Jump to content

संध्या धर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संध्या धर
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSandhya संपादन
आडनावधर संपादन
जन्म तारीख1980 संपादन
जन्मस्थानश्रीनगर संपादन
व्यवसायboccia player, disability rights activist संपादन
खेळboccia संपादन
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार संपादन

संध्या धर (जन्म: १९८०) या एक भारतीय अपंगत्व हक्क कार्यकर्त्या आहेत. त्यांना लहान वयातच प्रमस्तिष्क घात (सेरेब्रल पाल्सी) असल्याचे निदान झाले. ज्यामुळे त्या बालपणापासून चाकाची खुर्ची वापरतात. त्यांनी २०१५ मध्ये अपंगांना मदत करण्यासाठी जम्मू इन्स्टिट्यूट ऑफ जनरल एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन (JIGER) ची स्थापना केली. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना २०२० चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कारकिर्द

[संपादन]

धर यांचा जन्म १९८० च्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरच्या उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथे एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. काही महिन्यांची असताना त्यांना ताप आला ज्यामुळे अर्धांगवायू झाला आणि प्रमस्तिष्क घात असल्याचे निदान झाले.[] त्यांच्या पालकांनी त्यांना दोन वर्षांसाठी नवी दिल्लीस्थित 'पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय शारीरिक दिव्यांगजन संस्थान' येथे पाठवण्यात आले. नंतर पाचव्या वर्षापासून, त्या स्थानिक शाळेत गेल्या. कालांतराने हे कुटुंब जम्मूला गेले. इथे धर यांना चांगल्या सुविधा लाभल्या. पुढे त्यांनी प्रथम 'आदर्श शिक्षा निकेतन शाळेत' आणि नंतर 'एम. दास शाळेत' शिक्षण घेतले. मग 'गवर्नमेंट डिग्री कॉलेज परेड ग्राउंड, जम्मू' येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ज्यात वाणिज्य शाखेतील पदवी, वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर, संगणक विज्ञानात पदविका आणि व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर (एमबीए) इत्यादी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारच्या वित्त विभागात काम केले.[] धर बोसिया खेळात पारंगत असल्याने २०२२ सालचे बोसिया राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.[]

धर या अपंग असल्याने कालांतराने अपंगत्व हक्क कार्यकर्त्या बनल्या. २०१५ साली त्यांनी जम्मू इन्स्टिट्यूट ऑफ जनरल एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन (JIGER) ची स्थापना केली. ही संस्था अपंगांना मदत करते आणि अपंग शिक्षकांकडून शिकवले जाणारे धडे देते.[][]२०२२ मध्ये, या संस्थेने ४०० हून अधिक अपंग मुलांना मदत केली.[]

२०२२ मध्ये, तिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०२० चा नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[] जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी २०२२ मध्ये सांगितले की, धर, नासिरा अख्तर आणि नशीमन अश्रफ, या महिला त्या प्रदेशातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.[]

प्रकाशने

[संपादन]
  • धर, संध्या (२०१५). पॉलिटिकल काँशियसनेस इन जम्मू रिजन, १९०४–१९७७. नवी दिल्ली, भारत. ISBN 978-93-5128-104-7.
  • धर, संध्या (२०१९). पॉलिटिकल अवेकनिंग इन जम्मू रिजन: परिषद आणि चर्चासत्रांमध्ये सादर केलेले शोधनिबंध. दिल्ली. ISBN 978-93-5324-029-5.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 Jamwal, Akriti (२०१९-०४-१२). "Wheeling forth for the cause". द न्यूज नाऊ. 2022-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-०३ रोजी पाहिले.
  2. "Sandhya remains 3rd in Boccia Championship". टीएनएन लाइव्ह. २०२२-०३-२२. २०२२-०५-३१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-०३ रोजी पाहिले.
  3. Khan, M. Aamir (२०२२-०३-१०). "'Unsung heroes': Meet J&K women who received 'Nari Shakti' award from President – The Kashmir Monitor". The Kashmir Monitor. २०२६-०२-०३ रोजी पाहिले.
  4. 1 2 Kainthola, Deepanshu (२०२२-०३-०८). "President Presents Nari Shakti Puraskar for the Years 2020, 2021". Tatsat Chronicle Magazine (इंग्रजी भाषेत). २०२६-०२-०३ रोजी पाहिले.
  5. "Sandhya Dhar wheeling the change for disabled". Conscious Carma. २०२२-०४-०८. २०२५-१२-११ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०२-०३ रोजी पाहिले.
  6. ""Awaam Ki Awaaz" completes one year". knskashmir.com. २०२२-०३-२०. २०२६-०२-०३ रोजी पाहिले.