सदस्य चर्चा:दुर्गवेडा कृष्णा घाडगे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत दुर्गवेडा कृष्णा घाडगे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन दुर्गवेडा कृष्णा घाडगे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१६ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २३:२१, २३ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]

शिवाजी महाराजांचे पायदळ व पायदळाची व्यवस्था[संपादन]

शिवाजी महाराजांच्या सैन्य दळात पायदळ, घोडदळ तर १६५७ नंतर नाविक दळ, गुप्तहेर खाते असे सैन्य दळ होते. हे सैन्यदळ मोगल, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्धी यांच्या पेक्षा अतिशय सक्षम, चपळ असे कि चलदाईने कारवाई करण्यात तरबेज असे पायदळ शिवाजी महाराजांकडे होते. स्वराज्याची लष्कर उभारणी शिवाजी महाराजांनी प्रारंभी पायदळा पासुनच केली. स्वराज्याचे मुळचे पहिले स्वरुप हे एका जहागीरी सारखेच होते. डोंगर दऱ्या अडचणीचा भाग, नद्या, घनदाट जंगले, असे या भागाचे स्वरुप. या भागात संरक्षणासाठी म्हणा अथवा लढाईसाठी म्हणा उपयोगी पडणार ते सुटसुटीत पायदळ. हे पाहता महाराजांनी पायदळाची उभारणी केली. या पायदळातील सैनिकास पाईक, हषम, पदाती किंवा प्यादा असे संबोधले जाई. यायदळाची शस्त्रे म्हणजे ढाल-तरवार, भाला, गोफण, शिवकालीन कागदपत्रांत बंदुखी (म्हणजे तोड्याच्या छोट्या बंदुकी वापरणारे) इटेकरी, (म्हणजे बर्ची किंवा लहान भाला बापरणारे), पटाईत - म्हणजे (म्हणजे दांड-पट्टा वापरणारे) तिरंदाज (म्हणजे तीरकमठा वापरणारे), आडहत्यारी (म्हणजे जमदाढ, कट्यार, बिचवा, वाघनखे, खंजीर, गोफण यासारखी शस्त्रे वापरणारे) यांचेही उल्लेख आढळतात. पायदळात पाइकाव्यतिरिक्त बांकाईत व ढालाईतही असत. बांकाईत म्हणजे कर्णा, तुतारी यासारखी रणवाद्ये वाजविणारा तर ढालाईत म्हणजे निशाण सांभाळणारा. पाइकाची वेषभूषा म्हणजे, डोक्याला बुरुणुसाची टोपी, कानापर्यंत अंगात गोधडीचे कुडते, कधी नुसतीच घोंगडी ओढलेली, खाली विजार वा गुडघ्यापर्यं लपेटून घेतलेले वस्त्र, कमरेला उपरणे, त्यात शस्त्रे अडकवलेली, पायताण समोरून झाकले व मागून मोकळे, अशा स्वरूपाची असे. पायदळात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या श्रेण्या असत. त्यांचा पगारही वेग वेगळा असे. अखेरच्या श्रेणीतील पाइकाला 'पाच टक्क्याचा प्यादा' असे म्हटले जाते. त्यांचा पगार मासिक दीड रुपयापासून पाच रुपयापर्यंत असावा. याशिवाय, युद्धात विशेष कामगिरी बजावल्यास त्याला बक्षीस दिले जाई, शिवाय लुटीचाही काही भाग मिळे. पदोन्नतीची संधीही असेच. अशा नऊ पाईकांवर एक नाईक, अशा पाच नाईकांवर एक हवालदार, दोन किंवा तीन हवालदारांबर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांबर एक हजारी व सात हजाऱ्यांवर एक सरनोबत अशा अधिकाऱ्यांच्या श्रेण्या असत. याच श्रेणीला मोगलशाहीत हजारी जात व पगारी असा एक हजारी तसाच पंजहजारी, संप्तहजारी मनसबदार नेमले जात. त्यांच्या पदरच्या सैन्याच्या पगारासाठी काहि मुलूख लावुन दिला जात असे त्यातून त्या सैनिकांचा पगार करावा लागे. पण स्वराज्यात तसी रित नव्हती. स्वराज्यात प्रत्येक पायदळाच्या सैनिकाचा पगार हा सरकारातुन दिला जाई. त्याचे कोष्टक असे होते.

       नाईकाला सामान्यतः १० होन, हवालदारास ५० होन, जुमलेदारास १०० होन, एक हजाऱ्यास ५०० होन तर सरनौबतास बहुधा १००० होन सालीना पगार असे या अधिकाऱ्यांचा हिशोबी व्यवहार पाहणारे 'सबनीस' नावाचे अधिकारी असत. जुमलेदाराच्या सबनिसास ४० होन तर हनाईकाला सामान्यतः १० होन, हवालदारास ५० होन, जुमलेदारास १०० होन, एक हजाऱ्यास ५०० होन तर सरनौबतास बहुधा १००० होन सालीना पगार असे या अधिकाऱ्यांचा हिशोबी व्यवहार पाहणारे 'सबनीस' नावाचे अधिकारी असत. जुमलेदाराच्या सबनिसास ४० होन तर हजाऱ्याच्या सबनिसास १०० ते १२५ होन मिळत. महाराजांनी जेव्हा पायदळ उभारले तेव्हा पायदळाची संख्या ५००० होती. ती क्रमाक्रमाने वाढत गेली. व १६८० पर्यंत १००५००० (एक लाख पाच हजार) पर्यंत पोहोचली. पायदळाचा पहिला सरनौबत नूरबेग होता. पुढे ही जबाबदारी येसाजी कंकावर सोपविली गेली. हजाऱ्याच्या सबनिसास १०० ते १२५ होन सालिना मिळत. किल्ल्यावर चढाई करताना, किल्ला झुंझवताना, पायदळाचाच हुकमी उपयोग होते. जिंकलेल्या मुलखाची व्यवस्था लावण्यास व लुटिचे वेळेस मुख्य वापर होत असे. या साठी सक्षम व अतिशय चपळ लांबपल्ला मारणारे पायदळ असावे लागे. व शिवाजी महाराजांचे पायदळ हे त्या वेळच्या सर्व सत्तांमध्ये नामी होते. ज्याही ठिकाणी तळ पडे त्या ठिकाणी जादा सरजाम नसे. महाजांसाठी एक छोटा तंबु, व सरदारांसाठी मोठा एक तंबु व खाण्याचा दाणापाणी एवढाच काय तो रसजाम असे. या कारणे पायदळाचा पोशाख असा का होता याचे कारण लक्षात येते. सैन्याकडे जेवढे वजन कमी हालचाली तेवढ्याच दुप्पट गतिने करता येत. असे हे स्वराज्याचे पायदळ शिवाजी महाराजांनी उभारले होते. 
          संदर्भ:-

¤ मराठ्यांचा इतिहास खंड पहिला ¤ छत्रपती शिवाजी महाराज- वा.सि.बेंद्रे ¤ शककर्ते शिवराय- शिवकथाकार विजय देशमुख

           संकलन:-
    दुर्गवेडा कृष्णा घाडगे
  #Un_Viral_History 2409:4042:300:F7C1:0:0:1A7:38A0 ०९:३१, २८ मे २०२२ (IST)[reply]