सदस्य चर्चा:अभय नातू/विसंवाद कौलप्रस्ताव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री.अभयराव आपल्या सह्या नसल्यामुळे मी आपली मते तर्काने गृहीत धरत आहे. सह्या करून स्पष्ट केल्यास बरे -रायबा

  1. चावडीची १. प्रचालकांना निवेदन २. प्रचालकीय कामाचे मुल्यांकन ही उपपाने विकिपीडिया:प्रचालक या मुख्य पानाची उपपाने म्हणून हलवावीत.
मला वाटते निवेदन हे पान मुख्य चावडीवरच राहू द्यावे म्हणजे सदस्यांना प्रचालकांशी संवाद साधणे सोपे जाईल. मूल्यांकन पान विकिपीडिया:प्रचालक पानाचे उपपान करावे. हे पान प्रवेश केलेल्या सदस्यांनाच संपादित करता यावे.
मराठी विकिपीडियावरील प्रचालकांच्या कामाचे अद्याप कधीच सविस्तर मुल्यांकन झालेले नसताना 'प्रचालकीय कामाचे मुल्यांकन' पान मागच्या बाजूला टाकण्याचा प्रचालकांच्या मनातील असुरक्षीतता दर्शविते. मराठी विकिपीडियातील प्रचालक मंडळी एवढी असुरक्षीत का आहेत ? प्रचालकांना असुरक्षीत वाटू नये म्हणून सामान्य सदस्यांनी अन्याय सहन करत रहावे कुठवर ठिक आहे हे विकिपीडीया समुदायाने ठरावावे. मला प्रचालकीय कामाचे मुल्यांकन पान वेगळे आणि साचा:सुचालन चावडी वरून स्पष्ट निर्देशीत होणे अभिप्रेत आहे.जो पर्यंत पोहोचण्यास सोपे आहे तो पर्यंत [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन|प्रचालकीय कामाचे मुल्यांकन]] अशा तांत्रीक बदलास माझी हरकत नाही. -रायबा
  1. ५. वादनिवारण हे उपपान मुख्य चावडीच्या पानातच विलिन करण्यात यावे व मागील वादनिवारण पान archive करण्यात येऊन नवीन नावाखाली विकिपीडियावर ठेवावे. वादनिवारणासाठी वेगळी चावडी नसावी. कुणाही सदस्याने चावडीवर मांडलेल्या शंकेचे वा वादाचे निवारण चावडीवरच करण्यात यावे. विषय कितीही मोठा (वाद निवारण होण्यासारखा असो वा नसो) तो चावडी पानावरून हलवू नये कारण चावडी ही सदस्यांना मापली मते मांडण्याची हक्काची जागा आहे. येथील मजकूर कुणीही अनामिक, नोंदणीकृत सदस्य, प्रचालक यांनी येथून हलवू नये अशी सूचना पानाच्या वरतीच देऊन ठेवावी. (कुणी माहिती वगळू नये म्हणून abuse filter लावता येत असल्यास तो पहावा) आणि अगदी क्वचितच जर येथील मजकूर जातीय, धार्मिक वा समाजहिताच्या दृष्टीने भावना भडकविणारा असल्यास फक्त स्विकृती अधिकार्यांना तो वगळण्याची वा हलविण्याची परवानगी असावी.
वादनिवारण पान वेगळे करण्यामागचा उद्देश असा होता --
नवीन सदस्य येथील घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी सहसा चावडीवर चक्कर टाकतात. येथे जर का हाणामारी, शिविगाळ सतत चालू असेल तर ते पाहून ते हतोत्साहित होण्याची दाट शक्यता आहे. असलेले वाद इतर ठिकाणी हलविल्यास वादावादी करणाऱ्यांना त्याबद्दल विशिष्ट पानावर चर्चा करता येईल पण नवीन सदस्यांची प्रथमदर्शनीच निराशा होणार नाही.
वरील मुद्द्यावर दूरगामी आणि वस्तुनिष्ठ विचार करावा. आशा आहे तुम्हाला तो पटेल.
अभय राव मला वाटते माझ्या कौलातील भूमीका समतोल आहे -रायबा
  1. ६. प्रगती हे उपपान पूर्णपणे वगळून विकिपीडिया:प्रगती या नावाने विकिपीडियावर ठेवावे
अनुमोदन. किंबहुना या पानाला अधूनमधून मुख्य चावडीवर प्रसिद्धी द्यावी, विशेषतः एखादी महत्वाची घटना घडल्यावर (३५,००० लेख, १५,००,००० संपादने, इ)
हवे तर नवीन नावाकडे स्थानांतरीत करावे,चावडीपाने वगळण्यास माझा विरोध आहे.संपादनांचे इतिहास विशेष कारण असल्याशिवाय वगळले जाण्यास माझा सख्त विरोध आहे.अगदी नवीन नावाकडे नेणे त्या चावडीवरील सदस्यांची सहमती घेऊन व्हावे.
  1. साचा:सुचालन चावडीतून विकिपीडिया मदतकेंद्र हे पान काढण्यात यावे मुखपृष्ठ व इतर अनेक ठिकाणी या पानाचे दुवे आहेतच
चालेल, पण जितक्या ठिकाणांहून मदतकेंद्राकडे दुवे असतील तितके नवीन वाचक/लेखकांना सोपे जाईल असे वाटते.
इतरही सदस्यांचे मत घ्यावे,व्यक्तिगतरित्या मी अभयरावांशी सहमत आहे. -रायबा

