संवत्सरांची नावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शालिवाहन शकाच्या संवत्सरांची नावे - ही नावे काही विशिष्ट घटनांची त्या त्या वर्षातील नोंद घेऊन केली असावीत. (भृगू संहिता - जातक खंड). हा काल दोन ते अडीच हजार वर्षांचा असावा. खाली देण्यात आलेली नावे 'चांद्र संवत्सरांची' आहेत. ही एकूण ६० संवत्सरे आहेत. ही साठ वर्षे संपली की (म्हणजे शेवटवा 'क्षय संवत्सर' झाल्यानंतर) पुन्हा प्रभव या नावाचे नवे संवत्सर सुरू होते. कंसात इसवी सनाचा क्रमांक दिला आहे.

 1. प्रभव (१९२७-२८, १९८७-८८)
 2. विभव (१९२८-२९, १९८८-८९)
 3. प्रमोद (१९२९-३०, १९८९-९०)
 4. शुक्ल (१९३०-३१, १९९०-९१)
 5. प्रजाधीश ( १९३१-३२, १९९१-९२)
 6. अंगिरा (१९३२-३३, १९९२-९३)
 7. श्रीमुख (१९३३-३४, १९९३-९४)
 8. भाव (१९३४-३५, १९९४-९५)
 9. युव (१९३५-३६, १९९५-९६)
 10. धातृ (१९३६-३७, १९९६-९७)
 11. ईश्वर (१९३७-३८, १९९७-९८)
 12. बहुधान्य (१९३८-३९, १९९८-९९)
 13. प्रमाथी (१९३९-४०, १९९९-२०००)
 14. विक्रम (१९४०-४१, २०००-२००१)
 15. वृष (१९४१-४२, २००१-२००२)
 16. चित्रभानु (१९४२-४३, २००२-२००३)
 17. सुभानु (१९४३-४४, २००३-२००४)
 18. तारण (१९४४-४५, २००४-२००५)
 19. पार्थिव (१९४५-४६, २००५-२००६)
 20. व्यय (१९४६-४७, २००६-२००७)
 21. शरत्‌ (सर्वजित) (१९४७-४८, २००७-२००८)
 22. सर्वधारी (१९४८-४९, २००८-२००९)
 23. विरोधी (१९४९-५०, २००९-२०१०)
 24. विकृत (१९५०-५१, २०१०-२०११)
 25. खर (१९५१-५२, २०११-२०१२)
 26. नंदन (१९५२-५३, २०१२-२०१३)
 27. विजय (१९५३-५४, २०१३-२०१४)
 28. जय (१९५४-५५, २०१४-२०१५)
 29. मन्मथ (१९५५-५६, २०१५-२०१६)
 30. दुर्मुख (१९५६-५७, २०१६-२०१७)
 31. विलंब (१९५७-५८, २०१७-२०१८)
 32. हेमलंब (१९५८-५९, २०१८-२०१९)
 33. विकारी (१९५९-६०, २०१९-२०२०)
 34. शार्वरी (१९६०-६१, २०२०-२०२१)
 35. प्लव (१९६१-६२, २०२१-२०२२)
 36. शुभकृत्‌ (१९६२-६३, २०२२-२०२३)
 37. शोभन (१९६३-६४, २०२३-२०२४)
 38. क्रोधी (१९६४-६५, २०२४-२०२५)
 39. विश्वावसु (१९६५-६६, २०२५-२०२६)
 40. पराभव (१९६६-६७, २०२६-२०२७)
 41. प्लवंग (१९६७-६८, २०२७-२०२८)
 42. कीलक (१९६८-६९, २०२८-२०२९)
 43. सौम्य (१९६९-७०, २०२९-२०३०)
 44. साधारण (१९७०-७१, २०३०-२०३१)
 45. विरोधकृत्‌ (१९७१-७२, २०३१-२०३२)
 46. परिधावी (१९७२-७३, २०३२-२०३३)
 47. प्रमादी (१९७३-७४, २०३३-२०३४)
 48. आनंद (१९७४-७५, २०३४-२०३५)
 49. राक्षस (१९७५-७६, २०३५-२०३६)
 50. नल (१९७६-७७, २०३६-२०३७)
 51. पिंगल (१९७७-७८, २०३७-२०३८)
 52. काल (युक्त) (१९७८-७९, २०३८-२०३९)
 53. सिद्धार्थ (१९७९-८०, २०३९-२०४०)
 54. रौद्र (१९८०-८१, २०४०-२०४१)
 55. दुर्मति (१९८१-८२, २०४१-२०४२)
 56. दुंदुभी (१९८२-८३, २०४२-२०४३)
 57. रुधिरोद्गारी (१९८३-८४, २०४३-२०४४)
 58. रक्ताक्षि (१९८४-८५, २०४४-२०४५)
 59. क्रोधन (१९८५-८६, २०४५-२०४६)
 60. क्षय (१९८६-८७, २०४६-२०४७)

हीच नावे विक्रम संवत्सरांची आहेत, पण त्यांचा इसवी सन वेगळा असतो.

शालिवान संवत्सराचे नाव वरील नावापैकी एक असते. ते कसे निश्‍चित करतात याचे गणित[संपादन]

१). शालिवाहन शकाच्या संख्येत १२ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे जी बाकी राहील त्या अंकाइतक्या क्रमांकाचा संवत्सर, म्हणजे प्रभव संवत्सरापासून मोजल्यावर त्या क्रमांकावर जे नाव येईल ते त्या शकाचे नाव समजावे.

उदा० इ.स. २०१३ सालच्या गुडीपाडव्याला शके १९३५ सुरू झाला.

१९३५ + १२ = १९४७

१९४७ ला ६० ने भागितल्यास भागाकार ३२ आणि बाकी २७ राहील.

या बाकी २७ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास २७ वे विजय संवत्सर येते. हे शके १९३५ या शकाचे नाव. इ.स. २०१४च्या शकाचे नाव जय; आणि २०१५ साली मन्मथ या नावाचा शक-संवत्सर होता.

विक्रम संवत्सराचे नाव काढण्याची रीत[संपादन]

विक्रम संवत्सराच्या आकड्यात ९ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे. उरलेल्या बाकी एवढे अंक प्रभव संवत्सरापासून मोजावे म्हणजे विक्रम संवत्सराचे नाव मिळेल.

उदा० २०१३ साली दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत २०७० सुरू झाला.

२०७० + ९ = २०७९

२०७९ ला ६० ने भागल्यास भागाकार ३४ व बाकी ३९ उरते.

३९वे संवत्सर ‘विश्‍वावसु’ आहे.

म्हणून इ.स. २०१३ साली दिवाळीच्या पाडव्यानंतर चालू झालेल्या विक्रम संवत्सराचे नाव विश्‍वावसु संवत्सर होते. इ.स. २०१४ला पराभव नावाचा विक्रम संवत होता, तर २०१५ सालच्या विक्रम संवत्सराचे नाव प्लवंग.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.