सदस्य चर्चा:अधांतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अरुण कृष्णाजी कांबळे या लेखाचे सद्य स्वरूप बातमी वजा झाले आहे.विश्वकोश संकल्पना अभ्यासून लेखातील मजकुरास विश्वकोशिय स्वरूप देण्याची आवश्यकता आहे.परिच्छेदात काही ठिकाणी संदर्भ उपलब्ध करून देणे शक्य असल्यास स्वागत आहे.

११:००, ३१ डिसेंबर २००९ (UTC)

प्रताधिकार[संपादन]

नमस्कार आपली अरुण कृष्णाजी कांबळे लेखात आपण काम करत आहात त्याचे स्वागतच आहे.आधी म्हटल्या प्रमाणे हा लेख एकतर विश्वकोशिय संकल्पनेत बसवावयास लागेल,आपल्याला असा सराव होण्यास थोडा अवधी लागेल हे समजण्या सारखे आहे.en:Arun Krushnaji Kamble हा इंग्रहजी विकिपीडियावरील लेखही अभ्यासावा. वर्ग:व्यक्ती येथे बरेच व्यक्तिविषयक लेख आहेत त्यांचा अभ्यास करावा किंवा त्यातील काही लेखात बदल करून पहावेत अशी नम्र विनंती आहे.

राजकिय कार्य या विभागातील माहिती आपण पूर्णतः वृत्तपत्रीय लेखातून घेतल्याचे आढळून येते. आपण आपल्या शब्दात लिहिल्यास अधिक सयूक्तीक होईल चूका होतील होऊ द्याव्यात त्याची काळजी नाही. अजून एक असे की वृत्तपत्रीय लेख जसाच्या तसा घेतल्याने प्रताधिकार काय्द्याचे उल्लंघन होते आहे. कदाचित संबधीत पत्रकार आणि वृत्तपत्र इकडे काही काळ डोळे झाकही करेल पण तो लेख एखाद्या भावी पुस्तकात येण्याची शक्यता असेल तर् ती दुरावते आणि पत्रकाराच्या शक्य असलेल्या उत्पन्नाअचे नुकसान होते हे आपण लक्षात घ्याल असे वाटते. तसेच विकिपीडियात विकिपीडियाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीनेही प्रताधिकाराच्या उल्लंघनाची परवानगी नसते.

प्रताधिकार विषयक अधिक माहिती विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे पहावयास मिळेल. आपले सहकार्य मिळेल असा विश्वास वाटतो.माहितगार १५:४५, २ जानेवारी २०१० (UTC)

स्वागत[संपादन]

स्वागत Adhanter. कदाचित तुम्हाला आठवत असेल आपण याच लेखाच्या बाबतीत इंग्रजी विकिवर बोललो होतो. लगे रहो. गणेश धामोडकर ०९:५०, ३ जानेवारी २०१० (UTC)

मराठी विकिपीडिया मध्ये २०१० या वर्षात सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी एक प्रयोग म्हणून प्रकल्पःबावन्नकशी २०१० हा प्रकल्प कसा राहील. आपले मत, सुचना व दुरुस्त्या हव्या आहेत. गणेश धामोडकर ०५:०१, ६ जानेवारी २०१० (UTC)

चित्र हवे[संपादन]

कृपया प्रताधिकार विषयाबद्दल अधीक संवेदनशील असावेही नम्र विनंती आहे. कृपया विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा येथे चित्रांबद्दलच्या प्रताधिकारांबद्दल अधीक माहिती घ्यावी आणि चढवलेल्या चित्रांबद्दल प्रताधिकार मुक्तते विषयक माहिती स्पष्ट करावी माहितगार ०५:१६, ११ जानेवारी २०१० (UTC)

माज्या जल्माची चित्तरकथा[संपादन]

नमस्कार,

मी माज्या जल्माची चित्तरकथा लेखाचे पुनर्वर्गीकरण केले आहे. पुस्तकांचे वर्गीकरण साहित्य वर्गांतून करावे, लेखक, कवी, इ. मधून नव्हे. शांताबाई कांबळे हा लेख लिहिला असता तुम्ही माज्या जल्माची चित्तरकथाचे केलेल वर्गीकरण तेथे बरोबर बसेल.