रायबांचे कौल

  1. प्रचालकांशी अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हनन न करता त्यांच्या कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन करणे हा सर्व सदस्यांचा मुलभूत अधिकार आहे. ह्या मूलभूत अधिकार वापरू न देणे सदस्यांचा हक्कभंग समजून सदस्यांना चावडी मुख्य पानावर हक्कभंग ठराव मांडता येईल आणि असा हक्कभंग प्रस्ताव चावडीवर सात दिवस पर्यंत राहील नंतर तो मुख्य कौल पानावर हलविला जाईल.
  1. हक्कभंग प्रस्तावाच्या बाजूने पाच पेक्षा अधिक मते आल्यास अशा सदस्य अथवा प्रचालकाने बिनशर्त माफी मागावी. सात दिवसाचे आत माफी न मागणारा प्रचालकाचे प्रचालक पद रद्द समजण्याचा प्रस्ताव मेटा कडे पाठवावा.हक्कभंग करून सात दिवसाच्या आत माफी नम् मागणाऱ्या सदस्यास सहा महिने पर्यंत संपादना पासून प्रतिबंधीत करावे.
मूळ मुद्द्याशी सहमत असलो तरी दोन-तीन गोष्टी खटकतात.
१. समीक्षण/मूल्यांकन करणे हा सदस्याचा अधिकार (right) नसून prerogative[मराठी शब्द सुचवा] आहे. मूलभूत अधिकार म्हणणे थोडी अतिशयोक्ती वाटते. असो, कीस काढण्याचा उद्देश नसून रायबांच्या हेतू स्पष्ट करणे आवश्यक समजतो
एकदा "अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हनन" नाही म्हटल्या नंतर कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन करणे हा सर्व सदस्यांचा मुलभूत अधिकार आहे मुलभूत अधिकार म्हणून स्विकारण्यास नेमकी कोणती अडचण आहे ? पुन्हा एकदा प्रचालकांची मानसीक असुरक्षीतता ? prerogative शब्दाची डिक्शनरी व्याख्या A right or privilege exclusive to a particular individual or class. अशी जाते जी विशीष्ट व्यक्ती आणि गटांकरता अधिकार राखीव करू इच्छिते.अभयजीनी खेदाने नोंदवतो आहे हा शब्दाचा खीस नव्हे शब्दच्छल ठरतो,विकिपीडिया संस्थापक जिमी वेल्सच्या शब्दात " there must be no hierarchy or structure which gets in the way of openness to newcomers." आपण मध्ये hierarchy or structure घालू इच्छिता असे दिसते. आणि त्यास prerogative शब्दास माझा विरोध आहे. जिमी वेल्स अजून म्हणतात "Anyone with a complaint should be treated with the utmost respect and dignity. They should be encouraged constantly to present their problems in a constructive way." आणि आपल्या प्रचालकांमध्ये कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन नाकारण्याची हिटलरी प्रवृत्ती बळावत असेल तर सदस्यांना सुयोग्य अधिकार देऊन समतोल साधणे गरजेचे आहे असा माझा विश्वास आहे.-रायबा

.

