Jump to content

सदस्य:राजमाता जिजाऊ महिला बचत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
             राजमाता जिजाऊ महिला बचत गट पिंपळगाव पेठ, ता- सिल्लोड, जि.औरंगाबाद-४३११३५.

राजमाता जिजाऊ महिला बचत गट हा ई.सन:- ०१ जानेवारी २०१७ रोजी स्थापन झाला. आणि ग्रामदैवत श्री.सायंबा महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या आदर्शाने १ जानेवारी २०१७ पासून राजमाता जिजाऊ महिला बचत गटाच्या वाटचालीस सुरुवात झाली आणि बचत गटात आर्थिक श्रोत म्हणून मासिक बचत हि ५०० प्रमाणे २१ महिलांनी एकत्रित येऊन जमा करण्यास सुरुवात केली. आणि या रकमेपासून पासून गटातील महिलांनी मासिक रक्कम गोळा होणाऱ्या रकमेतून अंतर्गत व्यहारामध्ये क्रांती घडविण्यास सुरुवात केली. गटातील महिला सभासदाला याचा खुप फायदा मिळायला सुरुवात झाली कोणत्याही महिलेला दोन पैश्यासाठी कोणासमोर हात पसरविण्याची गरज भासत नाही. सन : २०१७ पासून गट स्थापन झाल्या नंतर आज पर्यंत कोणत्याही सभासद महिलांनी गटाच्या व्यतिरिक्त कोणत्याही वैक्तिकडुन पैशे घेण्यास हात पसरविले नाही. बचत गटातून घेतलेल्या पैश्यातून महिलांनी गाई म्हशी आणि शेळ्या घेऊन छोट्या मोठ्या गरजा भागविण्यास सुरुवात केली. इत पर्यतच नाही तर सर्व सार्वजनिक उपक्रमामध्ये सहभाग घेण्यास सुरवात केली.