सदस्य:Ashwini Manwate
Appearance
꧁𓊈𒆜 वीर क्रांतिकारक योद्धा भामाबाई गणपती बिरादार 𒆜𓊉꧂
हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्याचा तो काळ आजही नुसता आठवला तरी डोळ्यासमोर उभे राहते त्या विराचे शौर्य, त्याग, बलिदान आणि त्याचे समर्पण अशाच एका लढाऊ आणि बाणेदार स्त्री योद्धाचा आपण परिचय करून घेणार आहोत.
'नावंदी' तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील एक छोटेसे गाव हिरवाईने नटलेले आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण गर्द दाट झाडी होती. त्याच ठिकाणी अशा प्रकारच्या पराक्रमी कुटुंबाची व्यथा आणि पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेल्या आहेत. अशाच प्रकारच्या नावंदी गावामध्ये पराक्रमी कुटुंबामध्ये एका स्त्रीचा जन्म झाला. गावामध्ये गणपती बिरादार नावाचे सदगृहस्थ उत्कृष्ट असे शेतकरी होते. आपल्या शेतीच्या कामा बरोबरच समाजाच्या चांगल्या कामासाठी कामी कसे येता येईल अशी त्यांची दूरदृष्टी त्यांनी निर्धारित केली होती. त्यांच्यासोबत नावंदी येथील श्रीमती रुक्मीनबाई शंकर बिरादार आणि जिजाबाई फुले यांनी त्या काळामध्ये असणाऱ्या क्रांतीसुर्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता जिजाऊ यांचे सर्वांचे प्रेरणादायी इतिहास आणि कार्य लोकांच्या समोर सांगायचे आणि मांडण्याचे काम करत असत. ज्यावेळेस त्या इतिहास लोकांसमोर सांगत असत त्यावर प्रत्यक्षपणे त्यांच्या अंगातून ह्या जिजाऊ किंवा सावित्री बोलत आहेत असा भास निर्माण होत असे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या काळामध्ये सुदृढ असे स्वतःचे कौशल्य निर्माण केले होते. आकारामध्ये त्या आर्य समाजाच्या नेत्यांची भाषणे ऐकून खूपच जास्त प्रभावी झाल्या होत्या. आपणही या लढ्यामध्ये काहीतरी योगदान दिले पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होती. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी त्याच्या परिसरामधील नावंदी व गोडसर या दोन्ही भागांमध्ये या विचारांचा प्रचार व प्रसार त्या करत होत्या. त्यांचे पती गणपती बिरादार यांनी भामाबाई यांना देशाच्या हिताची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून हैद्राबाद स्वातंत्र्यलढ्या मध्ये मुक्तपणे सहभाग घेण्याचे आणि त्यामध्ये वावरण्याचे पूर्णपणे स्वतंत्र्य त्यांना बहाल केले होते, म्हणूनच निर्भीडपणे त्यांच्या सोबत फिरताना भामाबाई जराही मागे सरत नसायच्या कारण तिच्या पाठीमागे तिचे पती साथ सावलीसारखे खंबीर पणे सोबत होते, म्हणूनच की काय त्यांचे ध्येय गाठणे त्यांना अतिशय सहज आणि सोपे बनत चालले होते. सुरुवातीला भामाबाई, जिजाबाई व रुक्मीनबाई यांनी आप्पाराव पाटील कोळखेडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली. आपणही क्रांतिकारक आहोत याचा जातीवंत दाखला त्यांनी सर्वांन समोर द्यायला सुरुवात केली.
