सदस्य:विनायक काळदाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विदर्भातील धनगर समाज-धन म्हणजे पशू,गोधन आणि गर म्हणजे याचे मालक-पालक असलेले.धनगराचा शब्दशा अर्थ धनाचे पालनकर्ते.जुन्या काळी तुमच्या कडे किती पशुधन आहे यावर तुमची श्रीमंती मोजल्या जात होती.हि जमात रानोमाळ, डोंगरदऱ्या मध्ये फिरणारी.यांच्या पैकी बऱ्याच जनांचे जन्म रानावनातच झाल्याची माहिती मिळते.वैद्यकीय सुविधा नसल्याने अर्भकाची नाळ दगडाने तोडण्याईतकी खराब अवस्था काही भागात यांच्या वाट्याला येते.बऱ्याच जनांना गावच नाही त्यामुळे रेशनकार्ड, मतदान कार्ड नाही. शाळेत प्रवेश न घेतल्यामुळे जन्माचा दाखला नाही, जातीचा दाखला नाही. ईग्रज संशोधक,लेखक व मानववंशशास्त्रज्ञ यांनी धनगरांचा उल्लेख आदिवासी म्हणून केला आहे.मध्यभारतात भाषावार प्रांतरचनेच्या आधी आजच्या विदर्भातील प्रदेश हा बेरार म्हणजे सेन्ट्रल प्रोविनन्स मध्ये असतांना तेथे धनगरांचा उल्लेख आदिवासी मध्ये होता. कालांतराने हा प्रदेश मराठी भाषिक महाराष्ट्राला जोडण्यात आला व धनगराचे आदिवासी वर्गीकरण ईतर मागासवर्गीयामध्ये करण्यात आले.नंतर धनगराना भटके आदिवासी म्हणजे Nomadic Tribe असे वर्गीकरण चिकटवण्यात आले.परंतु आजही शासनाच्या अनेक विभागात धनगरांना आदिवासीच्या सवलती, स्टँम्प ड्युटी माफी वगैरे मध्ये आदिवासींच्या दर्जाचा उल्लेख आढळतो.उत्तर प्रदेशमध्ये धनगर जात अनु.जातीमध्ये तर झारखंड मध्ये आदिवासी मध्ये टाकली आहे तर महाराष्ट्रात भटके आदिवासी म्हणजे Nomadic Tribe मध्ये टाकली आहे. मध्यप्रदेशला लागून असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात हा समाज अत्यंत मागासलेला व मुख्यप्रवाहापासूण लांब असलेला आढळतो.काका कालेलकर, ईरावती कर्वे यांच्या अभ्यासानुसार व नोंदी नुसार विदर्भातील धनगर समाज हा आदिवासीचे कटाक्ष पूर्ण करतो.यांच्या चालीरीती, देवधर्म, लग्न पद्धती ह्या आदिवासी समान आहेत.आदिवासी धनगर समाजाचे प्रातिनिधिक स्वरूप विदर्भात पाहायला मिळते.हा समाजाचा विस्तार महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील जिल्ह्यातून सुरु होउन महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा,चंद्रपूर,यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलढाणा पर्यंत पसरलेला पाहायला मिळतो.रसेल्स व ईतर मानववंशशास्त्र यांनी त्यांच्या 'ट्राईब अँन्ड कास्ट्स आँफ सेन्ट्रल प्रोविनन्स' मध्ये सुद्धा या धनगरांना Triable shepherds म्हणून संबोधले आहे.वर्तमान काळातील ईतिहासकार संजय सोनवणी यांनी सुद्धा त्यांच्या 'धनगर समाजाचा गौरवशाली ईतिहास' या पुस्तकात या आदिम समाजाचे वर्णन आदिवासी म्हणूनच केले आहे.विदर्भ हा बेरार स्टेट मधून निघून महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाल्यानंतर या आदिवासी धनगरांचे आरक्षण वर्गीकरण बदलेले दिसते आणी शैक्षणिक,राजकीय मागासलेपणा मुळे या अडचणींचा कुणी पाठपुरावा सुद्धा केलेला दिसत नाही.हे सर्व चित्र पाहता महाराष्ट्र सरकारने 2019 साली धनगरांना आदिवासी समकक्ष सवलती देवून आदिवासींसाठी असलेल्या सर्व सोयी व सवलती लागू केलेल्या आहेत.