संदीप काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संदीप काळे
Sandip ramrao kale.jpg
जन्म ऑगस्ट १५, इ.स. १९८२
हिंगोली, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम.ए., एम.सी.जे एम. बी. ए. आणि डी.एन.वाय.एस.(Diploma in Naturopathy & Yogic Sciences)
प्रशिक्षणसंस्था मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र
पेशा पत्रकारिता
कारकिर्दीचा काळ इ.स. २००० पासून
पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्कार
संकेतस्थळ
http://www.yinforchange.org/

संदीप काळे sandip kale (ऑगस्ट १५, इ.स. १९८२ - हयात) हे सकाळ [१] माध्यम समूहाचे संपादक, टीव्ही अँकर [२], लेखक आणि कवी आहेत. त्याच बरोबर ते सकाळ माध्यम समूहात यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)[३] चे प्रमुख म्हणून काम पाहतात. [४] यिनच्या माध्यमातून शिक्षण आणि नेतृत्व विकास या क्षेत्रात अनेक कार्यक्रम ते राबवतात.

शिक्षण[संपादन]

sandip kale संदीप काळे यांचे शालेय शिक्षण पाटणूर, ता. अर्धापूर जि. नांदेड येथे व महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथे झाले.. बी.ए.पर्यंतचे शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयात घेतल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एम.ए. केल्यावर, एम.सी.जे.(Master of Communication & Journalism) अर्थात पत्रकारितेची पदवी संपादन केली.

कार्य[संपादन]

पत्रकारितेची पदवी मिळवल्यानंतर ‘लोकमत’ ‘सांजवार्ता’, ‘प्रहार, ‘आयबीएन लोकमत’[५], ‘उद्याचा मराठवाडा’[६] अशा वेगवेगळ्या दैनिकांत आणि न्यूज चॅनलमध्ये त्यांनी काम केले आहे.[७] ‘नेटवर्क 18’ सारख्या भारतातील प्रसिद्ध माध्यम समूहांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. नांदेड येथील विवेकानंद महाविद्यालयात पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे. जय महाराष्ट्र या प्रसिद्ध मराठी न्यूज चॅनेल साठी मराठवाडा संपादक म्हणून काम पहिल्या नंतर २०१३ पासून सकाळ माध्यम समूहात ते संपादक आहेत.[८] तसेच याच सकाळ माध्यम समूहाच्या द्वारे चालवण्यात येणाऱ्या यिन या चळवळीची सुरूवात त्यांनी केली. यिनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व महाविद्यालयात निवडणूका आणि त्या माध्यमातून यिन मंत्री मंडळाची नेमणूक करण्यात येते. तसेच या मंत्री मंडळाच्या माध्यमातून राज्यात शिक्षण आणि विकास या क्षेत्रात विविध कार्यक्रम पार पडले जातात. यात, फूटपाथ स्कुल, मॉडेल व्हिलेज, निसर्ग संवर्धन, व्यक्तीमत्व विकास अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.[९] यिनचे जाळे राज्यातल्या सर्व महाविद्यालयात पसरले आहे. यिनमध्ये आज काम करणाऱ्या युवकांची संख्या २५ लाखांच्या घरात आहे. या शिवाय राज्यातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.[१०]

संशोधन[संपादन]

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे आणि उपाय यावर ते नांदेड विद्यापीठात संशोधन करत आहेत.[११] या प्रश्नावर त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब ते देशाचे कृषी मंत्री इथपर्यंत अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. यामध्ये शरद पवार, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, प्रकाश पोहरे, गंगाप्रसाद अग्रवाल, विकास आमटे आदींचा समावेश आहे.

राज्यातील युवकांच्या नेतृत्व गुणांचा विकास, त्यांचा उच्च शिक्षणाच्या प्रवाहातील समावेश, स्त्रीशिक्षण अशा अनेक विषयांवर संशोधन करून त्या संशोधनाची त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अंमलबाजवणी केली.

लिहिलेली पुस्तके[संपादन]


........................................................


भ्रमंती लाईव्ह[संपादन]

संदीप काळे sandip kale यांचे  भ्रमंती लाईव्ह हे सकाळच्या सप्तरंग या पुरवणीत मधील सदर सध्या मराठीतील सर्वात लोकप्रिय सादर आहे. दर रविवारी हे सदर प्रकाशित होते. या सदरच्या माध्यमातून अनेक घटकांना न्याय देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे.   https://www.esakal.com/saptarang/sandeep-kale-write-wardha-bramanti-live-article-saptarang-165374 https://www.esakal.com/saptarang/saptarang-sandip-kale-write-bhramti-live-article-210431

पुरस्कार[संपादन]

पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना संदीप काळे sandip kale यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, चौथा स्तंभ पुरस्कार[१३], महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सत्यशोधक पत्रकारिता पुरस्कार, शांताबाई जोशी पत्रकारिता पुरस्कार, शिवजन्मोत्सव पत्रकार पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकाररत्न गौरव पुरस्कार, दोन वेळा महाराष्ट्र पत्रकारभूषण गौरव पुरस्कार, महाराष्ट्र दीप पुरस्कार, कै. बाबा दळवी शोध पत्रकारिता पुरस्कार, शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार,यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार,नांदेड विकासरत्न पुरस्कार,साने गुरुजी सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.

यिनबझ YINBUZZ[संपादन]

‘सकाळ’ने युवकांसाठी सुरू केलेल्या यिनबझ या पोर्टलचे संपादक. आठ महिन्यांत या पोर्टलवर एक कोटी तरुणांना विचारपीठ मिळाले आहे. देशात फक्त युवकांसाठी काहीतरी करण्याची नोंद या वेबपोर्टलने केली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

 • ^ संदीप काळे. "यश आंतरजातीय विवाहाचे’ सकाळ मधील लेखन". Sakal. 
 • ^ साम टीव्ही. "मोठ्ठ व्हायचंय ,मला". साम टीव्ही. 
 • ^ डिलिव्हरिंग चेंग फाउंडेशन. "’यिन’ चे अधिकृत संकेतस्थळ". Sakal. 
 • ^ सकाळ वृत्तसेवा. "नितीन गडकरींशी आज तरुणाईचा संवाद". Sakal. [मृत दुवा]
 • ^ संदीप काळे. "आयबीएन लोकमतचे केलेले एक वार्तांकन". ibnlokmat. 
 • ^ ग्लोबल मराठी. "उद्याचा मराठवाडा संपादकीय कार्य". ग्लोबल मराठी. 
 • ^ संदीप काळे. "सर संमेलनाध्यक्ष लेख". नवशक्ती. 
 • ^ सकाळ वृत्तसेवा. "नांदेड येथील महिला भूषण पुरस्कारास सहयोगी संपादक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती". Sakal. 
 • ^ MH News. "‘आम्ही घडू देशासाठी’ यूथ छावणी शिबिर". MH News. 
 • ^ सकाळ वृत्तसेवा. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंमेलनाचे रविवारी उद्‌घाटन". Sakal. 
 • ^ दिनकर गांगल. "शेतकरी प्रश्नावरील संशोधनाचा संदर्भ". थिंक महाराष्ट्र. 
 • ^ ब्युरो रिपोर्ट,नांदेड. "काळे यांच्या ‘अनावृत-वृत्तापलीकडचे’ या पुस्तकाचे प्रकाशन कविवर्य फ. मु. शिंदे हस्ते झाले त्यावरील लेख". भारत४इंडिया. 
 • ^ सकाळ वृत्तसेवा. "'चौथा स्तंभ'चे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर". सकाळ.