सदस्य:Rry112

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दोन शब्द ...... खर तर माझी आज पर्यंतची जीवन वाट मोठी वादळी आहे. घाट वळणांशी सामना करतच मी माझा प्रयास मार्गस्त केला आहे. वादळा अगोदरची शांतता देखील मी अनुभवलेली आहे. या शांततेत देखील खूप भयानकता दडलेली असते. सामाजिक विदारकता याच शांततेतून जन्म घेते. आज या क्षणाला काहीसी स्थिरता मला जाणवत आहे. कारण ज्या महामानवाच्या विचारधारेतून मी माझी जीवनवाट निवडली. ती काही अर्थी सार्थकी झाली. असे मी अभिमानाने नव्हे तर स्वाभिमानाने म्हणेल. कारण जात धर्म पंथ बाजूला सारून अनाथ लेकरांना मायेची उब देणारे माझे गंगाधर बाबा छात्रालय अनाथाश्रम बिजान्कुराला माय कुशीत ठेऊन वटवृक्षात रुपांतर करत आहे. सामाजिक जाणीव असलेल्या दानशूरांचा ओलावा या मातीत पाझरत आहे. मी आभारी आहे या सर्वांचा...!

     ......पण या आसवांना कुणी सांगाव ती अजूनही पाझरती आहेत. कारण समाजातील भयानक विदारकता आजही माझी पाठ सोडत नाही. कधी कधी अस वाटत आपण एकट पडलोत मग कुणाला तरी साद घालावी आणि समाजातील विदारकता सावरण्यासाठी प्रार्थना करावी. प्रार्थना यासाठी प्रबळ शक्ती आणि दृढ आत्मविश्वास वाढीस लागतो. सत्कृत्य मार्गी लागते. पण अनेक वेळा प्रार्थना हि देवांच्या चरणी विणवली जाते. कारण आपली संस्कृतीच देव या संकल्पनेशी बांधील आहे. मी देखील याच संस्कृतीचा पाईक आहे. म्हणून मी देखील माझी प्रार्थना देवांच्याच चरणी वाहणार आहे. हे अस्तित्व साजिवंत असेल तर निश्चितच मला उत्तर मिळेल. कारण मी स्वत:साठी काहीही मागणार नाही. जे मागणार आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे....!


                                         प्रार्थना

प्रार्थना देवा तुज चरणी, धावुनी यावे एकदा भूवरी.... पहा तुझी मानव निर्मिती,सैतानालाही लाजवती....... रक्त सांडे क्षणोक्षणी, बळी पडते ती निस्वार्थी...... नाती गोती कुठ राहिली,

                                                                                              सगळीच आता दूर सरली.....                                                                               जात, पात या वादामधुनी,                                                                             दंगली धूपित किती मरती......                                                                                   धन दौलत या वाटेवरती,                                                                                          संपली किंमत मानवतेची......                                                                         राम गेले ते राज्य गेले,                                                                              रावण तेवढे बाकी राहिले.....                                                                              माता भगिनी विसरून सारे,                                                                                  शरीर भोगासाठी वाटे पडती......                                                                                   लिलाव मांडुनी उघड्यावरती,
हुंड्यासाठी किती जीव जळती.......                                                               अनाथ लेकरे कुठे ठेवावी, 

कचरा कुंडीला ती भर झाली...... इरून येणारी कोवळी किंचाळी, अंधश्रद्धेला या बळी पडती...... तुझेच देवा नाव घेउनी,

भक्त इथली स्वार्थी झाली.......                                                                        सावरण्या या वादळाला, 

मिळेल का रे देवा उत्तर माझ्या ‘प्रार्थनेला’......... !


                                   निर्मितीतून साफल्य (उद्देश)

                                   पोटापुरती परसा....
                                पाहिजे नको पिका या पोळी....
                                  देणाऱ्याचे हाथ हजारो....
                                   दुबळी माझी झोळी....

