सदस्य:Shree Kshetra Narayan Gad

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
== श्री क्षेत्र संस्थान नारायण गड == 

श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या संस्थानाची स्थापना श्री संत नारायण महाराज यांनी केली हे तीर्थक्षेत्र बीडच्या वायव्य दिशेस असून ते बीडपासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे ३५०० फुट आहे हे क्षेत्र ज्या डोंगरावर आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी सात किलोमीटर असून पूर्वपश्चिम रुंदी तीन किलोमीटर आह. या डोंगराचे विशेष वैशिष्ट्ये असे आहे कि, हा डोंगर कोणत्याही दिशेने पाहिल्यास तो अर्धचंद्राकृती दिसतो .

                    श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाच्या पूर्वेस केतुरां, बेलुरा, रुद्रापूर हि गावे आहेत. पश्चिमेस पौंडूळ आणि लिंबा हि गावे आहेत. दक्षिणेस औरंगपुर आणि हिवारसिंगा हि गावे आहेत. उत्तरेस साक्षाळपिंपरी हे गाव आहे . 
       डोंगराच्या  मध्यभागी  परंतु भूमिगत असा एक विस्तीर्ण तलाव आहे. तलावाकडे जाण्यासाठी पश्चिमे कडून एक भुयारी मार्ग आहे. तो खूप अरुंद व लहान असल्यामूळे एका वेंळी फक्त एकच माणूस बसून सरकत सरकत आत जाऊ शकतो. दुसरा मोठा मार्ग प्राचीन काळी उतरेकडून होता परंतू, डोंगराचा कडा कोसळल्यामुळे आज तो बंद आहे. आत तलावाच्या  काठी सात सिध्द ॠषी तपश्चर्या करीत असत . 
          येथे स्वयंभू महादेव मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, नगद नारायण महाराज आणि संताच्या सात समाध्या हि प्रमुख दैवते असून इतर हि उपदैवते आहेत. या गडाचे विशेषत्व असे आहे कि, या क्षेत्रात केलेले कोणतेही सत्कर्म असो व दुष्कर्म असो . ते ताबडतोब फलीभूत होते म्हणजे त्याचे फळ ताबडतोब विना विलंब मिळते म्हणूनच नारायण महाराजांना  “नगद नारायण महाराज “ म्हणतात .  
    हे संस्थान अतिशय जागृत आहे. येथील वातावरण फार पवित्र आणि शुध्द आहे संपूर्ण संस्थानाचे ४०० खन बांधकाम असून ते सर्व हेमाडपंती पद्धतीचे दगडी आहे. दरवाज्याशिवाय इतरत्र कोठेही लाकूड वापरलेले नाही त्यामुळे ते एखाद्या किल्याप्रमाणे मजबूत आणि प्रेक्षणीय आहे . हे ठिकाण  "धाकटी  पंढरी " या नावाने देखील महाराष्ट्रात प्रशिद्ध  आहे.   

पूर्व इतिहास :-[संपादन]

सध्या आपल्या भारत भूमीवर जी जी प्राचीन तिर्थ क्षेत्र आहेत, त्या त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रास काही न काही विशेष इतिहास आहे. तो फक्त इतिहासच नाही तर त्यात विशेष अशी शक्ती असते. म्हणूनच आज ती आपले श्रद्धास्थान बनलेली आहेत. त्याला अनुसरून श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड”” यांसदेखील चमत्कारांनी औतप्रोत भरलेला स्वतंत्र इतिहास आहे. आपण जेव्हा एखादया ठिकाणाचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास त्या ठिकाणा विषयीच्या लोक कथा, काव्य, शिलालेख, ताम्रपट, आख्यायिका इत्यादी अनेक साधनाचा संग्रह करून त्याचा अभ्यास करावा लागतो व तो सर्व पडताळून पाहून सत्यासत्य ओळखून जी सत्यकथा तयार होते त्यास आपण इतिहास म्हणतो.

     वरील प्रमाणे पुराव्या आधारे जो "श्री क्षेत्र संस्थान नारायणगड" या संस्थानाचा इतिहास तयार केला तो पुढील प्रमाणे आहे. श्री. ह. भ. प. गोविंद महाराज यांच्या काळात सौताडा या गावी रावजी भवानजी हे श्री नगद नारायण महाराजाचे भक्त होऊन गेले त्यांनी गडाविषयी काही काव्य लिहून ठेवलेले आहे. त्यावरून गडाच्या पुर्वेइतिहासावर बराच प्रकाश पडतो त्याच्या आधारे हा इतिहास लिहिला आहे .
      सत्य युगात प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून सीतेसह  लक्ष्मण, हनुमंतराय, सुग्रीव, अंगद, नळ, नीळ, जाबुवंत इत्यादी भक्तगनासह पुष्पक विमानात बसून आयौध्येकडे जात होते. जेव्हा हे विमान आकाशमार्गाने या डोंगरावरून जाऊ लागले, तेव्हा विमानाच्या घंटा आपोआप वाजू लागल्या आणि विमान वरचेवर थांबले ते पुढे चालेना, हे पाहून प्रभू रामचंद्राने जांबुवंतास विमान थाबण्याचे व घंटा वाजण्याचे कारण विचारले त्यावर जांबुवंताने पुढील प्रमाणे उत्तर दिले. 
     देवाधिदेवा प्रभुरामचंद्रा या डोंगराच्या गुहेत तेरा महान असे सिध्द ॠषी तपश्चर्या करीत आहेत. त्यांना तुमच्या चरणाचे दर्शन हवे आहे. त्यासाठीच ते तपश्चर्या करीत असल्यामुळे  त्यांच्या तपोबलाने विमान थांबले आहे. तरी आपण त्यांना दर्शन देण्याची कृपा करावी
            प्रभू रामचंद्र त्यांच्या तपाने आनंदी झाले. त्यांच्या भेटीची ओढ प्रभूरामचंद्रास देखील लगली. त्यांनी तात्काळ आपले विमान खाली उतरविले. गुहेतील सर्व ॠषी मुनींना बाहेर बोलावले आणि सर्वाना दर्शन देऊन कृतार्थ केले. सर्व सिद्ध मुनींनी यथायोग्य प्रकारे पूजा करून त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या तपश्चर्याने आणि आदरातिथ्याने प्रभू रामचंद्रास देखील अत्यानंद झाला त्यांनी  त्यांना वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी सर्व मुनींनी हात जोडून विनंती केली कि, " हे देवादिदेवा प्रभूरामचंद्रा आमचे आपणास असे मागणे आहे, कि, तुमचा दीर्घ काळा पर्यंत आम्हास सहवास लाभाव यासाठी आपण यथे वास्तव्य करावे त्यांचे मागणे ऐकून रामचंद्राने त्यांना सांगितले कि ते या अवतारात शक्य नाही तरी पुढे कलियुगात मी बौद्धावतार घेईल त्यावेळी आपणास माझा दीर्घ सहवास लाभेल असे त्यांनी ॠषीणा वचन दिले आणि तोपर्यंत येथेच तपश्यर्या करीत रहावे अशी आज्ञा देऊन प्रभू रामचंद्र आयौध्येस गेले.   

श्री.प्रभुरामचंद्राची आज्ञा शिरसावंद मानुन सर्व ऋषी मुनी तेथेच तपश्यर्या करून आपला काळ घालू लागले ते ठीकाण म्हणजेच आजचे “ श्री क्षेत्र संस्थान नारायण गड " होय. अशा प्रकारे श्री क्षेत्र संस्थान नारायण गड हि तेरा सिद्धांची अनेक युगांची तपोभूमी आहे. एकाच सिद्ध पुरुषांच्या क्षणिक वास्तव्याने पावन झालेल्या भूमीत अनंत जड जीवांचा उध्दार करण्याचे सामर्थ्य असते. येथे तर तेरा सिद्धांनी काही युगांची तपश्यर्या केलेली आहे. प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रम्हांड प्रभू रामचंद्राच्या पद स्पर्श या भूमीस लागलेला आहे कलियुगात बौध अवतारानंतर स्वतः श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेसह ब्रम्हदेव, महादेवादी देवासह येथे येवून गेले आहेत. एवढी हि भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे.

      यावरून हे संस्थान किती श्रेष्ठ व पावन आणि पवित्र असेल हे स्पष्ट होते.

इतर महत्वाची स्थळे[संपादन]

१ गंगाघाट:[संपादन]

                नारायण गडाच्या उत्तरेला पिण्याच्या पाण्याची एक विहीर आहे. ती गडावरील पाण्याची टंचाई दूर व्हावी म्हणून गोविंद महाराजांनी खोदली त्या विहिरीत प्रथम गंगेचे पाणी आणून टाकले होते. म्हणून त्यास गंगाघाट म्हणतात. तेथे दुसऱ्या महादेव महाराजांचे शिष्य श्री. सिद्धेश्र्वर महाराज यांची समाधी  आहे. 

२ जुने धरण:[संपादन]

                 गंगाघाटाच्या पूर्वेस हे धरण आहे. डोंगराचे दोन तुटलेले कडे बांधकामाने एकत्र जोडून हे तयार केले होते याचे बांधकाम नरसू महाराजांनी केले होते. त्यामुळे गडावरील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली होती परंतु पुढे काही काळाने ते फुटले त्यांच्या साक्षी आज फक्त पडलेल्या भिंती आहेत. 

३ मोती तलाव :[संपादन]

                     हा तलाव खडकाळ जमिनीवर खोदलेला आहे त्यामुळे त्याचे पाणी पावसाळ्यात देखील गढूळ न होता मोठ्या प्रमाणे स्वच्छ असते म्हणून त्यास मोती तलाव म्हणतात. पूर्वीचे महाराज येथे कधी कधी वन भोजनासाठी येत असत. 

