सदस्य:HiteshASalvi
Appearance
हितेश साळवी हे मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) या बिगर राजकीय नोंदणीकृत संघटनेचे पदाधिकारी आहेत. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या नोकरी, रोजगार, उद्योग आणि न्याय्य हक्कांसाठी त्यांनी ऑक्टोबर २०१९ पासून आपल्या कार्याला सुरुवात केली. पहिल्या एका वर्षात मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद भूषवून मराठी विषयक अनेक कामांना न्याय दिला. वर्षभरानंतर २०२० मध्ये त्यांच्यावर संघटनेकडून उत्तर मुंबई उपनगरे (जोगेश्वरी - दहिसर) या विभागाची उपाध्यक्ष पदी वर्णी लागली. मराठी भाषेसोबतच ते पर्यावरण, रोजगार, व्यवसाय, सामाजिक विषयांसाठी कार्यरत आहेत.