अगदीच मानवतेला साद घालणारी संत तुकडोजी महाराजांची हि चारोळी खरोखरच भावनिक ओलावा पाझरणारी दुबळ्या हाकेला धावण्यातच खरी मानवता दडलेली आहे. दुबळपण कोणीच आपण होऊन पदरी बांधत नाही. कारण अंधारात चाचपडन म्हणजेच मुक्कामाचा शोध न लागता प्रवास करण्यासारखेच आहे आणि हा प्रवास कुणालाही न परवडणारा असाच असतो. आणि म्हणूनच त्या वाटेवरील प्रवासाला स्वत: होऊन कुणीच निघत नसतो. परंतु नियती नावाच्या चक्राचा अंत कुणीही सांगू शकत नाही. आणि विदारक चक्रात सापडलेले दुबळे जीव म्हणजेच आई बापांच्या प्रेमाला दुरावलेली समाजापासून दूर फेकल्या गेलेली अनाथ अशी निस्वार्थी लेकरं...! कुणाच्या तरी माय हाकेला आपलेस करू पाहणारी हि दुबळी जीव निराधार, परागंदा,उपेक्षित कुठलाही दोष नसताना कचरा कुंडीत फेकलेली कुत्री मांजरांच्या पिल्लांना सुद्धा लाजवेल अशी भयानक दयनीयता का आणि कशी आली या जीवांच्या नशिबी खर तर याला हाच समाज जबाबदार आहे. या विदाराकतेला सामाजीकतेत बदलण्यासाठी हवा आहे पदरी मायेचा ओलावा...! हा ओलावा पाझरतो तो स्वकर्तुत्वातून परंतु याला देखील जोड हवी असते अंतरिक तळमळीची आणि यातूनच पेटली होती एक ज्योत..त्या ज्योतीत असतो एक धग-धगता दीपस्तंभ जो अखंडापर्यंत मानवतेला साद घालतो. या हाकेनं या ‘अनाथांच’ अनाथापन दूर सरल्या जातं. त्या जीवांना अंधारातून प्रकाशाकडे जाणारा नवा मार्ग सापडतो.पण केव्हा ?... जेव्हा कोणी आधारस्तंभासारखा धावून येईल. मानवतेला आपलेस करतच अंतरीतून या जीवांना साद घालेलं...! आपल्या स्वकर्तुत्वातून मायेचा वृक्षारोपण करून या निराधार जीवांना मायेची सावली देईल. जी सावली गेली १८ वर्षापासून आदरणीय मा. न्या.बी.जी.कोळसे पाटील आपल्या जन्म गावी गुहा ता.राहुरी जि.अहमदनगर या ठिकाणी ‘ऑल सेंट्स सोशल रेव्हाल्युशनरी सोसायटी पुणे संचालित’ शिक्षण संस्थेचे “गंगाधर बाबा छात्रालय अनाथाश्रम” चालवत आहे. २७ जून १९९७ हा असा दिवस आहे ज्या दिवशी या अनाथाश्रमाचे बीज रोपण झाले. अगदी १०X१० च्या दोन खोल्या मध्ये. अगदी सुरुवातीला १५ ते १६ अनाथ चिमुकल्या पिलांना पदरात घेऊन हा प्रवास अखंडतेच्या मार्गी लागला. कुठलंही निस्वार्थी काम करायचे असेल तर त्यासाठी त्याग महत्वाचा आहे. आदरणीय मा. न्या.बी.जी.कोळसे पाटील साहेबयांचा जीवनपट अभ्यासनं म्हणजेच ‘वादळी वाट’ तुडविण्यासारखे आहे. अगदी उमलत्या वयापासून सोसलेली गरिबीची जीव घेणी अवहेलना आजही त्यांची कास सोडता नाही. चार घराचं...शिळं असलेले अन्न देखील त्यांना त्यांच्या नशिबानं घ्यावे लागत असे. रात्र दिन दोन घासाच्या अन्नासाठी लढा देणारे आपले आई बाप आजदेखील त्यांच्या डोळ्यापुढे तरळत असतात.उपासमारीशी लढा देत या जीवाने शिक्षणाची कस धरली आणि न्यायमूर्ती या उच्च पदावर विराजमान झाले.आणि आख्या देशाला गुहा या ग्राम गावाची नव्याने ओळख करून दिली. महामानवांच्या विचारधारेचा प्रवाह त्यांनी आपल्या विचारांशी बांधून घेतला. आणि याच विचारातून ‘गंगाधर बाबा छात्रालय’ अनाथाश्रमाचा जन्म झाला तो हि स्वत:च्या दानत्व रूपातून...आपली स्वत:ची वडिलोपार्जित १० एकर जमीन त्यांनी आश्रमाला दान स्वरुपात दिली. उद्देश हाच होता हीच जमीन या अनाथ लेकरांच्या पोटाचा आधार बनेल.परंतु दुष्काळाचा शाप माथी असलेला हा महाराष्ट्र...हा आधार देखील कमकुवत जाणवू लागत आहे. आणि म्हणूनच देणाऱ्याची हाक या अनाथाश्रमाची भूक भागवत आहे.