४ भागीरथी :[संपादन]

                 पूर्वी गोविंद महाराजाच्या काळात गडावर काशीचे पाणी आणले जाई. एकदा गडाच्या उत्तरेकडे अंदाजे एक किलोमीटर अंतरावर काशीच्या पाण्याच्या कावडीतील काही पाणी सांडले ते जमिनीवर आटून न जाता तसेच साचून राहिले हे जेव्हा गोविंद महाराजांनी पाहिले तेव्हा त्यांनी त्याठिकाणी एक कुंड खोदले आज ते एक पवित्र तीर्थ म्हणून समजले जाते दरवर्षी दसरयाच्या दिवशी या कुंडाची पूजा करून भागीरथीचे तीर्थ घेतले जाते. 

५ गोपाळ तलाव:[संपादन]

                      हा तलाव सोनुबाईच्या जवळ आहे. याचे खोदकाम नरसू महाराजांनी केले होते या ठिकाणी आसपासच्या गावातील गुराखी आपली जनावरे पाणी पाजण्यासाठी आणतात म्हणून त्यास गोपाळ तलाव म्हणतात. 

उपदैवते[संपादन]

१ सोनुबाई[संपादन]

            हे ठिकाण गडाच्या उत्तर बाजूस असून जुन्या धरणाच्या पूर्वेस आहे. त्या विषयी अशी आख्यायिका सांगितली जाते कि, पूर्वी सोनुबाई या नावाची एक गरीब स्त्री होती. तिला एक मुलगा होता. तो दररोज जनावरे चारण्यासाठी गडावर येत असे, गडावर आल्यावर एक काळी कपिला गाय त्यांच्या जनावरात येयून चरत असे. असे तीन चार महिने झाले. त्या मुलाने त्या गायी विषयी आपल्या आईला सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्यास सांगितले कि, गाय कोणाची जरी असली तरी फुकट का सांभाळतोस आज संध्याकाळी जेव्हा गाय परत जाईल तेव्हा तू गाईच्या मागे मागे जा गाय ज्या घरी जाईन त्या घरी तू आतापर्यंतचे सर्व राखोळीचे पैसे मागून घे. 
                    आईच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या गुराख्याने गाईचा पाठलाग केला. तेव्हा ती गाय गडाखाली असलेल्या भुयारात गेली. गुराखी देखील गायीच्या मागो माग होताच. ती गाय अशा ठिकाणी थांबली कि, ज्या ठिकाणी सात महान तपस्वी बसलेले होते त्यांनी मुलास येण्याचे कारण विचारले गुराख्याने सांगितले कि मी हि गाय दररोज सांभाळीत आहे तिच्या राखोळीचे पैसे आणण्यास आईने सांगितले आहे. म्हणून मी आलो आहे. त्यांनी गुराख्यास पैशा ऐवजी गायीचे पडलेले शेन घेऊन जाण्यास सांगितले. गुराख्याने नाईलाजाने ते शेण उचलले, दोन्ही हातात ते बसेना म्हणून आपल्या खांधावरील रुमालात ते बांधले आणि भुयाराच्या बाहेर आला. त्या तपस्व्यांनी पैशा ऐवजी शेण दिले, याचा त्याला राग आला . 
  थोड्या अंतरावर येउन त्याने रुमालावरील शेण टाकून दिले आणि गुरे घेऊन तो घरी आला. रात्री त्याने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली तिला देखील त्या तपस्व्याचा राग आला. दुसऱ्या दिवशी शेणाने भरलेला रुमाल धुण्यासाठी मुलाला मागितला. तिने तो भरलेला रुमाल पहिला तेंव्हा ती आश्यर्य चकित झाली कारण त्या रुमालाला शेणाऐवजी सोने चिकटलेले होते. सोन्याच्या आशेने दोघेही मायलेकरे ज्या ठिकाणी शेण फेकून दिले तेथे आली त्याच ठिकाणी ती दोघेही अद्रूष्य झाली. 
            तेच ठिकाण आज सोनुबाई या नावाने ओळखले जाते आसपासच्या परिसरातील स्त्रिया श्रावण महिन्यात सोनुबाईच्या दर्शनासाठी येतात.            
 ==== २ अमृत महाराज ==== 
                 हे नरसू महाराजांचे एक निस्सीम भक्त होते त्याच प्रमाणे गडावर त्यांची अपार श्रध्दा होती. आपणास आत्म साक्षात्कार व्हावा या हेतूने ते गडावर येउन राहिले होते. त्यांनी नरसू महाराजांची निष्काम भावनेने सेवा केली नरसू महाराजांनी देखील त्याच्यावर पूर्ण कृपा केली होती. म्हणून त्यांना "स्व स्वरूप ज्ञान " प्राप्त झाले होते. त्यांनी नरसू महाराजांना बांधकामात खूप मदत केली. 
         लोक त्यांना "साक्षात्कारी बाबा " म्हणून ओळखीत असत तपोबलाने त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती. त्यामुळे ते लोकांच्या व्याधी दूर करीत असत. लोकांच्या दु:खावर उपाय म्हणून ते कोणाला भस्म, कोणाला लिंबू तर कोणाला काळा दोरा देत असत. एवढयावरच लोक व्याधीमुक्त होत असत आज देखील परिसरातील लोक भस्म लिंबू किंवा काळा दोरा त्याच्या समाधीवर ठेवतात आणि आपले दु:ख दूर करण्याची त्यांना अंत:करण पूर्वक प्रार्थना करतात. असे करण्याने दु:ख दूर झाल्याचा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे.                 

३ हनुमान भक्त भीमाबाई[संपादन]

         भीमाबाई या नरसू महाराजांच्या आई होत्या त्या बालपणापासून मारुतीची उपासना करीत असत. लग्न झाल्यावर देखील त्यांनी आपल्या उपासनेत खंड पडू दिला नाही. त्यांच्या सासरी म्हणजे मुर्शद्पुर या गावी पूर्वी तेल्या मारुती होता. त्याची त्या सेवा करीत. 
               दररोज संध्याकाळी त्या मारुतीला दिवा घेऊन जात असत. त्यात त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. त्या दिवा घरूनच लाऊण नेत असत. त्याच्या हातातील निरांजन कधी विझत नसे. एक वेळ त्याच्या हातातील निरांजन वाऱ्याने विझले, त्या दिवशी त्या तशाच मारुतीच्या मंदिरात गेल्या तेथे त्यांनी निरांजन तर लावले नाहीच पण तू पवनसुत असून तुझ्यासाठी आणलेले निरांजन तुझ्या वडिलांनी का विझवले? असा प्रती प्रश्न मारुतीला केला व त्यांच्या तोंडात एक चापट मारली तेंव्हा पासून त्या जिवंत असे पर्यंत त्यांची सांजवात (दिवा) कधी विझली नाही. 
             पुढे नरसू महाराजांनी त्यांना गडावर आणले तेव्हा आपल्या हातून तेल्या मारुतीची सेवा होणार नाही याचे त्यांना अतोनात दुःख झाले. गडावर येण्यापूर्वी त्यांनी मारुतीचे दर्शन घेतले. आणि आपल्या मनातील दु :ख त्यांनी मारुतीरायाला सांगितले. तेथून निघाल्या पासून गडावर येईपर्यंत मागे वळून देखील पहिले नाही. गडावर मंदिराच्या पूर्वेकडील दरवाज्यात आल्यावर त्यांनी मागे वळून पहिले तो सभामंडपात त्यांना मारुतीराय दिसले. त्यांनी त्यांची तेथेच स्थापना केली. आज गडावरील मंदिराच्या पूर्वेकडून असलेला तेल्या मारुती तोच आहे.    

४ तुळशी भक्त भीमाबाई[संपादन]

                  भीमाबाई या गोविंद महाराजाच्या पत्नी होत्या. त्यांचे गोविंद महाराजाशी फार बालवयात लग्न झालेले होते प्रौढावस्थेत गोविंद महाराजांनी त्यांच्याकडे पत्नी या नात्याने कधीच पाहिले नाही. पती प्रमाणेच आपल्या आयुष्याचे कल्याण व्हावे यासाठी त्या सतत तुळशीची सेवा करीत असत म्हणून त्यांना तुळशिभक्त भीमाबाई  म्हणत असतात. 

गडावर आल्यानंतर त्यांनी अन्नदानाचे कार्य स्वत :कडे घेतले. त्याच्या हयातीत कोणीही गडावर गेलेला मनुष्य उपाशी परत गेला नाही. एवढी येणाऱ्या जाणाऱ्यांची त्या काळजी घेत गोविंद महाराज गाडीवर असतांनाच त्यांनी देह ठेवला, त्यांची समाधी मुख्य देवलयासमोर तुळशी वृंदावनाच्या उत्तरेला आहे.

==== ५ वडबाबा ====
              नरसू महाराजाच्या शिष्यापैकी एक जयसिंग या नावाचे शिष्य होते ते अघोरी विधेत प्रविण होते. त्याच्याकडे नरसू महाराजांनी गडावरील जमिनीच्या राखनीचे काम सोपवले होते. त्यामुळे ते गडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली रहात असत. म्हणून लोक त्यांना "वडबाबा" या नावाने ओळखीत असत. 
             ते आपल्या जादू टोण्याच्या प्रभावाने लोकांचे आजार बरे करीत असत. विशेषत: लहान मुलांचे आजार ते दूर करीत असत. आजही लहान मुलांना होणाऱ्या " सोबणी " या आजारासाठी लोक लहान मुलांना घेऊन पाच वाऱ्या करतात. पाच वाऱ्या केल्यावर मुलांचे आजार बरे झाल्याची अनेक उदाहरणे आज आहेत. त्याचप्रमाणे बाहेरच्या बाधेने ज्या स्त्रीचे मुल जगत नाही अशा स्त्रीया देखील वाऱ्या करतात. यांचे समाधी स्थान गडाच्या दक्षिणेस व यात्रा भरते त्याच्या पूर्वेस आहे.  