२. सहा मते आल्यास बिनशर्त माफी मागावी हे ठीक नाही. हे म्हणजे गर्दीचा न्याय झाला. कोणालाही (दोन्ही बाजूंनी) आपले पाच (दहा, पंधरा, वीस, इ) सवंगडी गोळा करणे अगदी सोपे आहे. यात कळसूत्री बाहुल्यांचाही सहभाग असू शकतो. अशा मूळ न्याय्य नसलेल्या प्रक्रियेखाली एकदा "दोषी" ठरलेल्या सदस्याला सहा महिने प्रतिबंध करणे किंवा प्रचालकाचे प्रचालकत्व रद्द करणे ही अगदी टोकाची भूमिका वाटते.
उदा. रस्त्यावर कार आणि सायकलचा अपघात झाला असता कारचालक ९०%वेळा बघ्यांकडून मार खातो. त्याची चूक असो किंवा नसो. यासारखा हा प्रकार वाटतो.
होय मजकुराची वगळावगळी करणाऱ्यांची जबाबदारी निश्चितपणे अधीक असते. आणि हक्कभंग करणाऱ्या सदस्य आणि प्रचालकांवर कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. भूमीका टोकाची होऊ नये म्हणूनच बिनशर्त माफीनामा ग्राह्य मानू

देत आहोत ना. तुम्ही खरेच श्रीरामा सारखे प्रजाजनांची /समुदायाची काळजी घेणारे असाल तर सहा सदस्यांचीसुद्धा आवश्य्कता नाही कुणी संशय व्यक्त केलातरी माफी मागण्यास लाज का वाटावी ?तसेही येथे प्रभू रामचंद्रांच्या रामदसी शीष्यांची बहुसंख्या दिसते मग गांधींचा गौतम बुद्धाचा आणि रामास मान्य असलेला मार्ग स्विकारण्यात लाज का वाटावी आणि ज्यांना लाज वाटते त्यांनी काहीतरी लाज वाटण्या सारखे कृत्य केले असण्याचीच शक्यता अधीक त्यामुळे मी मांडलेल्या कौलात मांडलेली कडक कारवाई योग्यच ठरते.प्रचालकांनी खरेच सदस्यांच्या अधिकाराची काळजी घेतल्यास प्रचालकाचे खाते एक महिना ते दोन वर्षे पर्यंत सस्पेंड केले जावे.पण प्रचालकांनी वारंवार गैर वर्तन चालू ठेवल्यास संबधीत प्रचालकांना काढून टाकण्याचा समुदायाचा अधिकार प्रचालकांना दिल्या जाणाऱ्या सुचनेत स्पष्टपणे निर्देशीत व्हावा. -रायबा

  1. सदस्य आणि प्रचालकांशी तीन अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हननाचे प्रयत्नास करणाऱ्यास पहिल्या दोन प्रयत्नास समज नंतरच्या वेळी सात दिवसांच्या प्रतिबंधनाचे तीन वेळा त्याने नियमाचे उल्लंघन दहा पेक्षा अधिक वेळा केल्यास सहा महिन्यांकरिता प्रतिबंधीत करण्याचे अधिकार प्रचालकांना दिले जात आहेत.
मान्य, पण सहा महिने प्रतिबंध करणे जास्त वाटते. शक्य तितकी ढील देउन (२-३ वेळा समज, इशारा दिल्यावर) मग ३-७ दिवस प्रतिबंध करावा. यानंतर प्रत्येक वेळी प्रतिबंध करताना प्रतिबंधाची मुदत दोन-दोन आठवड्यांनी वाढवावी.
ठिक आहे -रायबा