   ....... अगदी रखरखीत वाळवंट पाठीवर बांधून सुरुवातीचा काळ मार्गी लावला. मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांची शिक्षणाची वाट मोकळी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आधार आणि शिक्षण या दोन्ही बाबी महत्वाच्या होत्या. आणि त्यात देखील पंख फुटलेल्या पिल्लांना योग्य दिशा दाखवणे. हा एक भाग अगदी मानवतेशी जोडलेल्या....हि बांधिलकी स्वीकारणारा....व्यवस्थापक या आश्रमाला लाभला. ज्याने उमलत्या वयापासून अनाथ लेकरांच जिणं काय असतं हे अगदी जवळून पहिले नव्हे तर स्वत: ते अनुभवले...आणि म्हणून गेली १८ वर्ष निस्वार्थी सेवेची बांधिलकी व्यवस्थापक पप्पू सपकाळ यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. माया आणि ममतेचा जिव्हाळा या व्यवस्थापकाने आपल्या कर्तुत्वातून या आश्रमात जिवंत ठेवला आहे. सुरुवातीचा काळ मोठा संघर्षमय....आश्रमाची ओळख पंचक्रोशीत होईपर्यंत...तर अगदीच तारेवरची कसरतच...! समाजसेवेची आवड जोपर्यंत समाजात निर्माण होत नाही तो पर्यंत समाजसेवा करणं मोठ अवघड असतं याची या व्यवस्थापकाला बऱ्यापैकी कल्पना होती आणि म्हणून पप्पू सपकाळ यांनी पायात भिंगरी,तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन या समाजाला या अनाथ लेकरांसाठी मानवतेची हाक घातली या हाकेला उत्तर म्हणूनच समाजसेवेची आवड असणारी, उपेक्षितांना आधारासाठी हात देणारी माणसे आश्रमाच्या मदतीसाठी पुढे धावून येऊ लागली.पप्पू सपकाळ यांच्या तळमळीच्या मागणीला यातून वाट मोकळी होऊ लागली....दानशूर व्यक्तींचा शोध घेणे आणि त्यातून अडचणी सोडवून त्यासाठी करावी लागणारी भटकंती या युवकाने आजतागायत आपल्या माथी मारून घेतली आहे. या अनाथ लेकरांना अंधारातून प्रकाशाची वाट दाखविण्याचा खरा हा उद्देश आहे. आज या क्षणाला जवळपास ७५ अनाथ लेकरे या आधार वृक्षाच्या छायेत आपल्या उज्वल भविष्याची वाट तुडवत आहे. दानाशुरांचे हात दानत्वरुपातून आधार देत आहेत. परंतु दुर्दैवाने सांगावे लागते इथले शासन मात्र आजदेखील अंधारात आहे. कोणत्याही प्रकारचे अनुदान केंद्र व राज्य सरकार आजतागायत या अनाथाश्रमाला देऊ शकले नाही आणि देतील याची अपेक्षाही दिसत नाही. समाजातून होणाऱ्या मदतीतूनच या लेकरांचा अन्नाचा आणि शिक्षणाचा व इतर समस्यांचा प्रश्न सोडविला जात आहे. हि सत्यता आजदेखील साजिवंत आहे. आणि म्हणूनच सांगावस वाटत ज्यांनी या सामाजिकतेच बिजान्कुरण केले त्यांच्या हातात आजही मदतीची ओढ आहे. आदरणीय मा.न्या. बी.जी.कोळसे पाटील या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मा.न्या. सर्वोच्च न्यायालय दिल्ली श्री. पी. बी. सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सध्या हा मानवतेला जिवंत ठेवणारा दीपस्तंभ पेटता आहे. आदरणीय मा.न्या. बी.जी.कोळसे पाटील हेच तर या आश्रमाचे खरे आधारस्तंभ आहेत.
                                            
                                         मायेसाठी तान्हलेली....                                           लेकरं माझी उपाशी....                                     वाट वाकडी करून यावे                              मिळेल जन्माची पुण्याई....!