अभय नातू २०:४०, ११ जानेवारी २०१० (UTC)

अरुण कांबळे[संपादन]

प्रिय Adhanter: अरुण कांबळे यांच्यावरील माहितीपुर्ण लेखाबद्द्ल धन्यवाद. काही छोट्या दुरुस्त्यांनी या लेखाला आणखी बहारदार करता येईल

  • चित्रांच्या खाली त्यांची माहिती देता आल्यास उत्तम. उदा. [[चित्र:Arun Kamble in young age.jpg|thumb|200px|left|]] यामध्ये शेवटच्या | चिन्हानंतर कंसाच्या आधी माहिती लिहिली असता ती फोटोखाली माहिती म्हणून येईल.
  • कांबळे आपल्याइतकेच मलाही आदरणीय होते व आहेत, परंतु विकीपिडियासारख्या विश्वकोषीय लिखाणामध्ये आपण आपले पुर्वाग्रह दूर ठेवून एका तटस्थ दृष्टीने लिहिल्यास ते लेख अधिक विश्वसनीय व माननीय होतात. en:Wikipedia:Biographies of living persons या लेखावर एकदा नजर टाकल्यास आपल्याला विकीच्या मानदंडांबद्दल एक कल्पना येईल.
  • आपला लेख अतिशय उत्तम दर्जाचा झाला आहे. मराठी विकी मध्ये असा दर्जा क्वचितच आढळतो.
  • या लेखानंतर दलित पँथरच्या लेखाकडे जरा लक्ष देता आले तर बघावे.

गणेश धामोडकर ०५:०५, १२ जानेवारी २०१० (UTC)


अभिनंदन[संपादन]

नमस्कार अधांतर,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

धन्यवाद[संपादन]

आपण मराठी विकिपीडियावर पुढाकर घेऊन छान योगदान करत आहात. मी माझा मराठी विकिपीडियावरील सर्वाधीक वेळ सहाय्य पाने आणि विकिपीडियन्सना खासकरून नव्याने आलेल्यांना सहयोग देण्यात व्यतीत करतो, तेव्हा केव्हाही अडचण भासल्यास मनमोकळे पणे सांगावे.

माहितगार ०६:०५, ९ जुलै २०१० (UTC)

आपल्या मदतीची गरज आहे.[संपादन]

नमस्कार अधांतर, सर्वप्रथम अभिनंदन आणि धन्यवाद आपण जे अनमोल सहकार्य मराठी विकिवर करत आहात त्यासाठी,मी आपले सदस्यपान पाहिले आणि आपल्या एकंदरीत लिखाणातून असे जाणवले कि आपण मला मदत करु शकतात,मला दलित साहित्याविषयी (ज्याविषयात आपले लेखन सहकार्य आहे) थोडी अधिक माहिती हवी होती म्हणजे असे कि कविता एखादी कादंबरी किंवा इतर काही काव्यात्मक लिखाण असो,लेखकांची सूची तसेच जर मराठी-इंग्रजी अशा स्वरूपात काही माहिती उपलब्ध असेल तर अतीउत्तम,माझ्या एका जवळच्या मित्रास अभ्यासक्रमासाठी ह्या सर्व विषयांची आवश्यकता आहे,मी विकिपीडियावर लिखाण करीत असल्याने मी त्यास मदत करण्यास पुढाकार घेतला ,आता जर आपण मला ह्याविषयात अधिक मार्गदर्शन केले तर मी आपला आभारी असेन.कळावे,लोभ असावा.चे.प्रसन्नकुमार ०४:५५, १० जुलै २०१० (UTC)

  • नमस्कार आपला प्रतीसाद मिळाला,मी आपला आभारी आहे,मला ह्या ठिकाणी एखाद्या प्रसिद्ध काव्य किंवा कादंबरी बद्दल माहिती हवी होती कारण कोश म्हणजे अनेक लेखकांची सूची त्यांचे अनेक विषय आणि ह्यात माझा अधिक गोंधळ उडेल मला फक्त एखादीच कादंबरी किंवा काव्य वगैरे ज्यापद्धतीने लेखन केले आहे अशा ग्रंथाविषयी माहिती हवी आहे किंवा ती जर PDF फॉरमॅटमध्ये मिळत असेल तर कळवावे.इंग्रजीत असेल तर उत्तम कारण मला ज्याला समजावून सांगायचे आहे त्याची मराठी अगदीच सामान्य स्तराची आहे.बघा असेल असे काही तर ताबडतोब कळवा म्हणजे पुढिल वाचन करण्यास मी मोकळा,कळावे,लोभ असावा.செ.प्रसन्नकुमार ०४:३९, १२ जुलै २०१० (UTC)

ता.क.-मी चावडीवर आणि कौल विभागात प्रचालकपदासाठी विनंती केली आहे कृपया आपली प्रतीक्रिया कळवावी.धन्यवाद.

चळवळीचे दिवस[संपादन]

प्रिय अधांतर, चळवळीचे दिवस या लेखाकडे कृपया लक्ष द्यावे. आपण या विषयात जाणकार आहात म्हणून! अश्विनी नामक एका नवीन सदस्याने हा लेख सुरू केला आहे. अभय नातू यांनी त्यावर speedy deletion चे लेबल चिकटवले आहे. कृपया लेख वाचवावा. गणेश धामोडकर ०३:०३, १० सप्टेंबर २०१० (UTC)

<!-धन्यवाद.

नमस्कार अधांतर, कांबळेसरांच्या चीवरवरही लेखन केलेय.लवकरच विकिवर आणेन,आपण जरूर दुरूस्त्या सुचवाव्यात.प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. अश्विनी.