Jump to content

संवेदनाहारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तात्पुरते संवेदनाहरण घडवून आणणारे (बधिरीकरण करणारे) औषध म्हणजे संवेदनाहारक होय. वेदनाशामकांशी तुलना करता, वेदनाशामके संवेदना दूर न करता वेदना दूर करतात. सामान्यतः शस्त्रक्रिया सुलभतेने करण्यासाठी संवेदनाहारके वापरली जातात. आधुनिक काळात अनेक संवेदनाहारके वापरली जातात. संवेदनाहारकांचे सामान्य व स्थानीय असे दोन गट केले जातात. सामान्य संवेदनाहारके जागृतीचा व्युत्क्रमी नाश घडवून आणतात तर स्थानीय संवेदनाहारके जागृती कायम ठेवून शरीराच्या मर्यादित भागांमध्ये व्युत्क्रमी बधिरीकरण करवितात.