प्रगतीची वाटचाल ....वाट कधीच संपत नसते. हे चालणाऱ्याने नेहमीच लक्षात ठेवायचे असते आणि म्हणूनच योग्य मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायचे असेल तर वाट तुडवावीच लागते. हि सिद्धता मनी बाळगूनच या अनाथालायाचा जन्म झालेला आहे. १८ वर्षाचा काळ अनेक घाट-वळणे पार करीत मार्गस्थ झाला आहे. परंतु निस्वार्थी कार्ये हे सामाजिक बांधीलकी स्वीकारून पत्करले असेल तर काळाचा पडदा फाडून त्याच्या यशस्वी कर्तुत्वाची पावती त्याच्या पदरात पडते. नियती नावाचा बागुलबुवा त्याची कोणतीच वाट अडवू शकत नाही. हीच साफल्यता या आश्रमाच्या सार्थकी ठरली आहे... ...अगदीच सुरुवातीचा काळ.. १०X१० च्या पत्राशेड खोल्यातून हा प्रवास पुढे आदरणीय मा.न्या.बि. जी. कोळसे पाटील यांनी वडिलोपार्जीत १० एकर जिरायती जमीन आश्रमाच्या पदरात टाकली. उंन्ह-सावलीचा खेळ खेळत आश्रम प्रगतीच्या वाटेकडे निघाले. व्यवस्थापक पप्पू सपकाळ यांच्या अथक प्रयत्नातून समाजातून देणारे हात पुढे येवू लागले.राहुरी तालुक्यालाच नव्हे तर आख्या महाराष्ट्राला स्वतंत्र सेनानी तथा कॉ.मा.आमदार पी.बी.कडू पाटील (आप्पा) यांनी स्वखर्चातून या अनाथ लेकरांसाठी एक प्रार्थना हॉल बांधून दिला. वेळोवेळीच्या मदतीला धावून आले. तसेच अनेक दानशूर या काळात धावून आले. त्यात प्रामुख्याने निवासी जिल्हाधिकारी मा.राजेंद्र पाटील तसेच डॉ.महेश मुळे(अ.नगर), डॉ.रतनचन्द्र रांका, उदबत्ते काका, डॉ.अभिजित मिसाळ(अ.नगर), पुण्याचे श्रीकांत काबरा, या सर्वांच्या सहकार्यातून आश्रमाच्या इमारतीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला. आज या क्षणाला पाना-फुलांचा उंबरठा घेऊन उभी असलेली आश्रमाची इमारत निश्चितच यशस्वी कार्याची पावती पाहणाऱ्या व्यक्तीला होत आहे. बांधकामाचा विस्तार अगदीच मनाला मोहनी घालणारा ठरत आहे. संस्थेचे सुसज्ज असे ऑफिस, मोठे-मोठे तीन हॉल, स्टोअर रूम, एक देखणे ग्रंथालय,पटांगण, मुबलक पाण्याची सुविधा, जनरेटर,इन्व्हर्टर, पाण्याचा जलकुंभ इत्यादी सुविधा मा.न्या.बी.जी.कोळसे पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून या अनाथ लेकरांच्या सेवेत हजार केलेल्या आहेत.

   .....आणि म्हणूनच सांगावस वाटतं वाट संपत नसते हे चालणाऱ्याने नेहमीच लक्षात ठेवायचे असते. इथल्या प्रत्येक लेकरांना सामाजिक जिव्हाळा जोपासावा म्हणून व्यवस्थापक पप्पू सपकाळ नेहमी प्रयत्नशील असतात....!