गडावरील एकून बांधकाम[संपादन]

   श्री क्षेत्र संस्थान नारायण गडावरील बांधकाम म्हणजे एक लहानसा डोंगरी किल्लाच म्हणावा लागेल. संपूर्ण बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे दगडी असून यात दरवाज्याशिवाय यात कोठेही लाकूड दिसणार नाही. त्याच प्रमाणे राहत्या वाड्याचा दरवाजा कमानीचा वाडा आणि इतर काही ठिकाणचे दगडी शिल्प पाहण्यासारखे प्रेक्षणीय आहे. 
   पूर्व पश्चिम भिंती ३२५ फुट लांबीच्या असून त्यास दक्षिणेकडे एक आणि उत्तरेकडे एक असे दोन बाजूस दोन दरवाजे आहेत. दक्षिणोत्तर भिंतीची लांबी २३० फुट असून या भिंतीला पूर्वेकडून एक मोठा दरवाजा आहे. तो पाहण्यासारखा आहे. त्यास हत्ती दरवाजा म्हणतात त्यातून वाहने आत सहज जाऊ येऊ शकतात. 
   आतील दगडी बांधकाम खालील प्रमाणे :- मुख्य मंदिर ४० खनाचे असून त्यावर अप्रतिम व प्रेक्षणीय अशी तीन शिखरे आहेत. मंदिराखाली तळमजला बांधलेला आहे. उत्तरेकडील बाजूस दक्षिणाभिमुख ९० खणाच्या ओवऱ्या आहेत तर दक्षिणेकडील बाजूस उत्तराभिमुख ६२ खण ओवऱ्या बांधलेल्या आहेत. पूर्वेकडील बाजूस पश्चिमाभिमुख ८८ खन ओवऱ्या असून मधोमध पूर्वेकडील बाजूस पूर्वाभिमुख हत्तीदरवाजा आहे. पश्चिमेकडील बाजूस पूर्वाभिमुख ७२ खणाच्या ओवऱ्या असून त्यावर ५२ खण माडी आहे. त्याप्रमाणे एकूण दगडी बांधकाम ४०४ खनाचे आहे. शिवाय कमानीचा वाडा आणि राहता वाडा यात दगडी तळ मजले आहेत ते वेगळेच. 
         सभामंडप आणि महाराजाचे निवासस्थान सिमेंट कॉक्रीटचे आहे. तर स्वयंपाक गृह चौदा खण लाकडी माळवद व चौदा चौदा पत्र्याच्या दोन खोल्या या प्रमाणे प्रेक्षणीय आणि विशाल दगडी बांधकाम आज पहावयास मिळंते.   

गडावरील प्रमुख दैवते[संपादन]

१ स्वयंभू महादेव मंदिर[संपादन]

       आज आपण श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड येथे दर्शनास गेलो असता आपणास मंदिराच्या उत्तर बाजूस पूर्वेकडे तोंड असलेले जे महादेवाचे मंदिर दिसते तेच स्वयंभू महादेव मंदिर होय. यास स्वयंभू म्हणण्याचे कारण म्हणजे यातील शिवलिंगाची स्थापना कोणीही केलेली नसून ती आपोआप निर्माण झालेली आहेत. 
                हे मंदिर एका सहा गुणीले नऊ फुट आकाराच्या शिळे भोवती बांधण्यात आलेले आहे. याचा विशेष चमत्कार असा कि या शिळेवर दर बारा वर्षांनी एक नवीन शिवलिंग उदयास येते. पूर्वीच्या शिवलिंगांची वाढ होते. या शिळेवर आतापर्यंत एकूण छत्तीस ३६ शिवलिंगाची निर्मिती झाली असून त्या सर्वाची वाढ सुरु आहे. म्हणजेच हे देवस्थान चारसे बत्तीस (४३२) वर्षा पासून आहे निश्र्चित होते. दर वर्षी कार्तिक शु. १५ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते ती त्रिपुरारी पोर्णिमा असते त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध केला. त्या निमीत्ताने आनंद उत्सव म्हणून हि यात्रा भरते पुढे आठ दिवस सुरु असते.               

२ विठ्ठल रखुमाई मंदिर[संपादन]

        स्वयंभू महादेव मंदिराच्या दक्षिणेस विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. येथील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मित्ती माघ शु. १३ शके १७१५ या साली स्रि. नागात नारायण महाराज यांनी केली त्यास आज दोनशे वीस (220) वर्ष पूर्ण झाली आहेत. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे आहे कि, बाहेरील मोठ्या दरवाज्यासह एकूण पाच दरवाजे एका सरळ रेषेत बांधलेले आहेत. त्यामुळे सकाळी उगवत्या सूर्याचे पहिले किरण श्री. विठ्ठलाच्या मुखावर पडते. 

३ श्री नगद नारायण महाराज समाधी मंदीर[संपादन]

      श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या समोर उत्तरे कडे तोंड करून जे मंदिर आहे. तेच श्री. नगद नारायण महाराज समाधी मंदिर होय. यात एक मोठी समाधी आहे त्यात मध्यभागी नगद नारायण महाराजाची, पश्चिमेस महादेव महाराजाची आणि पूर्वेस शेटीबा उर्फ दादासाहेब महाराज यांची अशा तीन समाध्यांची मिळून एकच समाधी बांधलेली आहे. 
       जर एखाधा भाविक भक्ताने श्रध्दा युक्त निष्ठेने अंत:करण पूर्वक प्रार्थना करून आपली प्रापंचिक अडचण दूर करण्याची विनंती नगद नारायण महाराजांना केली तर ती दूर होते असा अनेकांचा अनुभव आहे. 
         श्री. नगद नारायण महाराजांच्या समाधी मंदिराच्या पूर्वेस अनुक्रमे गोविंद महाराज, नरसू महाराज, महादेव महाराज (दुसरे), माणिक महाराज आणि महादेव महाराज (तिसरे) यांची लहान लहान समाधी मंदिर आहेत. 
     या सर्व देवस्थानाचे एकच मोठे विशाल मंदिर बाहेरून दिसते. ते सर्व हेमाडपंथी पध्दतीचे दगडी असून एकूण (४०) चाळीस खन बांधकाम झालेले आहे.   

उत्सव[संपादन]

1. कार्तिक यात्रा[संपादन]

दर वर्षी कार्तिक शु. १५ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते ती त्रिपुरारी पोर्णिमा असते त्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर नावाच्या दैत्याचा वध केला. त्या निमीत्ताने आनंद उत्सव म्हणून हि यात्रा भरते पुढे आठ दिवस सुरु असते. तसेच या यात्रेच्या निमित्ताने गडावर रक्तदान शिबिराचे आयोजन न चुकता केले जाते . या उपक्रमात आतापर्यंत हजारो लोकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे.

2. पालखी सोहळा[संपादन]

संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरलाबहूतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेचीजपवणुक व्हावी या उद्देशाने संस्थेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारीकरीता पंढरपूरला जातांना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यानी ग्रासलेली अनेक छोटी गांवे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गांवांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दुर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण.

श्री क्षेत्र नारायणगड ते पंढरपूर नगद नारायण महाराज दिंडी जाण्याचा मार्ग[संपादन]
 श्री क्षेत्र नारायणगड - बेलुरा - बेलखंडी (पाटोदा ) - पाचेगाव (पाचंग्री ) - दुधडी - गणेगाव - बावची - लहू (लव्हरा ) - कुर्डूवाडी - मोडनिंब -  पंढरपूर.

श्री क्षेत्र नारायणगड ते पंढरपूर नगद नारायण महाराज दिंडी परतीच्या प्रवासाचा मार्ग[संपादन]

पंढरपूर - पांढरेवाडी - उजनी – शेडशिंगा - सालसा तांदळवाडी - उण्डा पिंपळगाव - शिऊर – चुंबळी - हिवरशिंगा - श्री क्षेत्र नारायणग गड.

1. श्री महंत नारायण महाराज[संपादन]

                              पंढरपूर निवासी श्री विठ्ठलाच्या आदेशावरून नारद महामुनींनी अवतार घेतला ते ठिकाण श्री क्षेत्र संस्थान नारायण गडापासून ३५ कि. मी. दूर आहे. बीड आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्हाची सिमा असलेली पुण्यशील आणि पतितांना पावन करणारी दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर गेवराई तालुक्यात सुरळेगाव या गावात आरबड घराण्यात पाटलाचे उदरी, शालिवाहन शके १६५५ साली नारदाने अवतार घेतला. त्याच्या आई वडिलांनी त्यांचे नाव नारायण असे ठेवले.             

नारायणाचे वय थोडे मोठे झाल्यावर ते कधी कधी रानात गुरे घेऊन चारण्यासाठी जात असत. रानात गेल्यावर गुरे सांभाळण्या ऐवजी एकांतात बसत व नामस्मरणात रममाण होऊन जात, त्यात त्यांचा किती वेळ गेला हे त्यांना देखील कळत नसे, त्या वेळी गुरे ढोरे ईतरत्र जाऊन लोंकाचे पिक खातील व नारायणास घरी त्रास होईल, म्हणून स्वतः पांडुरंग गुप्तरूपाने गाई राखण्याचे काम करीत असत.

