उच्चार ग्य तर मराठीत द्न्य करतात, त्यमुळे या अक्षरात दडून बसलेला 'ञ' ओळखू येत नाही. बंगाली आणि इतरही काही भारतीय ज्ञानेश्वरचे इंग्रजी स्पेलिंग Jnaneshwar असे करतात. हिंदीभाषक Gnyaneshwar, तर मराठीभाषक Dnyaneshwar असॆ करतात.

कालिदासाच्या मेघदूतात याच्ञा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा अशी एक ओळ आहे. हिच्यातला शब्द याच्ञा (=याचना) आहे, याञ्चा नााही. ही ओळ लिहिताना मराठी भाषकालााही 'ञ' वापरावाच लागेल. ... ज (चर्चा) ११:४१, २१ मार्च २०१६ (IST)


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.