सदस्य चर्चा:कार्यशाळा
![]() |
कार्यशाळा, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
कार्यशाळा, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८४,२१७ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
- २०२१
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा २७ फेब्रुवारी २०२१
-- साहाय्य चमू (चर्चा) १३:३३, १६ जानेवारी २०१७ (IST)
कार्यशाळा[संपादन]
कार्यशाळा बद्दलची हि माहिती सदस्य ह्या नामविश्वात टाकलेली आहे ती बदलून विकिपीडिया नामविश्वात न्यावी असे मला वाटते. ह्या पानाचा दुवा हा डाव्या समासात पण लावला आहे. कार्यशाळा नावाचे सदस्य खाते त्यानंतर बंद करून टाकावे म्हणेज कन्फ्युजन होणार नाही ह्या मागे बनवतांना काही विशेष उद्देश असल्यास मग हरकत नाही अनावधानाने हे घडले असेल तर त्वरित बदल करता येतील. - राहुल देशमुख २०:५५, ५ मार्च २०१७ (IST)
- अनवधानाने नाही मुद्दाम बनवले आहे. विकिपीडिया नामविश्वात दृष्यसंपादन उपलब्ध नाही आणि नवीन सदस्यांना दृष्य संपादनातून नाव नोंदणी करणे आणि सारणी (टेबलच्या) आणि एकुणच संपादन सुलभतेचा अनुभव घेण्याची संधी मिळावी असा आहे. कारण बरेच कार्यशाळा समन्वयक सरळ लेखात संपादनाचा सराव न देता आधी नाव प्रकल्प पानावर नाव नोंदणी करण्यास सुचवतात - तो नोंदणी प्रयोग होई पर्यंत कार्यशाळेची वेळच बऱ्याचदा संपते. मग संपादन सुलभतेचा अनुभव त्यांचा बाजूलाच राहतो. ओपन टेबलच्या अनुभवा पेक्षा दृशसंपादनातील टेबलचा अनुभव अधिक सोईस्कर असू शकेल असेही वाटते.
- अर्थात प्रत्यक्ष कार्यशाळेच्या दरम्यानच्या अनुभवांवर नामविश्व ठरवूयात.
- धन्यवाद आनी शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:०८, ५ मार्च २०१७ (IST)
विदर्भात कार्यशाळा[संपादन]
विदर्भात कार्यशाळा होत असतील तर मला कृपया कओणी कळवेल काय? --प्रियंवदा
नमस्कार,
प्रियंवदा:
Jagatanand:,
सुशान्त देवळेकर:,
सुबोध कुलकर्णी:,
V.narsikar:
मला वाटते आपण अमरावतीच्या आहात हे इथे नमुद करुन ठेवणे प्रशस्त व्हावे.
विदर्भात अद्याप पुरेशा कार्यशाळा झालेल्या नाहीत. एखाद्या महाविद्यालय / विद्यापीठात आपला परिचय असेल आणि तेथून आमंत्रण आलेले बरे पडते. विद्यापिठ अथवा महाविद्यालयातील कार्यशाळेत विभाग प्रमुखांच्या पुर्वानुमतीने बाहेरचे लोक सुद्धा येऊ शकतात.
विशेष:पसंती (Personal preferences) येथे आपण आपला इमेल पत्ता खासगी स्वरुपात नोंदवून ठेवल्यास अशी कार्यशाळा आयोजीत झाल्याचे आपल्या मराठी विकिपीडिया सदस्य चर्चा पानावरील संदेश आपल्याला आपल्या इमेल पत्त्यावर मिळू शकणे संभव असावे.