  1. १)चावडी आणि चर्चा पाने अनामीक आणि नवागतांना सुद्धा मुक्त असावीत.
अनुमोदन
सहमती करता धन्यवाद -रायबा
  1. २)चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळावेत.
अनुमोदन, परंतु चावडीच्या विशिष्ट उपपानांवरुन चारित्र्यहननाबरोबरच असंबद्ध मजकूर सुद्धा वगळावा (पहा: चावडी/प्रचालकांना निवेदन) मुख्य चावडीवरुन फक्त चारित्र्यहननकारक मजकूर वगळावा.
ठिक आहे,सहमती करता धन्यवाद -रायबा
  1. ३) रागाच्या भरात नावांच्या एकेरी केलेल्या उल्लेखांचे आदरार्थी बहुवचनात रूपांतरण करावे
अनुमोदन. याचबरोबर असा उल्लेख करणाऱ्या सदस्यास सूचना, समज, इशारा द्यावा.
ठिक आहे,सहमती करता धन्यवाद -रायबा
  1. ४)चावडीवरील सर्व लेखन मराठी भाषेत असावे. इंग्रजी अथवा इतर भाषी लेखनास सहसा परवानगी नसावी , इतर भाषिक लेख काही कारणाने घ्यावयाचे झाल्यास त्याला दाखवा लपवा साचात ठेऊन त्याचा मराठी संक्षेप तेवढा खाली द्दावा.
अनुमोदन. एखाद्याने परभाषेत लेखन केल्यास त्याला आंतरविकि दूतावासावर लिहिण्यास उद्युक्त करावे.
ठिक आहे,सहमती करता धन्यवाद -रायबा
  1. ५)मजकुराचे (अगदी मुद्दे विवाद्द असलेतरी) किमान चार दिवस पर्यंत अर्काईव्हींग आणि स्थानांतरण करू नये.
मला वाटते एक-दोन दिवसांत वादनिवारण पानावर स्थानांतरण करावे (पहा: दहिवळांच्या मुद्द्यावरील विश्लेषण)
>>दहिवळांच्या मुद्द्यावरील विश्लेषण नेमके कोणते ते समजले नाही, नवीन सदस्यांना विवाद लगेच दिसू नयेत म्हणत असाल तर समुदायस विश्वासात न घेता तुम्हा मंडळींनी चावडीचे पान परस्पर बंड केलेच आहे. चावडीचा एक उद्देश वचक हा असलाच पाहिजे .रास्त तक्रारीस किमान तीन-चार दिवस चावडीवर राहू देणे आवश्यक आहे म्हटल्या नंतर सदस्य आणि प्रचालक आपोआपच बरोबर वागतील.-रायबा
दोन दिवस फारच कमी होतात, तक्रार घेऊन आलेल्या सदस्यांचे समाधान होणार नाही , तीन दिवस ठिक असेल.-रायबा
  1. ६)चावडी पानांच्या अर्काईव्हींग/स्थानांतरणा करीता बॉट्सना परवानगी नसावी.विवाद शमवण्याचे दृष्टीने अपवादात्मक स्थिती करिता केवळ प्रशासकांना तेही वर्षातून प्रत्येकी अधिकाधीक पाच वेळांपर्यंत आणि सर्व प्रशासंकाचे मिळून अधिकाधीक वीसवेळा वेगळे विशेष बॉट खाते बनवून मजकुर थंड्याबस्त्यात तेही केवळ चार दिवसांनतर हलवण्यास परवानगी असावी.
बॉट्सनी असे स्थानांतरण करू नये यास अनुमोदन. प्रशासकांना विशिष्ट आकड्यांचे बंधन घालू नये. प्रचालक मोजकेच आहेत आणि पांचट लिहिणाऱ्यांना थियोरेटिकली सीमा नाही (पहा: कळसूत्री बाहुले)
६वा मुद्दा पांचट अथावा अग्राह्य लेखना बद्दल नाही(त्याचा उहापोह आधीच्या मुद्दात झालेला आहेच) .लेखन ग्राह्य आहे पण वादविवाद केवळ खूपजास्त तापत आहे तर काही वेळा खरोखर शांत करण्याकरता वेळ हेच औषध असते त्या करता हे प्रावधान आहे. प्रत्येक विवादावर थंड पाणी टाकण्याकरता हे प्रावधान नाही त्यामुळे,प्रशासकांनी ते कमीच आणि तारतम्याने वापरले जावे म्हणून हे बंधन गरजेचे आहे. हे प्रावधान किमान येते दोन वर्ष असेच रहावे . प्रशासकांनीही अजून समुदायाचा विश्वास कमवलेला नाही. अग्राह्य लेखनाच्या/वर्तनाच्या चुका प्रशासकांकडूनही झालेल्या आहेत(हे विषय काढला गेला म्हणून नोंदवले. इथे कुणासही दुखावण्याचा हेतु नाही पण प्रशासकांनीही स्वत:स बंधनात ठेवले पाहिजे) त्यामुळे प्रशासकांवरही बंधनाची गरज आहेच.-रायबा