       आपल्या मुलाला लिहिता वाचता यावे त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना श्री संत एकनाथ महाराजांची पुण्यनगरी म्हणजे श्री क्षेत्र पैठण येथील श्री सदगुरु अनंत महाराजाच्या चरणी ठेवले. तेथे नारायणाचे शिक्षण पूर्ण झाल्यवर अनंत महाराजांनी त्यांना सांप्रदाय पध्दतीने अनुग्रह दिला व सांप्रदाय प्रसाराची आज्ञा देऊन नारायणास स्वगृही पाठवले. 
  घरी आल्यानंतर नारायण महाराजाचे घरात लक्ष लागेना सांप्रदायिक अनुग्रह मिळाल्यामुळे त्यांना सारखा पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास लागला. एके दिवशी ते शेतात औत हाकीत होते, त्यावेळी रस्त्याने वारकरयांची दिंडी पंढरपुरास जात असलेली त्यांनी पाहिली. दिंडी पाहून पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्याची त्यांची ईच्छा प्रबळ झाली. त्याच क्षणी त्यांनी औताला काढण घातले आणि बैलांना गोठयाच्या वाटेला लाऊन औतासह हाकलून दिले बैल नारायणाशिवाय औत घेऊन गोठयावर आले, तिकडे नारायण पंढरपूरला जाण्यासाठी दिंडीत सहभागी होऊन सत्संगाचा आनंद लुटू लागले. वारीहून परत घरी आल्यावर वडील त्यांच्यावर खूप रागावले. ते त्यांनी मुकाट्याने सहन केले. पुढे काही दिवसांनी नारायणाचे पितृछत्र हरपले. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येउन पडली. गरिबीच्या संसार प्रांपाचत ते विविध तापाने पूर्ण होरपळून गेले त्यामुळे त्यांचे मन संसारातून विटले गेले, संसारा विषयी त्याच्या मनात घृणा निर्माण झाली. नंतर ते गाव सोडून निघून घेले, ते परत न येण्याची प्रतिज्ञा करूनच.
         नारायण महाराजांचे जन्मगाव जरी सूरळेगाव असले, तरी त्यांची कर्मभूमी स्वयंभू महादेवाचे आणि ॠषी मुनीचे वस्तीस्थान असलेले ठिकाण म्हणजे आजचे श्री क्षेत्र संस्थान नारायणगड हेच आहे. नारायण महाराजांनी स्वयंभू महादेवाच्या दक्षिणेस "श्री विठ्ठल रुक्मीणीच्या " मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. त्यांची नोंद खालील प्रमाणे करून ठेवली. 
                 श्री नारायण महाराजांनी फसली सन १२०३ शके १७१५ प्रमाथी नाम संवत्सरे माघ मासे शुक्ल पक्षे १३ तिथी सोमवासरे ते दिनी श्री पांडुरंग रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
             या प्रमाणे पत्रिका लिहून ठेवली म्हणजे या घटनेस आज दोनशे वीस (220) वर्ष पूर्ण होत आहेत. भजन, प्रवचन आणि कीर्तन याबरोबरच महाराजाचा अत्रदानावर फार भर होता. त्यांनी भक्तांना दिलेले आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नसत. आज देखील आपले संसारीक दु:ख नाहीसे होण्यासाठी त्यांना श्रध्देने आणि एक निष्ठपणे जर प्रार्थना केली तर ती फलद्रूप होते असा अनेकांचा अनुभव आहे.
            श्री नगद नारायण महाराजांनी गडाची स्थापना करून एकोणवीस (१९) वर्ष समाज प्रबोधनाचे कार्य केले. आपले अवतार कार्य संपले हे जाणून श्री. नगद नारायण महाराजांनी मिती फाल्गुन वध एकादशी शके १७३४ साली आपला देह इहलोकी ठेवून आत्मज्योत अव्यक्त परब्रम्हात विलीन केली व आपली इहलोकीची यात्रा संपवली.    

2. महंत महादेव महाराज (पहिले)[संपादन]

                         बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सीना नदीच्या काठी खडकत नावाचे गाव आहे. या गावातील सर्वसुख संपत्र कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. प्रत्यक्ष योग्यांचा अवतार असल्यामुळे बालपणापासूनच महादेव भक्ती मार्गाला लागले. 
      मोठे झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे लग्न करण्याचे ठरवले. त्यावेळी महादेवाने मला लग्न करायचे नाही आजन्म ब्रम्हचारी जीवन जगायचे आहे असे त्यांना सांगितले. पण कधीतरी ते आपणास लग्नास मजबूर करतील अशी भीती त्यांना वाटू लागली त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधू लागले. एके दिवशी एक वारकरयाची दिंडी पायी पंढरपुरास जात असल्याचे त्यांनी पहिले. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ते गुपचुपपणे दिंडीत सामील झाले आणि पंढरपूरला आले.
  श्री. क्षेत्र पैठण  येथील अनंत ॠषीचे शिष्य श्री. नारायण महाराज हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. ते ज्यावेळी मंदिरात आले.त्यावेळी महादेव आणि शेटीबा महाराजांनी त्यांना पहिले ते दोघांनाही पांडुरंगाच्या चतुर्भुज रुपात दिसू लागले तेव्हा त्या दोघांनी नारायण महाराजाचे चरणी साष्टांग दंडवत घातले आणि आम्हास अनुग्रह देऊन उध्दार करण्याची विनंती केली.त्यांनी त्यांना अनुग्रह दिला नंतर श्री नगद नारायण महाराज, महादेव आणि शेटीबा गडावर आले ते कायमचेच.
 महादेवाने गडावर आल्यानंतर नगद नारायण महाराजांच्या मार्ग दर्शनाखाली एकांत स्थानी तप्चर्या केली. नारायण महाराजानंतर शके १७३४ साली ते गुरु पंरपरेने गडाच्या गादीवर बसले आणि त्यांनी भागवत धर्म प्रसाराचे काम तन, मन, धनाने केले. नगद नारायण महाराजांनी चालू केलेल्या अत्रछात्रात त्यांनी आणखी वाढ केली आणि गडाच्या बांधकामास सुरुवात केली. महादेव महाराजांचे वैशिष्टय असे होते कि ते गड सोडून गडाखाली कधीही भिक्षेसाठी गेले नाहीत. तरी देखील बांधकामासाठी व इतर अनेक कामासाठी त्यांना पैशाची किंवा अत्रधान्यांची गरज पडली नाही. 
   त्याच्या काळात त्यांनी स्वयंभू महादेवाचे मंदिर हेमांडपंथी पध्दतीने बांधले. महादेव मंदिराच्या दक्षिणेस श्री. विठ्ठल रखुमाइचे दगडी मंदिर देखील त्यांनीच बांधले. एकूण (१५) पंधरा वर्ष ते गडाच्या गादीवर राहिले आणि गडाच्या बांधकामाची मुहूर्त मेढ रोऊन आपले नाव अजरामर केले. मित्ती पौष वध ९ शके १७४९ साली महादेव महाराजांनी आपली आत्मज्योत परब्रम्हात विलीन केली.       

3.महंत श्री.शेटीबा उर्फ दादासाहेब महाराज[संपादन]

                           श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाच्या स्थापनेपूर्वी गडाखाली असलेल्या भुयारात जे ॠषी तप्चर्या करीत होते. त्यांत सिध्दनाथ नावाचे एक ॠषी होते. त्यांनी भागवत धर्म प्रचारासाठी भूतलावर अवतार घेतला. त्याच्या आईवडिलांनी त्यांचे नाव शेटीबा असे ठेवले लोक त्यांना दादासाहेब या नावाने ओळखीत असत त्याच्या आईवडिलांची घरची परिस्थिती फार श्रीमंत होती. शेटीबा हे संताचे अवतार होते त्यामुळे त्यांना अवतार कार्याची जान होती. ऐहिक सुखात त्यांचे मन कधीच रमले नाही.  
                     शके १७४९ साली त्यांचे गुरुबंधू महंत पहिले महादेव महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर ते गडाच्या गादीवर आले. नामस्मरणा व्यतिरिक्त वेळात ते नेहमी मौन असत. कोणासही बोलत नसत. गडाचा कारभार व्यवस्थित चालवा यासाठी ते स्वतः जवळ पाटी व पेन्सील ठेवीत व लिहून दाखऊन सर्व कामे करून घेत बोलणे फारच जरुरीचे असेल तर रात्री दहाचे नंतर दोन तीन मिनिटे बोलून पुन्हा मौनावस्थेत रहात.
      त्यांचे विशेष वैशिष्टये असे होते कि ते जेवढा नैवेध देवाला अर्पण करीत, तेवढेच अत्र ते स्वःता च्या उदरनिर्वाहासाठी खात असत इतर वेळी ते उपवास करीत असत. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांस  जेवल्याशिवाय परत जाऊ देत नसत. त्याप्रमाणे येणाऱ्यांच्या हातून देखील काही सेवा घडावी, आपण गडावर फुकटचे अत्र खाल्ले अशी भावना कोणाची होऊ नये. यासाठी दर्शनास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ते दगड उचलण्याचे काम करून घेत असत. 
              असे हे महान तपस्वी संत महादेव महाराजानंतर आठ वर्ष गडाच्या गादीवर राहिले मित्ती शु. ७ शके १७५७ साली वैकुंठभुवनी जाऊन आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाले.            

4. महंत श्री गोविंद महाराज[संपादन]

                बीड जिल्यातील कारचुंडी या गावी शिंदे घराण्यात श्री. गोविंद महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे वैशिष्टय असे होते कि, ते बसले असता त्यांचे गुडघे कानाच्या वर जात असत.. ज्योतिष सिद्धांतानुसार "ज्या व्यक्तीचे गुडघे कानाच्या वर जातात ती व्यक्ती कोणीतरी संत किंवा देवता यांचा अवतार असते" म्हणून लहानपणापासूनच लोक त्यांना 'अवलिया बाबा' म्हणत असत. 
       ते सतत आसपासच्या तीर्थक्षेत्रावर सदगुरु भेटतील अशा भावनेने जात असत. असेच एकदा ते शु. एकादशीला श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड येथे आले. त्यावेळी गडावर महंत दादासाहेब महाराज हे होते. दादासाहेबाच्या कीर्तनाचा त्यांच्या मनावर असा विलक्षण परिणाम झाला कि एके दिवशी गोविंदाने मोठया कळवळीने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी, मला अनुग्रह देऊन माझा उध्दार करावा अशी अंतः करण पूर्वक प्रार्थना दादासाहेब महाराजांना केली.       
   पुढे त्यांनी गडाचा सर्व कारभार गोविंद महाराजावर सोपवला आणि ते त्यांना फक्त मार्गदर्शन करू लागले. त्यांनी गोविंद महाराजांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले. मित्ती माघ शु. ७ शके १७५७ साली दादामहाराजांनी वैकुंठ गमन केले त्यावेळी गोविंद महाराजांना फार दुः ख झाले. गडाच्या गादिवर आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या गुरुचे राहिलेले अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचे ठरविले आणि वेगाने कामास सुरुवात केली.  
       सर्व प्रथम त्यांनी श्री. नगद नारायण महाराजांचे समाधी मंदिर बांधले. नगद नारायण महाराजांच्या समाधीच्या डाव्या बाजूस पहिले महादेव महाराज आणि उजव्या बाजूस शेटीबा उर्फ दादा महाराज यांची समाधी आहे. या तीन समाध्यांची मिळून एकच मोठी समाधी गोविंद महाराजांनी बांधली तीच श्री. नगद नारायण महाराजांची समाधी म्हणून आज आपण दर्शन करतो. विठ्ठल रखुमाई मंदिरावरचे शिखर त्यांनी बांधले.     
 गोविंद महाराजांनी गंगाघाट खोदून पाणी टंचाई दूर केली. त्या आधी उन्हाळ्यात गडावर आसपासच्या गावातून लगडीने पाणी आणावे लागत असे आजच्या सभामंडपाच्या जागी जो दगडी सभामंडप होता तो त्यांनी बांधला होता. दोन दीपमाळा बांधल्या चोहोबाजूनी ज्या पोवळी होत्या त्या जागी भिंती बांधल्या भिंतीलगत वावऱ्या बांधल्या या प्रमाणे कामे करून सर्व गैरसोयी दूर केल्या. 
     आपले सदगुरू वैकुंठवासी शेटीबा महाराज यांचे गडाच्या बांधकामाचे राहिलेले अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करू शकलो याचे त्यांना मोठे समाधान लाभले आता आपण गुरु ॠणातून मुक्त झालो हे त्यांनी जाणले आणि मित्ती मार्गशीर्ष वध ३० (अमावस्या) शके १७८९ साली आपली आत्मज्योत निर्गुण निराकार परब्रम्हात विलीन केली.           

