सती अनसूया (चित्रपट)
सती अनसूया (तेलगू चित्रपट) - १९५७ साली हिंदू पौराणिक कथेवर आधारित असलेला हा चित्रपट आहे. राजश्री प्रोडक्शनचा हा चित्रपट होता. एन.टी.रामाराव, अंजली देवी, जमुना यांची त्यात मुख्य भूमिका होती. हा चित्रपट १९५८ साली तमिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला.
कथानक
[संपादन]ज्ञान श्रेष्ठ की प्रेम श्रेष्ठ असा वादंग एकदा देवदेवतांमध्ये चालू असताना नारदमुनी म्हणतात, प्रेम श्रेष्ठ. तेव्हा ते पटवून देण्याची जबाबदारी यांच्यावर येऊन पडते. आणि तेथे ते सती अनसूयेचा संदर्भ देतात आणि पार्वतीला आपले म्हणणे पटवून देतात असा कथाभाग येथे आहे.
अत्री ऋषी अनसूयेच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेले होते. ते दोघेही शिवभक्त होते, त्यांची पूजा नुकतीच आटोपली होती आणि त्यानंतर ते विश्रांती घेत होते. त्याच दरम्यान देवदेवता या भूतलावर अवतरल्या होत्या, विशेषतः पार्वती आणि त्या देवांनी अनसूयेला पाहिले. तेथून जवळच स्वयंपाकाची चूल पेटलेली पार्वतीने पाहिली. तिने तिच्या दिव्य शक्तीने त्या चुलीतील एक पेटते लाकूड घरंगळवीत अनसूयेच्या पायापाशी आणून सोडले. अनसूयेला त्याची झळ पोहोचू लागली, ती दचकली. तिचे पाय भाजू लागले पण तिने मात्र तोंडातून एक अवाक्षरही काढले नाही, एकदाही ती विचलित झाली नाही, की हलली नाही, काहीच नाही. कारण आपल्यामुळे निद्रिस्त पतीची झोपमोड होऊ नये असे तिला वाटत होते. पण तिने शिवाचा धावा करावयास सुरुवात केली. शिवशंकर तिथेच होते. आणि तिने शिवाचा धावा केल्यामुळे शिवांचे पाय होरपळू लागले. तेव्हा नारदांनी पार्वतींना शिवशंकरांकडे पहावयास सांगितले आणि म्हणाले, “बघा देवी, तुम्ही काय करत आहात, तुमच्यामुळे तुमच्या यजमानांचे पाय भाजत आहेत.” तेव्हा पार्वतीने आपली कृती मागे घेतली, अग्नी मागे वळविला. चित्रपटात असे दाखविले आहे. [१]
अधिक माहितीसाठी पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (1978). Mother’s Agenda - I, 1951-1960. France: Institut de Recherches Evolutives.