सदस्य:Vaishalipawar06

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिलांचा महानगरपालिकेतील राजकीय सहभाग

अ) महानगरपालिका पातळीवरील महिलांचे राजकीय समावेशन

मुंबई मनपामध्ये देखील महिलांना सतेत वाटा मिळण्यास नवदिचे दशक उजाडावे लागले नवदिच्या दशकातील ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना स्थानिक शासन संस्थामध्ये आरक्षणाच्या धोरणामुळे सतेत वाट मिळाला. कॉग्रेस पक्षाकडून सुलोचना म. मोदी या केवळ एका महिलेस पन्नाशीच्या दशकात महापौर पद दिले गेले होते. (१९५६-१९५७). त्या कॉंग्रेस पक्षाकडून मुंबईच्या पहिल्या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर थेट नव्वदीचे शतक उजाडावे लागले. नव्वदीच्या दशकात कॉंग्रेस पक्षाकडून निर्मला सावंत यांना महापौरपद दिले गेले होते. (१९९४-९५) यानंतर मुंबई मनपामधील कॉंग्रेस पक्षाची परंपरा खंडित झाली. शिवसेना पक्षाच्या विशाखा राऊत (१९९७-९८), शुभा  राउळ (२००७-२००९) आणि शारदा जाधव (१ डिसेंबर २००९ ते ८ मार्च २०१२) या तीन महिला महापौर झाल्या होत्या. यापैकी विशाखा राऊत यांना मनोहर जोशी यांचा पाठीबा होता. शुभा राउळ आणि शारदा जाधव यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. शारदा जाधव यांचे सासरे नगरसेवक होते. जाधव यांचा मनोहर डेकोरेटर आणि टराव्हाल एजन्सी हा व्यवसाय होता. तर दहिसरच्या शुभा राउळ पेशाने डॉक्टर होत्या.