सदस्य:Icadrushil

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फैजपूरचे संत खुशाल महाराज हे भावसार रंगारी समाजातील होते. त्या संतांच्या संदर्भात एक आश्चर्यकारक घटना लोकमानसात रूढ आहे. संत खुशाल महाराजांना देणे असलेले लखमीचंद सावकाराचे दोनशेचाळीस रुपये प्रत्यक्ष विठ्ठलाने अदा केले! त्यासंबंधीची 1837 मध्ये विठ्ठलाला दिलेली मोडी लिपीतील पावतीही खुशाल महाराजांच्या मंदिरात उपलब्ध आहे! महाराजांच्या नावाने कार्तिक महिन्यांत फैजपूर येथे रथोत्सव साजरा होतो. महाराजांचे पुत्र श्रीहरी महाराज यांनी ती प्रथा खुशाल महाराजांच्या मृत्यूनंतर, 1885 साली सुरू केली. खुशाल महाराजांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यात ‘श्रीदशावतार चरित्र ग्रंथ’ हा महत्त्वपूर्ण आहे. त्या ग्रंथाचे एकूण सेहेचाळीस अध्याय आहेत. खुशाल महाराजांना त्यांनी वीस अध्याय लिहिल्यावर देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्रीहरी महाराज यांनी सव्वीस अध्यायांची भर घालून ग्रंथ पूर्ण केला. तो ग्रंथ पितापुत्रांच्या एकात्म भावनेमुळे सलग असाच वाटतो. पांडुरंग स्वप्नात येणे, विठ्ठलाची मूर्ती सामानात येणे वगैरे कथा संत खुशाल महाराजांच्या चरित्रात आहेत. त्या कन्हैयालाल धोंडू मोरे यांनी ‘श्रीव्यासपुरी महात्म्य’ या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत.

  • इतिहास श्री संत खुशाल महाराज स्वयंभू मंदिर फैज़पुर चा .... श्री संत खुशाल महाराज हे एका रंगारी समाजात माता नाजुका देवी व पिता तुळशीराम ह्यांच्या घरी साधारणतः २६० वर्ष आधी फैजपूर नगरीत यांचा जन्म झाला. श्रीसंत निळोबा महाराज यांच्या शिष्य पंरपरेत श्रीसंत खुशाल महाराज असताना त्यांना भक्तिची गोडी लागली व भक्ति करत असतांना त्यांना दत्त पादुकांची (खडाव) प्राप्ती झाली. आजही ते खडावं मंदिरात सर्वांना आशिर्वाद देत आहेत.
पुढे पुंढरपुर वारी करत असताना पंढरपुरात खुशाल महाराज यांच्या वर विठ्ठल रुक्मिणी खोटा चोरीचा आळ लागला त्यावेळी त्यांना दिवाणी कोठडीत ७ दिवस ठेवण्यात आले, पण महाराज तेथेही विठ्ठल नामस्मरण करत असताना स्वयंभू पांडूरंग व रूख्मनी मातेची विग्रह पुन्हा महाराज यांच्या हातावर प्रकट झालेत. त्यानंतर महाराज यांची माफी मागत त्यांना मेणाच्या पालखीत फैजपूर ला आणले. यातून त्यांची भक्तीत जास्त वाढ झाली, पुन्हा महाराज यांच्यावर त्यावेळेस ₹ २४० कर्ज झाले असताना विठ्ठल भगवान यांनी स्वतः ते कर्ज फेडले आहेत त्याची पावती आजही मंदिरात उपलब्ध आहे.
             स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी विग्रह साक्षात आपल्याला दर्शन देत आहेत. फैजपूर मधे १७० वर्षांपासून रथोत्सवाची परंपरा त्यांचे वंशज जोपासत आहे. सदर वास्तु ही पुरातन असून तिचे बांधकाम ब्रिटिश सरकारच्या देखरेखीत झाले आहे. 

सद्गुरूनें मज आशीर्वाद दिला हरुष भरला ह्रुदयी माझे ह्रदयीचा भाव कळला गुरूसी आनंदउल्हासि बोले मज बोले मज गुरु क्रूपा करुनी तुका म्हणे मनी आनंदलो