संजय सोनवणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संजय सोनवणी
जन्म संजय सोनवणी
८ फेब्रुवारी, १९६४ (1964-14-08) (वय: ५७)
जळगाव, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र लेखन, संपादन, प्रकाशन, व्याख्याता, व्यावसायिक
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८० - चालू
भाषा मराठी,
प्रमुख चित्रपट मराठी: अमानुष-एक थरार ‌
वडील देविदास सोनवणी
आई इंदुमती सोनवणी
अधिकृत संकेतस्थळ http://sanjaysonawani.blogspot.in/

संजय सोनवणी (जन्म १४ ऑगस्ट १९६४): हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक, ब्लॉगर आहेत. संजय सोनवणी यांची सामाजिक प्रश्नांवरची भूमिका अनेकदा वादग्रस्तही ठरली आहे. कथा, कादंबरी, कविता, तत्वज्ञान, इतिहास संशोधन असे चौफेर लेखन त्यांनी केले आहे. हिंदू धर्म आणि वैदिक धर्म सर्वस्वी वेगवेगळे धर्म असल्याबाबतचे त्यांचे संशोधन सध्या चर्चेचा विषय झाले आहे.

जीवन[संपादन]

महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. संजयने राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी एम.कॉम ही पदवी प्राप्त केली .संजयने राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी एम.कॉम ही पदवी प्राप्त केली. ५००० रुपयांच्या भांडवलावर त्यांनी जाहिरात संस्था काढून वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी व्यवसायाची सुरुवात केली होती पुढे गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त भागात त्यांनी काही काळ धातु-भुकटी कारखाना चालविला.. संगणक प्रक्रिया प्रणाली तयार करण्याचा उद्योगही उभारला. या दोन्ही कंपन्या मुंबई भाग-भांडवल बाजारात नोंदनीकृतही झाल्या. सासवड येथे centrifugal fans उत्पादित करण्याचा कारखानाही काढला. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्‍न केला पण राजकीय कारणांनी तो अयशस्वी ठरला.. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. २००५ पासून व्यवसायातून निवृत्त होऊन त्यांनी पूर्ण वेळ लेखक-संशोधक म्हणून आवडीच्या क्षेत्रात झोकून दिले. [१]

साहित्य प्रवास[संपादन]

सोनवणींनी ते ११ वर्षांचे असताना "फितुरी" हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर विजय) मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. त्यांच्या कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित झाल्या. भारतातील स्वतंत्र प्रज्ञेचे ते पहिला थरार कादंबरीकार मानले जातात. त्यांने एकून २८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय थरार कादंबऱ्या लिहिलेल्या असून "On the Brink of the Death" ही इंग्रजीतील थरार कादंबरी जगभर गाजलेली आहे. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबऱ्या आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहिलेली "The Awakening" ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनिफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही गाजलेली सांस्कृतिक थरारकथाही आहे. त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी सर्वावधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा नीतिशास्त्र हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. अलीकडेच त्यांची "हिरण्यदुर्ग" ही अद्भुतरम्य कादंबरीही प्रकाशित झाली असून "भाषेचं मूळ" या पुस्तकातून त्यांनी भाषानिर्मितीचा प्रश्न सोडवत प्राकृत भाषाच मूळ कशा आहेत हे सिद्ध करून दाखवले आहे.

संजय सोनवणी यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" नामक पुस्तकात मांडला आहे.

सोनवणी यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ लिहिले. त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

संशोधन[संपादन]

संजय सोनवणी यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" नामक पुस्तकात मांडला आहे.

सोनवणी यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास", "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान या विषयावरचे Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation हा सोनावणी यांचा ग्रंथ २०१५ साली प्रकाशित झाला.

सोनवणी यांनी लोहभुकटी निर्मितीचे, संगणकप्रणालीचे व सेंट्रिफ्युगल पंखे निर्मितीचेही उद्योग उभारले होते व ते लोहभुकटी तंत्रज्ञानातील देशातील नामवंत तज्ज्ञ मानले जातात.

सोनवणी यांची आजवर मराठी व इंग्रजी अशी एकूण शंभरावर पुस्तके लिहिली आहेत. ते संगीतकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शकही आहेत.

वाद-विवाद[संपादन]

संजय सोनवणी आणि अनिता पाटील यांचे ब्लॉगवरून वैचारिक भांडण झाले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या साने गुरुजी, पु. ल. देशपांडे कुसुमाग्रज आदि नामवंत मराठी साहित्यिकांच्या समीक्षा लेखांवर सोनवणी यांनी टीका करणारे लेख स्वतःच्या ब्लॉगवर लिहिले. त्याला अनिता पाटील यांनी उत्तर दिले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील एक लेखक रवींद्र तहकिक यांनीही सोनवणी यांच्या लेखावर उत्तर दिले. सोनवणी आणि अनिता पाटील हे दोन्ही ब्लॉगर पुरोगामी विचारांचे असले, तरी त्यांच्यात खूप वैचारिक मतभेद आहेत.

