सत्यवचनाचे फळ (लोककथा)
खरे बोलण्यात धोका असूनसुद्धा ते बोलणे ही उदात्त गोष्ट आहे हे सांगणारी ही लोककथा आहे.
कथेचा आशय
[संपादन]एके दिवशी सकाळी दिल्लीचा सम्राट, सुयोग्य व्यक्तींवर संपत्तीची खैरात करण्यासाठी आपल्या सिंहासनावर बसला होता. समारंभाची घटिका जवळ येत चालली होती.
सारे जण केव्हाच आपापल्या जागी स्थानापन्न झाले होते. पण निमंत्रितांपैकी एक जागा रिकामी होती. सम्राटाच्या लक्षात आले की सय्यद अहमद हा अजून आलेला दिसत नव्हता. समारंभ संपन्न झाल्यावर सम्राट सिंहासनावरून उतरला आणि त्याच्या अतिभव्य महालातून फेरफटका करण्यासाठी वापरायच्या त्याच्या पालखीत जाऊन बसला.अगदी नेमक्या त्याच वेळी सय्यद लगबगीने आत आला.
सय्यदच्या वडिलांचे आणि सम्राटाचे मित्रत्वाचे नाते होते. सय्यदच्या वडिलांना, सम्राट म्हणाले, “तुझ्या मुलाला उशीर झाला आहे.” ते काही उत्तर देणार इतक्यात सम्राटाने सय्यदला विचारले, “का?”
“महाराज,” सय्यद मोकळेपणाने म्हणाला, “कारण मला उठायला उशीर झाला.” आजूबाजूचे लोक त्याच्याकडे अचंब्याने पाहू लागले. ''त्याच्यापाशी सांगण्याजोगी दुसरी कोणती चांगली सबब नाही का, इतक्या धडधडीतपणे तो सम्राटांना सरळसरळ खरे सांगण्याचे धाडस करत आहे. अशा प्रकारे बोलणे मूर्खपणाचेच समजायला हवे,'' अशी त्यांची कुजबुज सुरू झाली.
पण क्षणभर विचार केल्यानंतर, सम्राटाला सय्यदच्या सचोटीचे कौतुक वाटले आणि त्याने त्याला मोत्यांचा कंठहार आणि रत्नजडित मुकुट देऊ केला.
तात्पर्य
[संपादन]जे संकटांना धीराने सामोरे जातात त्यांच्यासाठी गोष्टी प्रथमदर्शनी कठीण वाटल्या तरी त्या पुढे अधिक सुकर होऊन जातात. खोटेपणाचे यश हे अल्पजीवी असते पण बऱ्याचदा, प्रामाणिक असणे ही सर्वाधिक चातुर्याची गोष्ट ठरते.[१]
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.