5. महंत नरसू महाराज[संपादन]

               बीड तालुक्यातील मुर्शद्पुर या गावी श्री. नरसू महाराज यांचा जन्म झाला बालपणापासूनच त्यांचा परमार्थाकडे ओढा होता 
           अशातच नरसू आपल्या घराच्या अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून नामस्मरण करू लागला. त्यांची झाडाखाली बसण्याची वेळ आणि जागा ठराविक असे. अशी त्यांची साधना चालू असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला कि, ते ज्या लिंबाच्या झाडाखाली नामस्मरणाला बसत त्या झाडाची त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या फांदीचा पाला गोड झाला व आजही आहे, ही दंतकथा नसून सत्यकथा आहे. फक्त एकाच फांदीचा लिंबाचा पाला गोड आणि बाकीचा सर्व कडू असणारे अदभुत आणि चमत्कारीक लिंबाचे झाड त्यांच्या जन्मठीकाणी म्हणजे मौजे मुर्शदपुर ता. जि. बीड या गावी आज ही अस्तीत्वात आहे.      
  एका दिवाळीच्या दिवशी त्यांचे वडील स्वतः नरसुसाठी लाडू करंज्या वगैरे पक्वान्नाचे जेवण घेऊन गेले. त्यांनी नरसुच्या हाती जेवण दिले आणि स्वतः त्यांच्या नकळत झाडावर चढून बसले. दुपारची जेवणाची वेळ झाली तेंव्हा नरसुने नित्याप्रमाणे आपले सर्व जेवण गाईगुरांना चारले आणि आपण स्वतः लिंबाचा पाला खाल्ला व पाणी पिऊन भगवंताच्या नामस्मरणात रममाण झाले. हे जेव्हा वडिलांनी पाहिले त्यांना फार काळजी वाटू लागली. त्यांनी नरसुवर कोणाकडून तरी उपचार करण्याचे ठरविले. 
     त्यांच्या आईवडिलांनी त्यांना नारायण गडावर आणले.त्यावेळी गडावर असलेले महंत श्री. गोविंद महाराज यांच्या चरणी मस्तक ठेऊन त्यांना नरसुची बालपनापासुनाची सर्व हकीकत सांगितली. गोविंद महाराजांनी नरसुला आपाद मस्तक न्याहाळले आणि हा फार महान तपस्वी होणार असल्याचे ओळखले. त्यांनी नरसुला येथेच ठेऊन जाण्यास त्यांच्या आईवडिलांना सांगितले. 
       नारायण गडावर आल्यावर नरसुच्या खऱ्या साधनेला सुरुवात झाली. त्यांनी पूर्ण पने अन्नाचा त्याग केला लिंबाचा पाला आणि फराळाचे पदार्थ खाऊन ते उपवास करू लागले तो नियम त्यांनी आयुष्यभर पाळला. म्हणून त्यांच्या समाधीला आजदेखील नित्य फराळाचा नैवेध अर्पण करतात. 
     नरसू महाराजांनी एकूण छत्तीस (३६) वर्ष मोठी खडतर तप्चर्या केली त्यामुळे त्यांना अशी सिद्धी प्राप्त झाली होती की, बांधकामावरील मजुरांची मजुरी ते स्वतः देत असत. पिशवीत हात घालून ते मोघम पैसे काढीत व न मोजता मजुराला देत असत. जेव्हा मजूर बाजूला जाऊन ते पैसे मोजीत तेव्हा ते त्यांच्या मजुरी इतकेच भरत असत कमी किंवा जास्त भरत नसत.     

गोविंद महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांनी गोविंद महाराजांच्या समाधीचे बांधकाम केले. तळमजला बांधला,गवंड्याचा वाडा बांधला, पश्चिम आणि उत्तर बाजूला असलेल्या दोन्ही वेशी त्यांनी बांधल्या, पूर्वेकडील बाजूस असलेला सर्वात मोठा हत्ती दरवाजा त्यांनी बांधला, सामानाची ने आण करण्यासाठी येथे उंट होते यावरून हे संस्थान किती संपन्न होते याची कल्पना येते.

       नरसू महाराज खूपच थकले होते त्यांना चालणे फिरणे देखील जमेना त्यामुळे इतर ठिकाणी जायचे असल्यास ते मेण्यात बसून जात असत, हा मेणा त्यांना हैद्राबादच्या निजाम सरकार कडून मिळाला होता. अशा या महान तपस्व्याने मित्ती मार्गशीर्ष व (१) प्रतिपदा शके १८०५ ई. स. १८८३ साली आपला देह ठेवला आणि वैकुंठगमन केले.

6.महंत महादेव महाराज (दुसरे)[संपादन]

    बडोधाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या वंशात महादेव महाराज यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मगांव तालुका कर्जत (जि. अहमदनगर) सीना नदीच्या काठी असलेले सितपुर हे गांव आहे. ते लहानपणापासूनच ईश्वर भक्त होते. त्यामुळे त्याच्या आयुष्याचे कल्याण व्हावे यासाठी ते योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सद्गुरूचा शोध करू लागले. 
    त्या काळी मराठवाड्यात ज्ञानदानासाठी प्रसिद्ध असलेल्या "श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाविषयी" बरीच माहिती त्यांनी ऐकली होती. म्हणून त्यांनी त्यावेळी गादीवर असलेले महंत श्री. नरसू महाराजांची त्यांनी भेट घेतली आणि महादेवास येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्याची विनंती केली, ती नरसू महाराजांनी मान्य केली. 
         गडावर आल्यावर नरसू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कठोर तप्चार्या केली. त्यांच्या कठोर तपोबलाने अल्प काळातच त्यांना काही सिद्धी आपोआप विनासायास प्राप्त झाल्या होत्या ते फार कडक स्वभावाचे होते. 
    एकदा स्वयंभू महादेवाच्या मंदिराच्या शिखराचे बांधकाम चालू होते ते स्वतः वर चढून शिखराची पाहणी करीत होते त्याचं वेळी नरसू महाराजांनी महादेवास हाक मारली ती त्यांनी शिखरावरूनच ऐकली आणि जमिनीवर असल्याप्रमाणे ते धावतच निघाले त्याचा परिणाम ते वरून पडण्यात झाला तेव्हा कामावरील मजूर " महाराज पडले महाराज पडले " असे म्हणून मोठ्याने ओरडले. तो पर्यंत तर महादेव उठून गुरुजी पर्यंत धावत गेले व काय आज्ञा आहे हे विचारू लागले. शिखरावरून पडून देखील महादेवास थोडीसुध्दा ईजा झाली नाही कारण एकनिष्ठ आणि निस्सीम भक्ताचे रक्षण पांडुरंग त्यांच्या मागेपुढे राहून करीत असतात. 
        पुढे गाईंची संख्या खूपच वाढली संस्थानाकडे गाई चरण्यासाठी जमीन नव्हती. हे संस्थान त्या काळी हैद्राबादच्या निजाम सरकारच्या राज्यात होते. आपण निजाम सरकारकडे जाऊन गडाच्या भोवतालची पाडीत जमीन गाईसाठी मागावी असे वाटले त्यांनी आपला विचार गुरुवर्य नरसू महाराजांना सांगितला व हैद्राबादला जाण्याची आज्ञा ध्यावी अशी विनंती केली. 
      हैद्राबादला पोहचल्यावर महादेव महाराजांना दरवाज्यात पहारेकऱ्यांनी अडवले. एक शिपाई राजाची परवानगी घेण्यासाठी आत गेला निजाम सरकारने त्यांना भेटण्याचे नाकारले त्यामुळे महाराजही हट्टाला पेटले, व जोपर्यंत सरकार भेटत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाही असे सांगून दरवाज्याच्या समोर धरणे धरून बसले व नामस्मरणात तल्लीन झाले. त्यांनी तीन दिवस दरवाजा सोडला नाही. त्यांनी पाण्याचा घोट देखील घेतला नाही. चौथ्या दिवसी जेव्हा शिपायाने महाराज बसून असल्याचे सांगितले तेव्हा निजामास राग आला त्याने महाराजांना कैद करून जेलमध्ये बंद करण्यास सांगितले शिपायांनी ताबोडतोब महाराजास धरले आणि जेलबंद केले व निघून गेले. परंतु आपल्या तपोबलाने महाराज क्षणाचाही विलंब न लागता मुक्त झाले. व शिपायाच्या अगोदर येउन दरवाज्यात येउन उभे राहिले. असे सात वेळा झाले तेव्हा निजामास दरदरून घाम फुटला होता आपल्या समोर उभा असलेला गोसावी हा साधासुधा नसून कोणीतरी महान अवतारी महात्मा असावा. त्याने ताबडतोब महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घातले आणि क्षमा मागितली. 
   दुसऱ्या दिवशी मोठया आदराने महाराजांना दरबारात आणले व त्यांच्या मागण्याप्रमाणे नऊ चाहूर जमीन दान दिल्याची घोषणा केली. त्याच प्रमाणे निजामाने स्वखुशीने नारायण गड दैवतास नंदादीप व नैवेध यासाठी प्रतिदिन पाच रुपये देण्याविषयीचा ताम्रपट (तांब्याच्या पत्र्यावर कोरलेली सनद) चार पितळी बिल्ले, आणि नरसू महाराजासाठी एक मेणा या वस्तू भेट म्हणून दिल्या तो मेणा आजही श्री. क्षेत्र संस्थान नारायण गड येथे पाहायला मिळतो. 
निजाम सरकारने महादेव महाराजांना जे चार पितळी बिल्ले दिले त्यावर उर्दू व मराठी भाषेतून पुढील मजकूर कोरलेला आहे. "फसली सन १३०४चपरास संस्थान नारायण गड महंत तालुके पाटोदा जिल्हे बीड नं. १ या प्रमाणे मजकूर आहे. 
   नरसू महाराजानंतर शके १८०५ ईसवी सन १८८३ साली महादेव महाराज गडाच्या गादिवर बसले त्यांच्या वाणीतून बाहेर पडलेला कोणताही सब्द खोटा झाला नाही. साधना करीत असताना कधी कधी ते एक एक प्रहर म्हणजे तीन तीन तास पाण्यावर तरंगत रहात किंवा पाण्यात बुडी मारून सहजपणे रहात असत. त्यांच्या काळात त्यांनी उत्तरेकडील भिंती लगत काही वावऱ्या बांधल्या, नरसू महाराजांची समाधी बांधली, स्वयंभू महादेव मंदिरावरील शिखराचे काम सुरु होते, त्यावेळी मित्ती जेष्ठ व. (९) नवमी शके १८०७ इ. स. १८८५ साली त्यांनी आकस्मिकपणे देह ठेवला आणि ते पंचत्वात विलीन झाले.  

