संत्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
संत्र्याची फळे
संत्रे

संत्रे (शास्त्रीय नाव:सिट्रस सिनेन्सिस) हे नारिंगी रंगाचे, आंबट-गोड लिंबू वर्गातील एक फळ आहे.

घटक[संपादन]

रसदार संत्र्यात अनेक पोषक घटक असतात. संत्रे रुचकर आणि पौष्टिक आहे. त्यात अ, ब आणि क जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम असते. शिवाय सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, सल्फर आणि क्लोरीन असते. संत्र्यावरच्या आवरणात अधिक कॅल्शियम असते. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातल्या रक्ताला क्षारमय बनवते.