वाचनीय विचारधारा ...खर तर माणसाचा स्वभाव हा मुळी त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरण आणि परिस्थिती यासी बांधील असतो. आणि म्हणूनच वातावरणात एक गोडवा असावा, आपलेपणाचा भाव असावा,एका नाविन्याच्या शोधात निघणारी न्यायी दिशा असावी. हा सगळा भाव सोबत असेल तर यशस्वी कर्तुत्व सिद्ध व्यक्तीची निर्मिती होत असते आणि या सगळ्या गोष्टीसाठी वाचन संस्कृती पोषक ठरते. आणि उद्देशाने आश्रमात अगदी सुसज्ज ग्रंथालय दानशुरांच्या दानातून उभे आहे. त्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक, जनरल नॉलेज, महान व्यक्तीची आत्मचरित्र, महामानवांच्या विचारधारा, असे अनेक महत्वपूर्ण ग्रंथ मुलांच्या वाचनीय आहेत. निश्चितच या वाचनामुळे आश्रमातून बाहेर पडणारे विचार सामाजिक हिताची जाणीव ठेवणारे असतात.

शैक्षणिक वाटचाल

             ....निराधारांना आधार हा उद्देश मानवतेला जवळ करून एकमेकांत आपलेपणाचा भाव जिवंत ठेवण्यात आज निश्चित सिद्धतेला पोहचलेला आहे. गंगाधर बाबा छात्रालायातील प्रत्येक विद्यार्थी आज या क्षणाला आपल मनात भरणार वेगळपण टिकून आहे. आणि म्हणून मानवतेला साजेशी सामाजिकता प्रत्येकात रुजवावी या उद्देशाने शैक्षणिक विकासाकडे पहिले जाते. मुलांचा सांभाळ व त्यांचा शारीरिक विकास हा तर होताच आहे, परंतु या आश्रमातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपली एकटेपणाची भावना विसरून समाजासोबतच चालवा म्हणून आश्रमातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी MCA,MBA,B.Com,B.Sci, BA, B.Tech, Engineering, MA, ITI, ABM, Polytechnic, BCA, B.Ed, Law, इत्यादी शिक्षण घेत आहेत. आणि मुलांच्या उच्च प्रगतीसाठी सामाजिक तळमळ असणारे काही शिक्षक विनावेतन किंवा अल्पमानधन स्वरुपात मुलांचा जादा तासांचे नियोजन करतात. 

आधुनिकतेचा उंबरठा देखील हि अनाथ असणारी लेकरे आज पार करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाशी आज या लेकरांची नाळ जोडली जाते आहे. अगदी बालवयापासून मुलांना आश्रमातच कॉम्पुटर तसेच इन्टरनेटचे ज्ञान दिले जात आहे. यासाठी सामाजिक मदतीतूनच आज क्षणाला २० कॉम्पुटर, दोन प्रिंटर आश्रमात उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल निश्चितच प्रगती पथावर आहे. आज एक अनाथ विद्यार्थी एम.फील.झाला असून तो एका उच्च महाविद्यालयात प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. त्याच्याच पावलांवर पाउल ठेऊन अनेक विद्यार्थी आय.टी.आय.चे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. अनेक विद्यार्थी नामवंत कंपन्यामध्ये नौकरी करत असून काही विद्यार्थी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या शाखेमधून पदवी करत आहेत. हि शैक्षणिक प्रगती सामाजिकतेच्या पेरणीतून उभारली आहे. आज बिजांकुराच वटवृक्षात रुपांतर होत आहे. आदरणीय मा.न्या. बी.जी.कोळसे पाटील यांनी ज्या महामानवांच्या विचारधारेतून जे हे सामाजिक बीजरोपण केले आहे ते आज निश्चितच फलद्रूप होताना दिसत आहे. आणि निश्चित हा प्रगतीचा आलेख असाच उंच उंच जाणार कारण आश्रमातील प्रत्येक जीव हा जाणीवेच्या वाटेवरून चालणार आहे.

