Jump to content

सदस्य:Sagar Rajendra Jaykar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं. आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण... पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,.एक ठराविक वयानंतर लहान मुलांना पेन्सिल ऐवजी पेन देतात ,त्याचे कारण हेच असते की लहान मुलाला लक्षात आले पाहिजे की जस जसे आपण मोठे होत जातो तश्या तश्या आपल्या चूका खोडल्या जात नाहीत.... तुमच्या आयुष्याचे पुस्तकाचे पान लिहताना शब्द काळजीपुर्वक वापरा ..कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा.... कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक नेहमी फुलेच वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध.