सदस्य:Ranjita mhamal/धुळपाटी 2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

                      मांद्रे गावाचा इतिहास

      मांद्रे गाव हा पेडणे तालुक्यातील दक्षिण भागात स्थित आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा गाव समुद्र तटाच्या जवळच आहे. माड, पोपळींनी बहरलेला हा गाव. हरमल , मोरजी व पार्से या गावांच्या मधोमध असलेला हा गाव. समुद्र तटाच्या जवळच असलयामुळे हे पर्यटन स्थळात गणलं जातं.

        मांद्रे गावात एकूण ८ वाडे आहेत .आस्कावाडा, नाईकवाडा, सावंतवाडा, देऊळवाडा, मधलामाज, जुनसवाडा, मराठवाडा आणि आश्वे . मधलामाज  हा बाजारपेठ असून दर रविवारी बाजार भरतो. गावात वेगवेगळी देऊळे व चर्चीस आहेत. भगवती व सप्तेश्वर ही मुख्य दैवते आहेत. तसेच सप्तेश्वर या दैवतावरून गावात उच्च माध्यमिक स्कूल आहे – सप्तेश्वर उच्च माध्यमिक स्कूल व विद्यालय, २ हाय स्कूल आहेत , २ ग्रंथालये आहेत .

    गावात वेगवेगळ्या ठिकाणी जत्रोत्सव व धालोत्सव होतात. गावातील आराध्य दैवत श्री भगवती देवीचा सप्ताह होतो. हे सप्ताह भरविण्याचे कारण म्हणजे " मांद्रे गावात एक दिवस दुष्काळ पडला म्हणून ग्रामस्थकांनी आराध्य दैवतेचं आव्हान केले व पाऊस पडला ." असे तेथील ग्रामवासी सांगतात.

त्यावेळी मैफिलीचा कार्यक्रम होतो त्यात याचा उल्लेख येतो. हे या गावाचे पहिले वैशिष्ट.

   याचे दुसरे वैशिष्ट म्हणजे हा गाव समुद्रतटाच्या जवळ असल्यामुळे हे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. 'जुनस' व 'आश्वे' ही दोन गावे समुद्रतटाच्या जवळ आहे. दरवर्षी  पर्यटक येतात यामुळे लोकांच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न सुटला .

    हा गाव मतदान संघातील स्वतंत्र गाव आहे. गोवा स्वातंत्र्य झाल्यानंतर १९६२ साली झालेल्या निवडनुकीत गोव्याचे पहिले मुख्यमंत्री 'भाऊसाहेब बांदोडकर' हे मांद्रे संघातून निवडून आले. त्यांचा पुतळा आजही या गावात स्थित आहे . खरोखरच हे या गावाला लाभलेले भाग्य आहे .