मुलभूत गरजांची पूर्तता

          मुलभूत गरजांच्या पुर्ततेशिवाय मनुष्य जीवनच जगू शकत नाही. कारण अन्न, वस्त्र, आणि निवारा या आहेत मुलभूत गरजा. आज हि अनाथ लेकरे आहेत परंतु सामाजिक विचारधारेत बांधलेली आणि म्हणूनच समाजातील दानशूर व्यक्ती आज आश्रमाच्या ओढीने ओढला जात आहे. आणि त्यातूनच अन्नदानासारखे कार्यक्रम आश्रमात सुरु असतात. त्यामुळे या लेकरांचा पोटा पाण्याचा प्रश्न काही वेळा सुटतो. बहुतेक लोक वाढदिवस, स्मरणार्थ भोजन, लग्नाचा वाढदिवस अशा स्वरूपाचे कार्यक्रम एक सामाजिक जाणीव म्हणून संस्थेत घडवून आणतात. परंतु सगळेच दिवस सारखे नसतात, नसेल त्यावेळी समाजाच्या आर्थिक मदतीतूनच मुलांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लावला जातो. 

मुलांच्या कपड्यांचा प्रश्न संकलन करून सोडविला जातो.यात जुने परंतु उत्तम स्थितीतील कपडे आश्रमाला दानाच्या स्वरुपात मिळतात. मुले आनंदाने त्या कपड्याचा स्वीकार करतात. त्याच बरोबर अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या मुलांना कपडे वाटतात. त्यात मग अंथरून पांघरून घेणारे कपडे देखील असतात. अगदी जाणीव ठेउनच दिलेल्या कपड्यांचा वापर मुले करतात शालेय गणवेशाचा प्रश्न शिर्डीचे हॉटेल व्यावसायिक मच्छिंद्रभाऊ शेळके व डॉ. अभिजित मिसाळ या दानशूर व्यक्तीच्या मदतीतून सोडविल्या जातो.

                निवारा उत्तम आहे. तीन हॉलची व्यवस्था आहे . अगदीपायातील चप्पल आणि पाठीवरील दप्तर सह प्रत्येक विद्यार्थी सामाजिक बांधिलकी स्वीकारून शिक्षणाची वाट तुडवत आहे.

कला क्रीडा आणि साहित्य

          आश्रमातील प्रत्येक लेकराचा सर्वांगीण विकास व्हावा या साठी व्यवस्थापक पप्पू सपकाळ विशेष लक्ष घालतात आश्रमातील नियम अटी एका विशिष्ट शिस्तीतच बांधलेल्या आहेत. कला, क्रीडा आणि साहित्य हा विद्यार्थ्याच्या विकासाचा मध्यबिंदू आहे. आणि म्हणूनच विविध कला दर्शनाचे कार्यक्रम आश्रमात तसेच शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी करवी राबवून घेण्यात येतात. विविध विषयावरील लिखाण वाचनाचा सराव हा नियमित  घेतला जातो. क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रकार आश्रमातील भव्य मैदानावर खेळून घेतले जातात. त्यात प्रामुख्याने क्रिकेट,व्हॉलीबॉल,वजनकाटा,झोके,मृष्टीयोद्धा,रिंगा,लेझीम,बॅडमिंटन, टेनिस तसेच कबड्डी, खोखो,कुस्ती,या मैदानीखेळाचा समावेश असतो.खेळासाठी लागणारे साहित्य  दानशूर व्यक्तीकडूनच उपलब्ध होतात. यातील अनेक साहित्य राहुरी फॅक्टरी येथील शिक्षक श्री. दादासाहेब मोरे व श्री.संदीप लोहकरे यांनी उपलब्ध करुन दिलेले आहेत. विद्यार्थी आणि खेळ यांचे अतूट असे नाते आहे. याची जाणीव याठिकाणी प्रखरतेने होते. सुदृढ आणि निरोगी विद्यार्थी खेळातून घडतो. आणि म्हणून गंगाधर बाबा छात्रालयात खेळाला महत्व दिल्या जात आहे....!

