Jump to content

सचिन कुमावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सचिन कुमावत हे जळगाव जिल्हातील शेंदुर्नी येथील एक अभिनेते, संगीत निर्माते आहेत, ते अहिराणी भाषेत गाणे बनवतात.[][]

सचिन कुमावत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अहिराणी भाषेतील गीत निर्माण[]
कारकीर्दीचा काळ इ.स. २००६ - चालू
भाषा मराठी

कारकीर्द

[संपादन]

कुमावत हे जळगाव जिल्हातील जामनेर तालुक्यामधील शेंदुर्णी गावचे आहेत, त्याच बालपण तेथेच गेलं. १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जळगावला पोलीटेक्निकला संत मुक्ताबाई इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एस.एम.आय.टी) येथे सिव्हिल इंजिनिअरींगला प्रवेश घेतला व सोबतच गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव येथे पियानो शिकण्यासाठी प्रवेष घेतला, 2 वर्षे पोलीटेक्निक केल्यानंतर त्यांनी ते पूर्ण होण्या आधीच सोडलं व पूर्ण लक्ष संगीत क्षेत्रात लावण्याचं ठरवलं. जळगाव मधील श्रीकृष्ण चौधरी यांनी कुमावत यांना त्यांच्या "आर...दाजीबा" नावाच्या म्युझिक अल्बम मध्ये काम करण्याची संधी दिली, यात त्यानी सर्व गाण्यांसाठी संगीत तयार केले व दोन गाण्यांमध्ये नृत्य सुद्धा केले, त्यातील एक होते "हाई बालंगी इना बालंगापना" आणि दुसरे होते "मलामं मलामं मलामं". भुसावळ येथे एका स्टुडिओत त्यानी गाण्यांची रेकॉर्डिंग केली होती. चौधरींचा फोटो काडन्याचा जळगावात व्यवसाय होता, त्यांच्या फोटो स्टुडिओ माध्ये त्यानी गाने रेकॉर्डींग सुरू केले, त्यात कुमावात काम करत. पुढे कुमावत यांनी शेंदुर्णीला स्वतःचा रेकॉर्डींग स्टुडिओ उघडला. त्यानी अनेक गाणी बनवली आहेत जी उत्तर महाराष्ट्रतील जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली, युटूबवर त्यांचं 'सचिन कुमावत' नावाचं युटूब चेनल आहे, त्यावर या गाण्यांना लाखो लोकांनी पाहिलेल आहे. सैराट च्या "झिंगाट" नंतर सगळ्यात जास्त ट्रेण्ड झालेले गाणं कुमावत यांचं " फुगे ल्या फुगे केसांवर फुगे" हेच होत, व ते महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात सुप्रसिद्ध झाले, या गाण्याने त्यांना व अहिराणी भाषेला प्रसिद्धी मिळवली. [] [] [] ते अहिराणी गाणे उद्योग तील एक आघाडीचं नाव आहेत. [] ते विविध विषयांवर गाने बनवता, जसेकी "ईकस केसावर फुगे" द्वारे त्यांनी सुशिक्षित-बेरोजगारीचा व त्यामुळे मुलांचे न होणारे लग्न हा प्रश्न विनोदी व तितक्याच गंभीर पद्धतीने मांडल, ते धार्मिक, सामाजिक प्रश्न या विषयांव सुद्धा गीत बनवतात. []

वयक्तिक जीवन

[संपादन]

कुमावत हे शेंदुर्णीत राहतात, त्यांचे लग्न झालेले आहे. त्यांच्या परिवाराचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले, ते 8 वित असताना त्यांना पियानो घेऊन दिला.[]

प्रसिद्ध गाने

[संपादन]
वर्ष गाणं गायक अभिनेता संगीतकार संदर्भ
२०१३ आर... दाजिबा (अल्बम) अनेक अनेक स. कू []
२०१७ सावन महिनामा तुला याद कर्णी ये सूरज पाचुंन्दे सचिन कुमावत (स.कु.) स.कु., किशोर शिरसाठ, चंदु मैलागीर []
२८ मार्च २०१९ बाबल्या इकस केसावर फुगे अण्णा सुरवाडे स.कु. स.कु. []
१६ जानेवारी २०२० हाई टम टम चाली रहिनी, हाई शेंदुर्णी पाचोरा जाई रहीनी अण्णा सुरवाडे दिगदर्शक-संगित -गीतकार : स.कु. []
१९ एप्रिल २०२४ छगन मामा तूनी पोर देना अण्णा सुरवाडे निवृत्ती इंगळे, ऋतुजा घोडतुरे, स. कुमावत संगीत: स.कु., गीतकार: स. कु. आणि निवृत्ती इंगळे []
२०२४ बायको माहेरी जय व भय्या मोरे निवृत्ती इंगळे, स.कु. स.कु., गीतकार: निवृत्ती इंगळे,स.कु. []

दूरचित्रवाणी

[संपादन]
वाहिनी कार्यक्रम वर्ष संदर्भ
न्यूझ१८ लोकमत पॉडकास्ट २०२५ []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c बाविस्कर, शिवनंदन (2018-04-23). "तुम्ही पाहिलं का 'सावन महिनामा' ?". Marathi News Esakal. 2025-08-29 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i "Sachin Kumavat Podcast: खान्देशला सगळ्यांच्या चर्चेत आणणारा अवलीया, सचिन कुमावतसोबत खास गप्पा". YouTube. 28 Aug 2025 रोजी पाहिले.
  3. ^ a b |url-https://youtube.com/playlist?list=PLF5WNqrZyGpmtpOcFSUcKWSP3zTvgnLK0&si=IZ3wr2sBhvZ_ROCs%7CTitle="आर...दाजीबा"
  4. ^ https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/gautami-patil-and-sachin-kumavat-coming-together-on-screen-for-ahirani-songs-936235.html
  5. ^ |website=TV9 Marathi|url-https://www.tv9marathi.com/entertainment/bablya-ekas-kesavar-fuge-superhit-ahirani-video-song-by-sachin-kumavat-611563.html