7. महंत माणिक महाराज[संपादन]

    माणिक महाराजाच जन्म कर्जत तालुक्यात सीना नदीच्या काठी असलेल्या सितपूर या गावी झाला. ते दुसरे महादेव महाराज यांचे धाकटे बंधू होते. माणिक महाराजांना त्यांच्या वडील बंधूचा अनुग्रह लाभला होता. तपश्यर्या पूर्ण झाल्यावर ते आपले गुरु महादेव महाराज यांचे जवळ गडावर येऊन राहिले आणि त्यांना गडाच्या कामात मदत करू लागले. 
 शके १८०७ साली महादेव महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर ते गडाच्या गादीवर बसले आणि कारभार पाहू लागले. त्यावेळी एकदा बीड जवळच्या पालवण या गावचे ५-५० लोक महाराजांच्या दर्शनासाठी पायी चालत आलेले होते. वेळ दुपारची होती त्यामुळे सर्वांनाच सपाटून भुक लागल्या होत्या आता येथे जेवण मिळाले तर बरे होईल असे सर्वांना वाटू लागले. महाराजांनी लोकांची अंतरभावना जाणली ते उठून उभे राहिले आणि स्वयंपाक होत आहे असे सांगून वाड्यात गेले. थोड्या वेळाने बाहेर येउन सर्वाना जेवण्यास बोलावले. 
       गादीवर आल्यानंतर त्यांनी आपले गुरु महादेव महाराज यांच्या काळांत अपूर्ण राहिलेले स्वयंभू महादेव मंदिरावरील शिखराचे काम पूर्ण केले.पश्चिमेकडील राहता वाडा बांधला (२६) खन माडीचे बांधकाम पूर्ण केले. माडीच्या उत्तरेला तळघरासहकमानीचा वाडा बांधला. पश्चिमेकडील वाड्याचा अत्यंत शोभिवंत नक्षीदार दरवाजा बांधला त्यांच्या मध्यभागी एक लेख लिहिलेली शीळा बसवली आहे. ती आजही वाडयाच्या दक्षिण दरवाज्यावर वाचावयास मिळते. 
 माणिक महाराज स्वतः वेळ मिळेल तेव्हा मजुरा बरोबर अंग मेहनतीचे व कष्टाचे काम करीत असत.ते उत्तम समाज घडवण्याचे कार्य तर करीत असतच त्या बरोबर गोरगरिबांना आर्थिक मदत देखील करीत असत अनेक गरिबांच्या मुला मुलींची लग्ने महाराजांनी स्वखर्चाने केली. 
 असे हे महान भगवद भक्त थोर समाज सेवक व समाज प्रबोधक श्री. माणिक महाराज गडाच्या गादीवर (५२) बावन वर्ष होते. मित्ती जेष्ठ शु. १३ शालिवाहन शके १८५९ इसवी सन १९३७ या दिवशी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपऊन शिवलोकी प्रयाण केले. 

8. महंत महादेव महाराज (तिसरे)[संपादन]

 श्री. महादेव महाराज यांचा जन्म मित्ती मार्गशीर्ष व २ शके १८५३ इसवी सन १९३१ साली रोजी शुक्रवार दिवशी पाटोदा तालक्यातील मौजे पौंडुळ या गावी झाला. नारायण गडाच्या परिसरातील पुण्यभूमीत त्यांचा जन्म झाला. 
        शालीवाहन शके १८५९ साली महंत माणिक महाराज कैलासवासी झाले. त्यावेळी नारायण गडाच्या गादीचे आठवे वारस म्हणून श्री. महादेव महाराज यांच्यावर जवाबदारी पडली अगदी बालवयात गडाच्या गादीवर येणारे श्री. महादेव महाराज हे पहिलेच महंत आहेत.त्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही. परंतु आपला अध्यात्मिक अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे या विषयी त्यांना फार तळमळ लागली ती पूर्ण करण्यासाठी ते श्री. क्षेत्र पंढरपूर येथे राहू लागले तेथे तीन वर्ष राहून आपला अभ्यास पूर्ण केला. 
      श्री. क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी गेल्यावर तेथे वारकऱ्यांची राहण्याची सोय नव्हती त्यामुळे त्यांनी ता. ३१-१२-१९६३ रोजी बंकटस्वामीच्या मठा जवळ संस्थानाच्या मठासाठी जागा खरेदी केली. जागेची दक्षिणोत्तर लांबी १५२ फुट असून पूर्वपश्चिम रुंदी ७२ फुट आहे. त्या जागेवर सध्या ५२ खन लाकडी माळवद व तितकीच वर माडी असे बांधकाम आहे. त्यामुळे यात्रेकरूंची सोय झाली. 

श्री. क्षेत्र पंढरपूर प्रमाणेच त्यांनी नारायण गडावर देखील बांधकाम केले श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर व स्वयंभू महादेव मंदिर यांच्यावरील दोन्ही शिखरांचा जीर्णोध्दार व रंगरंगोटीचे काम त्यांनी दिनांक २०-१०-१९७९ रोजी केले. श्री. नगद नारायण महाराज यांचे समाधी मंदिरा वरील सोळा (१६) मीटर उंचीचे नवीन शिखर त्यांनी बांधले या शिखरावर सर्व संताच्या प्रतिमा कोरल्या आहेत या शिखराचे बांधकाम दिनांक २६-४-१९८३ रोजी पूर्ण झाले. त्यामुळे तेथील सौंदर्यात फार आकर्षकता आणि भव्यता आली आहे.

          मधल्या वाडयात स्वयंपाकासाठी चौदा खन लाकडी माळवदाचे बांधकाम केले. चौदा पत्र्याच्या दोन खोल्या बांधल्या त्यांनी शासनाकडून देखील बरीच कामे करून घेतली. गडावर लाईटची देखील सोय झालेली आहे. त्यांनी मौजे बेलुरा या गावी एक विहीर खोदून तीन किलोमीटर एवढया अंतराची पाईप लाईन केली व गडावरील पिण्याच्या पाण्याची सोय केली. गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी गडावर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. जे विधार्थी अत्यंत गरीब आहेत त्यांच्यासाठी संस्थानामार्फत मोफत वसतीगृह चालू केले.
 ह सर्व कामे करीत असताना महाराजांनी धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या श्रध्देने चालूच ठेवले. दरवर्षी मित्ती जेष्ठ व ३० (अमावश्या) या दिवशी गडावरून आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरला जाते. तेथे पांडुरंगाचे दर्शन व कला घेऊन दिंडी परत पायी पायी मित्ती आषाढ व ९ (नवमी)या दिवशी गडावर परत येते. पंढरपूर प्रमाणेच मित्ती फाल्गुन व (२) बिजेच्या दिवशी दिंडी पायी पायी श्री. संत एकनाथ महाराज यांच्या गावी म्हणजे श्री क्षेत्र पैठणला जाते व एकनाथ महाराजांचे दर्शन व काला घेऊन व्दादशीला परत येते. या दोन्ही दिंड्यामध्ये भाविक भक्त मोठया संख्येने हरीनाम संकिर्तनाचा आनंद उपभोगतात. 
         श्री. क्षेत्र संस्थान नारायण गडाचे वार्षिक अखंड हरीनाम सप्ताह देखील मोठ्या उत्साहाने साजरे होतात. श्री. महादेव महाराज यांच्या स्वभावातील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांना जास्त बोलणे आवडत नाही. त्यांनी जर एखादयाला अंतः करण पूर्वक आशीर्वाद दिला तर तो कदापि वाया जात नाही. असेच एकदा बेलुरा या गावातील श्री. जनार्दन गवते या गृहस्थाची वाणी अचानक बंद झाली. त्यांनी खूप डॉक्टरी ईलाज केले, परंतु बोलता येईना. त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांना घेऊन गडावर आले. त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी महाराजांना सर्व हकीगत सांगितली. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे जनार्दन गवते चार पाच दिवस गडावर राहिले. शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर आरतीच्या वेळेस जवळ उभा केले. नंतर नगद नारायण महाराजांचे स्मरण करून भस्म पाण्यातून पिण्यास दिले. व नगद नारायण महाराज कि जय असे म्हणण्यास सांगितले. परंतु पहिल्या वेळेस त्यांच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. दुसऱ्यावेळी अस्पष्ट असा आवाज निघाला व तिसऱ्या वेळी पूर्वी होता त्याप्रमाणे त्यांनी गजर केला. हा चमत्कार पाहणारे हजारो लोक आज साक्षी आहेत. 
     या पूर्वी गडावर जे जे महात्मे होऊन गेले त्यांच्या त्यांच्या गावी महादेव महाराज स्वतः गेले आणि त्या त्या गावात त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याची विनंती केली. ती गावकऱ्यांनी मोठया आनंदाने केली. या पुण्यातीथिला व गावोगावी होणाऱ्या सप्ताहा च्या निमिताने महाराजांचा बराच काळ प्रवासात जात असे त्यामुळे जेवणात नियमितपणा राहिला नाही. आहाराच्या अनियामितेमुळे त्यान मधुमेह झाला. शरीर उतरवयास लागल्यामुळे साथ देईनासे झाले त्यातच इलाजासाठी घेतलेल्या औषधाचा शरीरावर दुष्परीनाम होऊ लागला. डॉक्टराच्या उपचाराला शरीर साथ देईनासे झाले. उपजे ते नासे या सृष्टीच्या नियमानुसार महंत श्री महादेव महाराजानी वयाच्या ७९ वर्षी मिती आषाढ वद्धय ४ मंगळवार रोजी दि. १९-०७-२०११ दुपारी ३ वाजता आपला देह ठेवला आणि वैकुंठगमन केले.