पुरस्कार[संपादन]

पुरस्कारांसाठी लेखकाने पुस्तके पाठवणे हा लेखकाचा अपमान आहे असे त्यांचे मत असल्याने त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या प्रकाशकांवर "पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवायची नाहीत." असे बंधन घातल्यामुळे त्यांना एकही साहित्य पुरस्कार मिळालेला नाही. औद्योगिक विश्वातील कामगिरीमुळे मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता ते इंदिरारत्‍न असे जवळपास ८ पुरस्कार मिळालेले आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

थरार-कादंबऱ्या[संपादन]

 • अंतिम युद्ध (२ आवृत्त्या)
 • अपहरण (४ आवृत्त्या)
 • धोका
 • पराभव (३ आवृत्त्या)
 • ब्लडी आयलंड
 • महाद्वार (२ आवृत्त्या)
 • मृत्युरेखा (५ आवृत्त्या)
 • रक्तराग (२ आवृत्त्या)
 • वॉरटाइम (२ आवृत्त्या)
 • विश्वनाथ (२ आवृत्त्या)
 • शिल्पी (२ आवृत्त्या)

सांस्कृतिक थरार[संपादन]

 • असुरवेद (२ आवृत्त्या)

वैद्यकीय कादंबऱ्या[संपादन]

 • थेंब...थेंब मृत्यू...(३ आवृत्त्या)

राजकीय थरार[संपादन]

 • डेथ ऑफ द प्राइममिनिस्टर (४ आवृत्त्या)
 • बीजिंग कॉन्स्पिरसी (२ आवृत्त्या)
 • ब्लॅकमेल
 • रक्त हिटलरचे, (३ आवृत्त्या)
 • बीजिंगच्या वाटेवर

राजकीय उपहास[संपादन]

 • आभाळात गेलेली मानसं (३ आवृत्त्या)
 • गुड्बाय प्राइममिनिस्टर

ऐतिहासिक कादंबऱ्या[संपादन]

 • अखेरचा सम्राट (२ आवृत्त्या)
 • ...आणि पानिपत
 • कुशाण (२ आवृत्त्या)
 • क्लिओपात्रा (७ आवृत्त्या)
 • फितुरी
 • महाराजा यशवंतराव होळकर
 • मी मृत्युंजय... मी संभाजी
 • हिरण्यदुर्ग

तत्त्वज्ञानात्मक कादंबऱ्या[संपादन]

 • कल्की (३ आवृत्त्या)
 • यशोवर्मन (४ आवृत्त्या)
 • शून्य महाभारत (२ आवृत्त्या)

सामाजिक कादंबऱ्या[संपादन]

 • अखेरचे वादळ (३ आवृत्त्या)
 • काळोख (२ आवृत्त्या)
 • खळबळत्या सागरकाठी (२ आवृत्त्या)
 • खिन्न रात्र (३ आवृत्त्या)
 • विकल्प (३ आवृत्त्या)
 • सव्यसाची (२ आवृत्त्या)

पौराणिक कादंबऱ्या[संपादन]

 • अश्वत्थामा (६ आवृत्त्या)
 • ओडीसी (३ आवृत्त्या)

वैज्ञानिक संशोधनात्मक पुस्तक[संपादन]

 • अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती

तत्त्वज्ञान[संपादन]

 • नीतिशास्त्र
 • ब्रह्मसूत्ररहस्य

इतिहास संशोधन[संपादन]

 • Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation (इंग्रजी)
 • भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते: महाराजा यशवंतराव होळकर
 • भाषेचं मूळ (भाषांच्या उदयाचे रहस्य उलगडून दाखवणारे पुस्तक)
 • महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप
 • विठ्ठलाचा नवा शोध
 • हिंदू धर्माचे शैव रहस्य

सामाजिक/वैचारिक[संपादन]

 • कॉर्पोरेट व्हिलेज: एक गांव:एक कंपनी:एक व्यवस्थापन,
 • दहशतवादाची रूपे
 • प्रेम कसे करावे?
 • भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य
 • मुंबई २६/११...पूर्वी आणि नंतर
 • सद्दाम हुसेन: एक झंझावात

काव्यसंग्रह[संपादन]

 • पर्जन्यसूक्त
 • प्रवासी
 • संतप्त सूर्य

नाटके[संपादन]

 • गड्या तू माणूसच अजब आहेस
 • त्या गावाचं काय झालं?
 • मीच मांडीन खेळ माझा
 • रात्र अशी अंधारी
 • राम नाम सत्य है
 • विक्रमादित्य

बाल/किशोर साहित्य[संपादन]

 • अंतराळात राजू माकड
 • दुष्ट जोनाथनचे रहस्य
 • नरभक्षकांच्या बेटावर विजय
 • रत्‍नजडित खंजिराचे रहस्य
 • रानदेवीचा शाप
 • रे बगळ्यांनो
 • साहसी विशाल
 • सैतान वज्रमुख
 • सोन्याचा पर्वत

इंग्रजी पुस्तके[संपादन]

 • The Awakening (या पुस्तकाचा याच नावाचा मराठी अनुवाद विजय तरवडे यांनी केला आहे.)
 • Dancing with the Rains
 • Death of the prime minister
 • Heart of the Matter (Full length play)
 • The Jungle
 • Last of the wanderers
 • The mattalions
 • Monsoon Sonata (Poetry)
 • On the brink of Death
 • Origins of the Vedic Religion and Indus-Ghuggar Civilisation
 • Raging Souls

चित्रपटकथा[संपादन]

 • अखेरचे वादळ (निर्माणाधीन)
 • अमानुष : एक थरार

संगीत[संपादन]

 • इट्स माय ड्रीम (संगीत-गीत)
 • ओ जानेजां (गीत-संगीत. गायक- नितीन मुकेश)
 • मनात माझ्या (गीत-संगीत-गायन)

संकीर्ण[संपादन]

 • किर्लोस्कर आणि अन्य अनेक मासिकांत विविध सामाजिक प्रश्नांवरील व धर्मावरील आठशेहून अधिक वैचारिक लेख.

बाह्य दुवे[संपादन]

 1. ^ Empty citation (सहाय्य)