सप्टेंबर 1947 रोजी झालेल्या सत्याग्रहामध्ये त्यांनी सर्वात मोठा हिराहिरीने पुढाकार घेतला आणि महिलांचे सामर्थ्य दाखवून दिले. महिला जर एखाद्या कार्यामध्ये जिद्धीने पेटून उठली तर ती कार्याला कशाप्रकारे तडीस मिळू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण भामाबाईच्या रूपाने सर्वांना त्या काळामध्ये दिसून आले. त्या साध्या घरामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि उल्लेखनीय ठरली आहे. प्रेमाची भामाबाई बिरादार निरक्षर असूनही, आपले पती गणपती बिरादार यांना त्यांनी महत्त्वाची साथ दिली. म्हणतात ना की नष्ट केवळ कागदी अक्षराचे लिहिणे, वाचन करता आले म्हणजे शिक्षण म्हणता येत नाही पण लोकांच्या मनातील बोलाय, लोकांच्या मनातील भावना ज्याला वाचता येतात तो कधीही अडाणी किंव्हा निरक्षर म्हणता येत नाही. अशाच प्रकारची युक्ती भामाबाई यांना लागू पडते. त्या जरी अक्षराने, लिखाणाने सूचित दिसत नसल्या तरीही लोकांच्या मनातील संकल्पना वाचायला, लोकांच्या मनातील भावना लिहायला त्यांना चांगल्या प्रकारचे जमत होते. या सगळ्या भावना जपत असताना त्यांनी सत्याग्रहाच्या बरोबर संसाराचा गाडा देखील नेटाने आणि जोमाने पुढे नेला.
भामाबाई यांना तीन मुले होती. माधव, गंगाधर आणि शिवाजी ही त्यांची नावे होते. या मुलांना पण जन्मताच क्रांतिकारकाची बाळकडू हे त्यांच्या आईकडून मिळालेले होते आणि त्यांच्या अंगामध्ये सुद्धा ते सत्याग्रहाचा बाणा भिडवण्याचे काम माता भामाबाई यांनी केले होते. पुढे चालून त्याच मुलांना एक उत्कृष्ट जमीन कस, एक चांगल्या प्रकारचे शेतकरी, कष्टकरी बनवण्याचे काम या मातेच्या रूपाने या तिघांनी मिळून केले. श्रीमती भामाबाई कौटुंबिक एकता, देशप्रेम, समता याबाबत मुलांवर सुसंस्कार केले. मुलावर त्यांनी केलेले उत्कृष्ट संस्कार आजही त्यांची खरी ओळख बनली आहे. ते मुले सुद्धा त्यांच्याच प्रकारचे आदर्श जीवन जगत असत. परंतु नियतिच्या मनामध्ये कधी काय येईल, ते कधी काही सांगता येणार नाही. अशा थोर त्यागी व्यक्तिमत्वाची या जगातून निघून जाण्याची वेळ सुद्धा इतरांप्रमाणेच ठरली असावी. म्हणूनच की काय दिनांक 3 डिसेंबर 2006 रोजी या भामाबाई वीर मातेचे त्या ठिकाणी निधन झाले, पण म्हणतात ना मनुष्य हा जरी शरीरुपाने नाहीसा झाला असला तरी त्याच्या कार्यची सर मात्र कधीच कुणीही करू शकत नाही. जसे की वाऱ्याच्या कोणत्याही दिशेला तुम्ही जरी उभा राहिलात, तरी चांगल्या सुगंधाचा दरवळ तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. जरी तो तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दिसत जरी नसला तरी त्या सुगंधाचा भास मात्र तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. तशाच प्रकारची म्हण ह्या ठिकाणी भामाबाई यांच्या बाबतीमध्ये म्हणायला काहीच वावगे ठरणार नाही. आज जरी त्या व्यक्तीरूपाने सजीव आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचे कार्य रुपीक सुगंधाने हे सदैव आपल्या तुमच्या सर्वांच्या सोबत कायम प्रेरणा देत राहणार आहे. यात मात्र काडीमात्र ही शंका नाही[१].
❈✧ संदर्भ :- १) खंडगावे नामदेव गोविंदराव, घटकार नारायण गोविंदराव, (२०१४), हैद्राबाद मुक्तिलढ्यात उदगीर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान, अरुणा प्रकाशन,लातूर, पृ.२२३
मानवते अश्विनी गांगाधर.
MA प्रथम वर्ष (समाजशास्त्र)
People College, Nanded