महाराज गेल्याची वार्ता संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली मिळेल त्या वाहनाने लाखो लोक अंत्य दर्शनासाठी गडावर जमा झाले. त्याचबरोबर सर्व संत, महंत देखील आले. महाराजांनी आपल्या उत्तराधिकार्याची लिखित नोंद करून ठेवली नव्हती. अशा पेच प्रसंगात आलेल्या सर्व संत, महंताच्या मार्गदर्शनाने व संस्थानाच्या विश्वस्त मंडळ, परिसरातील सर्व गावच्या नागरिकांच्या विचाराने ह.भ.प. श्री शिवाजी महाराज शेकटेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ह.भ.प. श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते संन्याशाच्या परंपरेनुसार महंत महादेव महाराज यांना समाधी देण्यात आली.

9. महंत श्री शिवाजी महाराज[संपादन]

श्री शिवाजी महाराज यांचा जन्म बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यात शेकटे या खेडे गावात श्री मनोहर रामराव शेंबडे व सागरबाई शेंबडे या दाम्पत्यांच्या घरात दि. १२-०४-१९५४ सोमवार या दिवसी झाला. त्यांच्या घराण्यात पूर्वीपासूनच वैष्णव सांप्रदायिक वारसा चालत आलेला होता. घरात सर्व माळकरी मंडळी होती व नेहमी पांडुरंगाची उपासना होत होती. श्री क्षेत्र नारायण गडाची वारी कोणातेही संकट आले तरी बंद पडू द्यायची नाही असा त्यांच्या घरातील नियम होता. त्यामुळे अध्यात्मिक संस्काराचे बाळकडू त्याना घरातूनच मिळाले होते. शिवाजी महाराज बालपणी मित्रांना जमवून फुटक्या डब्याचा पखवाज बनवायचे व दगडांना ताळ समजून भजन करायचे व भजन संपल्यावर घरोघरी फिरून धान्य जमा करायचे त्यानंतर त्याची कन्या आमटी करून सर्वांना प्रसाद करून वाटायचे. या त्यांच्या खेळांचे गावकरी खूप कौतुक करीत असत . गावात सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते चकलांबा येथील शाळेत जाऊ लागले परंतु तेथे इयत्ता नववी नंतर त्यांचा अध्यात्मिक शिक्षणाकडे ओढ वाढल्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण बंद केले. एके दिवसी पुढील अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी महाराज फक्त अंगावरील कपड्यानिशी व पुण्यापर्यंत पुरतील एवढे पैसे घेऊन आळंदीला निघाले. पुण्यात आल्यानंतर एका सज्जन गृहस्थाच्या मदतीने त्यांनी आळंदी गाठली. तेथे त्यांनी ह.भ.प. श्री जयराम महाराज यांच्या आश्रमात २ वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे ४ वर्षे गुरुवर्य जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत काढली या ४ वर्षाच्या काळात त्यांना ह.भ.प. श्री विठ्ठल महाराज घुले आणि ह.भ.प.श्री मारोती महाराज कुऱ्हेंकर यांचे मार्गदर्शन लाभले.

 आळंदीहून गावी परत आल्यावर वारकरी संप्रदायाचा प्रसार व्हावा व आपल्या हातून समाज प्रबोधनाचे  कार्य घडावे या उदात्त  हेतूने गावोगावी कीर्तन , प्रवचन सुरु केले. घराण्यात सुरु असलेली श्री क्षेत्र नारायण गडाची शुद्ध एकादशीची वारी ते करू लागले . गडावर वारी सुरु केल्यानंतर महंत ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराजाची ओळख झाली. शिवाजी महाराजांचे पहिले कीर्तन मौजे सोनगावात नारळी सप्ताहानिमित्त झाले. मग महादेव महाराजांनी त्यांना प्रत्येक नारळी सप्ताहात तसेच गडावरील कार्याक्रमात कीर्तन व प्रवचन करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुरु शिष्याचे नाते निर्माण झाले आणि महादेव महाराज त्यांना मार्गदर्शन करू लागले. पुढे महादेव महाराजांची तब्बेत ठीक नसताना त्यांनी दिलेला आदेश पाळून  सलग १५ वर्षे नारळी सप्ताहात काल्याचे कीर्तन शिवाजी महाराजांनी केले. त्यांनी पहिले मंदिर गावी बांधले ते श्री संत जगद्गुरू तुकोबारायाचे. आपल्याला समाज प्रबोधन करण्यासाठी कायम स्वरूपी एखादे ठिकाण असावे यासाठी त्यांनी महादेव महाराजांकडे मागणी केली. महादेव महाराजांनी मौजे मादळमोही  तालुका गेवराई जि. बीड येथील ग्रामस्था बरोबर चर्चा केली त्यास होकार देऊन गावातील श्री सीताराम धोंडीराम हारकुट यानी स्वत:च्या मालकीची ३० गुंठे जमीन दान दिली.
    मग श्री शिवाजी महाराजांनी परिसरातील गावकर्याच्या मदतीने तेथे श्री संत जगद्गुरू तुकोबारायाचे भव्य मंदिर, सभामंडप व भक्तीनिवासाचे काम पूर्ण करून दि. ३१-०१-१९९९ मिती माघ शु.१५ रोजी तुकोबारायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्या निमित्त आयोजित सप्ताहाला वै.महंत महादेव महाराजांनी आठ दिवस मुक्काम करून स्वतः च्या हाताने या नवीन मादळमोही संस्थानाच्या गादीवर शिवाजी महाराजाना बसवले. तेव्हापासून आजपर्यंत तेथे प्रती वर्ष अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. शिवाजी महाराजांनी इ.स. १९९७ पासून दर महा शुद्ध एकदासीला सुरु केलेली मादळमोही ते श्री क्षेत्र नारायणगड पायी दिंडी आजही सुरु आहे. 
   वै. महंत महादेव महाराजांनी गडावरील अखंड हरीनाम सप्ताहाचे नियोजन शिवाजी महाराजाकडे सोपवले ते त्यांनी सक्षमपणे पार पाडले. तसेच त्यांनी ५० गावात अखंड हरीनाम सप्ताहा सुरु केले. ज्या गावातील मारोती उघड्यावर किंवा मंदिर पडेलेले होते तेथे त्यांनी गावकर्यांच्या मदतीने शिखारासाहित मंदिर बांधले. मौजे मादळमोही पासून ३ किमी अंतरावरील विठ्ठलगड नावाच्या जुन्या संस्थानाचा जीर्णोद्धार केला. तेथे सभामंडप व भक्तीनिवासाचे बांधकाम केले. महाराजांनी विठ्ठल गडावर जाण्यासाठी ३ किमी चा रस्ता श्रमदानातून करून घेतला व गडावर ५५ फुट खोल विहीर खोडून पाण्याची व्यवस्था केली.  
     हे समाज कार्य करत असतानाच एक दु:खद घटना घडली श्री क्षेत्र नारायण गडावरील महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराज यांची प्राण ज्योत अनंतात विलीन झाली . श्री क्षेत्र नारायणगडावरील नितांत श्रद्धा व  महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराज यांची केलेली निष्काम सेवा यांचे फळ म्हणून संत , महंत , विश्वस्त मंडळ , गावकरी, समस्त भक्तगण या सर्वांनी गडाचे नवीन मठाधिपती व  महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराजाचे उत्तराधिकारी म्हणून महंत श्री शिवाजी महाराजांची निवड केली . 
  नारायण गडावर आल्यानंतर श्री शिवाजी महाराजांनी प्रथम गोशाळा बांधण्यास अग्रक्रम दिला कारण सुमारे १५० गायीसांठी उन व पावसापासून संरक्षण मिळेल असा निवारा नव्हता म्हणून ते काम त्यांनी पूर्ण केले. राजुरी ते नारायणगडा पर्यंत रस्त्याचे काम शासनाकडून पूर्ण करून घेतले. पंढरपूर येथील मठाचे वै. महंत गुरुवर्य ह.भ.प. महादेव महाराजानी सुरु केलेले बांधकाम पूर्ण  केले. पौडूळ येथील धरणात विहीर खोदून गडावर पाण्याची व्यवस्था केली. तसेच हत्ती दरवाजापासून दुसऱ्या मजल्यावर कमानी , दक्षिण दरवाजा पर्यंत भिंतीचे काम करून एक मजली स्लब चे काम केले.  गडावर येणाऱ्या भाविकांची दर्शनाची सोय व्हावी म्हणून दर्शन हॉल पासून मंदिरापर्यंत लोखंडी पूल तयार केला. उत्तरेकडील दरवाजापासून पश्चिमेकडील दगडी भिंतीचे राहिलेले काम पूर्णत्वास नेले.  
    श्री क्षेत्र नारायण गडाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेनुसार पूर्वी असलेला " क " दर्जा सुधारून " ब " दर्जा शासनाकडून मिळवला. व  तीर्थक्षेत्र दर्जा "ब "  नुसार गडाच्या विकास कामासाठी शासनाकडून रुपये २ कोटी निधी मंजूर करून घेतला. तसेच पैठण व आळंदी येथे जाणाऱ्या गडाच्या परिसरातील भक्तांची राहण्याची सोय व्हावी यासाठी श्री क्षेत्र पैठण येथे दि. ०१-०५-२०१३ रोजी १२ गुंठें व आळंदी येथें मठासाठी जागा घेतलेली आहे व लवकरच तेथे बांधकामास सुरुवात होईल. नारायण गडाचा विकास श्री नगद नारायणाच्या कृपेने आणि वै. महंत गुरुवर्य महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत शिवाजी महाराजाच्या नेतृत्वाखाली वाढतच राहणार आहे. 

