सदस्य:माहितगार/व्याकरण/धूळपाटी
नाचता येईना अंगण वाकडे
बुडत्याला काडीचा आधार
चकाकते ते सारेच सोने नसते
अंथरूण पाहून पाय पसरावे
अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये.
केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा
गरज सरो नि वैद्य मरो
वासरात लंगडी गाय शहाणी
उथळ पाण्याला खळखळाट फार
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
दिव्या खाली अंधार
आरोग्य हेच आश्चर्य
लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे.
ऐकावे जनाचे,करावे मनाचे
दाम करी काम
नवी विटी नवे राज्य
गरज ही शोधाची जननी आहे
काट्या वाचून गुलाब नाही
दृष्टी आड सृष्टी
पेरावे तसे उगवते
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
चुकणे हा मानवाचा धर्म आहे
वराती मागून घोडे
एकी हेच बळ
आपण चिंतितो एक पण देवाच्या मनात भलतेच
बोलण्या पेक्षा मौन श्रेष्ठ
बळी तो कान पिळी
गतं न शौच्यम!
घी देखा लेकीन बडगा नही देखा
चांगल्या कामाचा शुभारंभ स्वतः:च्या घरा पासून करावा.
- छापलेला उतारा वहीत पाहून लिहिणे याला अनुलेखन म्हणतात
- श्रुत लेखन ऐकलेला मजकूर जश्याच तसा सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिणे याला श्रुत लेखन असे म्हणतात
शब्दांच्या शक्ती अभीधा-वाच्यार्थ;लक्षणा-लक्ष्यार्थ;व्यंजना-व्यंगार्थ
स्थायीभाव : रती,उत्साह,शोक,क्रोध,हास,भय,जुगुप्सा,विस्मय,शम रस :शृंगार,वीर,करुण,रौद्र,हास्य,भयानक,बीभत्स,अद्भुत,शांत
- वाक्यसंश्लेषण (वाक्य संकलन) :एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवलवाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात.
- दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे
- दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
- दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.
शब्दांचे प्रकार : सिद्ध,साधित, सिद्ध शब्दांचे तीन प्रकार देशी,तत्सम,तद्भव,परभाषी साधित उपसर्गघटीत,प्रत्ययघटीत-कृत(क्रुद्धात)/धातुसाधित आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक,संधी,अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त,पुनरूक्त शब्द,द्विरूकत,अंशाभ्यस्त,ध्वन्य अनुकरणवाचक शब्द. उपसर्ग व प्रत्ययांचे प्रकार :मराठी,संस्कृत,अरबी,फारसी,इंग्लिश,कन्नड,तमिळ,तेलुगू,गुजराथी,हिंदी,इतर
कतृवाचक,साधनार्थक,स्त्रीलिंगी नामे,योग्यार्थक,क्रियावाचक नामे,विशेषणे,भूतकाल वाचक,क्रियावाचक नामे, क्रियेची मजुरी,अव्यये,युक्तार्थक
अपत्यार्थक,संबधार्थक,भावार्थक,भाववाचक,स्थानदर्शक,राखण करणारा,असलेला,खेळणारा ,रमणारा,बांधणारा,ठिकाण/गृह,लिहिणारा,पत्र/ग्रंथ
आ+हार वि+हार सं+हार प्र+हार परि+हार अप+हार उप+हार उप+आ+हार
जन+क
जन+न
जन+ता
जन+नी
जन+य
समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी
१)एकाच सामासिक शब्दांचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात २)समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील तर त्यांचा संधी करावा. जसे विद्या+अभ्यास=विद्याभ्यास, ३)मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड+ओळख=तोंडओळख ४)भिन्न भाषांतील शब्दांचा समास टाळावा.हेड्शिक्षक(हेडमास्तर ठिक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई(घरजावई बरोबर आहे). ५)
आपल्या तोंडावाटे निघणार्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतो.ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतो.ब,द,क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला.एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.'बदक पाण्यात पोहते' हे वाक्य आहे.या वाक्यात तीन पदे आहेत.या वाक्यात तीन पदे आहेत. पद आणि शब्दात फरक आहे. मराठी भाषेत सहसा शब्द त्यांच्या मूळ स्वरूपात न वापरता बदल करून वापरले जातात.या बदललेल्या स्वरूपांना सामान्य रूप म्हणतात.मराठीतील एक पद हे एक शब्द ,त्याचे सामान्यरूप किंवा सामान्य रूपातील शब्दांचा समूह अशा स्वरूपात बनते. वाक्य हे पदांचे बनलेले असते.
नाम:प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना नामअसे म्हणतात. सर्वनाम: जे शब्द नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात.ऊदा. मी,तू,हा,जो,कोण. विशेषणे : जे शब्दा नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषणे असे म्हणतात. उदा.गोड,कडू,दहा,त्याचा क्रियापद: जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना "क्रियापद" म्हणतात. उदा.बसतो,आहे,जाईल क्रियाविशेषण : जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण म्हणतात. शब्दयोगी:जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी म्हणतात. उदा. झाडाखाली,तिच्याकरिता ,त्यासाठी उभयान्वयी: जे शब्द दोन शब्द/पदे किंवा वाक्यांना जोडतात तेव्हा त्यांना उभयान्वयी म्हणतात. केवलप्रयोगी:जे शब्द वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात तेव्हा त्यांना केवलप्रयोगी शब्द असे म्हणतात. उदा.शाब्बास अरेरे,अबब
लिंग,वचन,विभक्ती,सामान्यरूप,,काळ