श्रमदान

      गंगाधर बाबा छात्रालायातील प्रत्येक विद्यार्थी श्रामादानाला एक आगळे वेगळे महत्व देताना आज दिसत आहे. कारण सामाजिकतेची बांधणीच मुळी श्रमदानातून होत असते. याची कल्पना या अनाथ लेकरांना अगदीच बाल्यवस्थेपासूनच झालेली आहे. आणि म्हणूनच त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. वेळेचे काटेकोर नियोजन आहे. शाळा आणि अभ्यास व्यतिरिक्त तसेच सुट्टीच्या दिवशी आश्रमाच्या १० एकर शेतीमध्ये सार्वजन श्रमदान करतात. त्यातूनच आश्रमाला लागणारा गहू, तुरी, हरबरा, भुईमुग हि धान्य स्वत:च्या शेतीतच उपलब्ध होण्यास मदत होते. पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आश्रमाचे संस्थापक मा.न्या.बी.जी.कोळसे पाटील यांच्या आर्थिक सहकार्यातून २.५ किलोमीटर पाईपलाईनचे काम मार्गी लावण्यात आलेले आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान खूप महत्वाचे ठरलेले आहे. याकामी श्री. आशीषजी आहुजा सर(दिल्ली) तसेच इतर अनेक दानशुरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून पंचवीस गुंठ्याचे शेततळे बनविले असून त्याचा आश्रमाच्या शेतीला तसेच परिसरातील इतरांच्या शेतीला चांगलाच फायदा झालेला आहे.
     विद्यार्थी दशेतील हे श्रमदान निश्चित भविष्यात उज्वल दिशा दाखवेल यावर आश्रमाचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून शाळा कॉलेज श्रमदानाच्या कार्यक्रमात गंगाधर बाबा छात्रालयातील विद्यार्थी अग्रक्रमी असतात. 

सहलीचे नियोजन विद्यार्थी दक्षतच निसर्गाशी जवळीक साधावी डोंगरदरीच्या नयनरम्य वातावरणात विद्यार्थ्यांचा काही वेळ जावा आणि ऐतिहासिक स्थळाची त्यांना ओळख व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन वर्षातून एकदा मुलांची सहल आश्रमाच्या माध्यमातून काढली जाते. भंडारदरा, अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, साईबन(अ.नगर), अप्पूघर(पुणे), महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, सिंहगड, रायगड, हि असतात सहलीची ठिकाणे. यातून मुलांची निरीक्षण शक्तीत वाढ होते. पानाफुलाविषयी त्यांच्या मनामध्ये एक सहानुभूती जन्म घेते. आणि यातून निसर्ग आणि मानव हि एक दुसऱ्याशी जिव्हाळ्याची नाती बांधून राहण्यास मदत होते. सहकार्यातूनच आश्रमाची खरी वाटचाल सुरु होते. याठिकाणी देखील सहलीचे नियोजन प्रा. वसंतराव झावरे, श्री. नारायण शेळके, श्री. दादासाहेब मोरे यांच्या सहकार्यातून केले जाते.

      • हे शब्दांकन म्हणजेच गंगाधर बाबा छात्रालयाचा एक छोटा खाई माहितीपटच समजावा. ज्या माहितीपटात आश्रमाच खर उद्दिष्ट आपल्या समोर आले असेल. आदरणीय मा.न्या.बी.जी. कोळसे पाटीलांनी आपल्या भूतकाळाला डोळ्यासमोर ठेऊन या अनाथ लेकरांना आधाराचा हात दिला आहे. अगदी जात, धर्म, पंथ विसरून हि मानवता धर्माची सामाजिक ज्योत अखंडपणे तेवत राहावी म्हणून आपण देखील खारीचा वाटा का उचलू नये. आश्रमात कोणतीही मदत स्वीकारली जाऊ शकते. ज्यामध्ये अन्नधान्य, जुने-नवे कपडे, दप्तर, बूट, चप्पल, किरण, पुस्तके, वह्या,पेन, औषधीवस्तू, जीवनाश्यक कोणतीही मदत तुम्ही करून शकता. फक्त जेवनावळीच्या बाबतीत मात्र एक कल्पना अन्नदात्याला असावी. गानागाधार बाबा छात्रालयातील विद्यार्थ्यांचा आहार शाकाहारी आहे. आपल्याही अंतर्मनात सामाजीकतेची ज्योत निश्चित पेटती होणार मग थांबण्यात काय अर्थ. आपणदेखील एक पाऊल पुढे टाकून आणि या सामजिक कार्यात सहभागी होऊयात.
      सहकार्यातूनच निस्वार्थी प्रेमाचा जन्म होतो आणि हेच प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहण्याची शक्ती देते. मग ते प्रेम कुणावरही असो.....!