Jump to content

सदस्य:Dmadhekar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिळणे व भेटणे - साम्य भेद

सापडणे, मिळणे, भेटणे या शब्दांचे अर्थ समान नाहीत. प्रत्येक शब्दाची वेगळी छटा आहे व ते संदर्भानुसार वापरायचे असतात.

उदाहरणार्थ, look, see आणि watch या तीनही क्रिया डोळ्यांनी करायच्या असल्यातरी त्यांच्या छटा वेगळ्या असून हे शब्द संदर्भानुसार वापरायचे असतात.

“See” means to notice or become aware of someone or something by using your eyes.

“Look” means to direct your eyes in a particular direction.

“Watch” means to look at someone or something for an amount of time and pay attention to what is happening.

Hear आणि Listen या दोन्ही शब्दात कर्णेंद्रियाद्वारे ध्वनी मेंदूपर्यंत पोहोचविण्याची कृती असली तरी दोन्ही शब्द वेगळ्या संदर्भानुसार वापरले जातात.

तसेच भेटणे, मिळणे अशा शब्दांचे आहे.

मिळणे या शब्दात मालकी हक्क प्रस्थापित होण्याची क्रिया दडलेली आहे तर भेटणे या शब्दात काही काळासाठी एकाच बिंदूवर एकत्र येण्याची क्रिया अंतर्भूत आहे. पगार भेटत नाही तर पगार मिळतो, कारण त्यावर तुमचा मालकी हक्क प्रस्थापित होतो. तसेच एखाद्याची भेट होते तेव्हा फक्त काही काळासाठी ते एकत्र असतात व नंतर वेगळे होतात, परंतु कोणाचाही कोणावर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही.

मिळणे व भेटणे या शब्दांच्या अर्थांच्या छटा वेगळ्या आहेत व ते शब्द संदर्भानुसार वापरायचे असतात. तसेच अजून एक उदाहरण म्हणजे पळणे, धाव घेणे व पळून जाणे हे समान क्रिया अंतर्भूत असलेले व संदर्भानुसार वेगळे अर्थ असणारे शब्द आहेत.

जर मिळणे व भेटणे हे समानार्थी शब्द असतील तर मला बहीण मिळाली व मला बहीण भेटली या दोन्ही वाक्यांचे अर्थ समान होतील.

सारांश - मिळणे व भेटणे हे शब्दप्रयोग समानार्थी नाहीत व ते संदर्भानुसार वापरायचे असतात.