संस्थानचे विविध क्षेत्रातील सेवाकार्य :[संपादन]

शैक्षणिक कार्य :[संपादन]

मोफत वसतीगृह:-[संपादन]

सरस्वतीचा वरदहस्त लाभल्यावर मानवाचा उद्धार होतो हे लक्षात घेऊन संस्थानने अनेक उपक्रम राबविले आहेत. सुशिक्षीत तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संस्थानव्दारा संचालीत गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी गडावर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. जे विधार्थी अत्यंत गरीब आहेत त्यांच्यासाठी संस्थानामार्फत मोफत वसतीगृह चालू केले.

वारकरी शिक्षण संस्था :[संपादन]

संत वाङमयातील तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जनमानसांमध्ये भागवत भक्तीची, निती धर्माची, ज्ञानज्योत तेवत राहून समाजाला स्वदेश व स्वभाषा यांच्या कर्तव्याची जाणीव होवून समाज व्यसनमुक्त व्हावा व राहावा, बंधुभाव, सद्प्रवृत्ती नांदावी. पारमार्थीक संस्कार घडून संस्थेत शिक्षण घेतलेल्या प्रवचनकार, कीर्तनकार त्यांनी ह्याच माध्यमातून लोकांचे आत्मकल्याण साधावे ह्याच सद्उद्देशाने वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे.श्री नगद नारायण महाराजांनी जोपासलेला अध्यात्ममार्ग नजरेसमोर ठेवून संस्थानच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाकार्याची वाटचाल होत आहे. वारकरी संप्रदायाची जोपासना व जडणघडण करीत असतानाच संस्थानद्वारा वारकरी शिक्षण संस्थेसारख्या अद्वितीय अभ्यासक्रमातून ‘उद्याचा वारकरी‘ घडविला जात आहे. यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य याद्वारे संस्थानचे आध्यात्मिक कार्य जोमाने साकार झाल्याचे दिसून येते. संस्थानचे वैद्यकिय क्षेत्रातील कार्य आषाढी एकदशी , कर्तिक एकदशी आणि इतर गडावरी उत्सवाच्या दिवशी गडावर संथाना तर्फे गरीब व गरजूना मोफत रूग्णसेवा व त्यांना विनामुल्यऔषधोपचार दिले जातात. तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांच्याव्दारे गरीब रूग्णांना तपासणे, औषध, इंजेक्शन व सलाईन देणे इत्यादी सेवा संस्थान करीत आहे. या योजनेचा लाखो गरजूंना फायदा झालेला आहे .

 तसेच दर वर्षी आषाढी एकदशी, कर्तिक एकदशी ला गडावर रक्तदान शिबिराचे आयोजन न चुकता केले जाते . या उपक्रमात आतापर्यंत हजारो लोकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे.                 

गोशाळा :-[संपादन]

तेहतीस कोटी देवांचा वास ज्यामध्ये असतो.कुळधर्म-कुळाचाराला नैवेद्याचे वेगळे पान जिच्यासाठी वाढले जाते.वसुबारस हा स्वतंत्र दिन ज्यासाठी साजरा केला जातो.अशा गायींचा सांभाळ करून पालनपोषण साठी नारायण गड संस्थाना तर्फे गोशाळा चालवली जाते. आज या गोशाळे मध्ये २०० गाई आहेत . अध्यात्मात गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे आजही गायींचे पूजन करण्यात येते. गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यावर तसेच गायींना व्याधी झाल्या असल्या तर अनेकांतर्फे त्यांना मोकळ्यावर सोडून देण्यात येते किंवा गो-शाळेत दान दिले जातात. अशा गायींवर उपचार करणे, त्यांचे पालनपोषण करण्याची व्यवस्था संस्थाना तर्फे केली जाते

कसे जाल :-[संपादन]

नारायण गडावर आपण लोहमार्ग, हवाई मार्ग व बसेसचा वापर करुन येऊ शकता. नारायण गडा पासून ४ तासांच्या अंतरावर औरंगाबाद हे विमानतळ आहे तसेच नारायण गडा पासून उत्तरेस १२ कि. मी. अंतरावरच राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ आहे.व दक्षिणेस १० कि. मी. अंतरावरच राज्य महामार्ग नगर - बीड आहे . रस्ता मार्ग :-

  • बीड - नारायण गड राज्य परिवहन बस सेवा (२१ कि.मी.)
  • गेवराई - नारायण गड राज्य परिवहन बस सेवा
  • शिवाय खाजगी वाहनाणे बीड हून कधीही गडावर जाता येते.

हवाई मार्ग :-

  • मुंबई- औरंगाबाद
औरंगाबाद हे सर्वात जवळचे विमानतळ येथून  १०० कि.मी. असून औरंगाबादवरुन रस्त्याने तीन तासाचा प्रवास आहे. 

रेल्वे मार्ग :-

  • मुंबई - औरंगाबाद- जालना - नांदेड .

परळी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन येथून ९० कि.मी. असून रस्त्याने तीन तासाचा प्रवास आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरुन रस्त्याने तीन तासाचा प्रवास आहे.

   ==== श्री नगद नारायण महाराज अष्टक ====

पहा वाल्मीकी सारीखा श्रेष्ठ पापी । जगी धन्य केला जयाचे प्रतापे ।। जायचे कृपेने ग्रंथ शतकोटी केला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला ।। १।। नदी गोतमीचे तटी जन्म झाला । आदीब्रम्ह वेदांत तपे पूर्ण केला ।। दिली भेट देवे,आले पंढरीला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला ।।२।। टीळा टोपी कोपीन वीणा बाहे संकधी । सदाब्रम्हचारी खळालागी बोधी ।। असा वेष्णवांचा श्री भाग पहिला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला ।।३।। ऋषी सिद्ध नाथा कपील महामूनी । अनुग्रहे बोधीले शिष्य दोन्ही ।। जीवन्मुक्तीचे वर्म दिधले तयाला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला ।।४।। ऋषींच्या वरा . या जगा उद्धरायासी । आले संगे मुनी . देव आश्रमासी ।। सदा तीष्होतो देव ,देऊन वराला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला ।।५।। नमो पांडुरंगा नमो रुक्मिणीसी । नमो श्री नगत नारायण सिद्ध ऋषी ।। नमो कपील मह्जादेव गुरु भक्त झाला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला ।।६।। जयाचेनी नमो महादोष जाती । जे इच्छीले ते फळ होय प्राप्ती ।। जयाच्या सेवेने आदी मुक्त झाला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला ।।७।। करुनिया स्तुती देवे ऐकोनी भक्ती । कृपा उपजली झाला पूर्ण तृप्ती ।। दिला वर हा सिद्ध नाथे सुताला । नमस्कार माझा श्री नगद नारायणाला।।८।। ।।ईति श्री नगद नारायण अष्टक ।।८।।

आवाहन[संपादन]

विश्वाच्या कल्याणार्थ सतत प्रयत्नशील असलेल्या संतांचे कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या आचार विचारातून समाज मन घडविले. अनेक जणांना सन्मार्गाला लावले, अंधश्रध्देचा तिरस्कार करुन डोळस भक्ती करण्यास सांगितले. संपूर्ण विश्व हे एका परमेश्वराचेच अंश असून त्यात स्त्री पुरुष उच नीच असा भेद भाव नाही असा संदेश दिला.त्यांनी दिलेला विचार, त्यांनी अनुसरलेला आचार हा आपल्यासमोर आदर्श जीवनाचा वस्तुपाठच आहे. या गोष्टींचा फायदा बहुजनांस व्हावा या दृष्टीने त्याचा प्रसार प्रचार आवश्यक आहे.खरेतर ते आपणा सर्वांचे नैतिक कर्तव्यच आहे. यासाठी संस्थानाने वैद्यकीय उपक्रम ,वारकरी शिक्षण संस्था, गोशाळा , अन्नदान यासारखे चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि हे उपक्रम असेच कायम सुरु राहून त्याचा सर्वांना जास्तीजास्त लाभ व्हावा . यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

आपण खालील प्रकारे मदत करु शकता

१) आर्थिक देणगीच्या स्वरुपात.- २) गरजेच्या वस्तुच्या स्वरुपात. ३) ग्रंथ साहित्य देवून. ४) या कार्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊन.

टीप- वरील कोणत्याही मदतीसाठी खालील पत्त्यावर, दुरध्वनीवर संपर्क साधा.

संपर्कसाठी पत्ता :[संपादन]

श्री क्षेत्र नारायणगड संस्थान , तालुका शिरूर जिल्हा बीड,महाराष्ट्र,भारत. पीन – ४१४२०५. इ-मेल आयडी – shreenarayangad@gmail.com