संजय कपूर (उद्योजक)
Indian Businessman (1971-2025) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर १५, इ.स. १९७१, इ.स. १९७१ दिल्ली | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून १२, इ.स. २०२५ (५३), इ.स. २०२५ विंडसर | ||
मृत्युचे कारण |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
![]() |
संजय कपूर (१५ ऑक्टोबर, १९७१ - १२ जून, २०२५) हे एक भारतीय वंशाचे बहुराष्ट्रीय उद्योगपती आणि अब्जाधीश होते. कपूर हे वाहनांचे सुटेभाग बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. याच सोबत त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसीएमए) चे अध्यक्षपद देखील भूषवले होते. चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटीत पती, प्रिन्स विल्यम यांचे जवळचे मित्र तसेच सोना ग्रुपचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुरिंदर कपूर यांचे ते पुत्र अशी त्यांची ओळख होती.[१]
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]संजय कपूर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९७१ रोजी राणी कपूर आणि सुरिंदर कपूर यांच्या घरी दिल्ली[२] येथे झाला.[३][४] कपूर हे उच्चशिक्षित होते. त्यांनी प्रथम देहरादून येथील द डून स्कूलमधून आणि नंतर मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी लंडनमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. यानंतर त्यांनी एमआयटी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रतिष्ठित कार्यनिष्पादनपरक अभ्यासक्रम (executive courses) पूर्ण केले.[३][५]
कपूर हे ऑटो कंपोनेंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये त्यांचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी केली होती, जे भारतातील वाहनांचे सुटेभाग उद्योगातील एक अग्रणी होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर संजयने व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सोना कॉमस्टारचे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी सुटे भाग पुरवते.[६]
अमेरिकन नागरिकत्व असलेल्या संजय यांनी २०२२ मध्ये जगातील अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या मते, त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (म्हणजेच ₹ १०,३०० कोटी) होती. यातील मोठा वाटा गुरुग्राम येथील मुख्यालय असलेल्या सोना कॉमस्टारकडून येतो. ही कंपनी १२ उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत ५,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवते.[६][७]
वैवाहिक आयुष्य
[संपादन]कपूर यांचे पहिले लग्न दिल्लीतील शैली अभिकल्पक (फॅशनेबल स्टायलिस्ट) नंदिता महतानीशी १९९६ मध्ये झाले आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००३ मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केले. या जोडीला दोन मुले झाली, पैकी २००५ मध्ये मुलगी समायरा आणि २०११ मध्ये मुलगा कियान यांचा जन्म झाला होता. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर संजय आणि करिश्मा अधिकृतपणे २०१६ मध्ये वेगळे झाले. कपूर यांचा तिसरा विवाह प्रिया सचदेव सोबत २०१७ साली झाला. या जोडप्याला एक मुलगा अजारियस जन्माला आले.[१][७][८]
मृत्यू
[संपादन]१२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान कोसळून त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळत असताना मधमाशी गिळल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे टेलिग्राफने वृत्त दिले आहे. एक मधमाशी अनवधानाने त्याच्या तोंडात शिरून चावल्याने त्यांना अॅनाफिलेक्टिक शॉक आला होता.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Karisma Kapoor heads to Delhi with kids for ex-husband Sunjay Kapur's funeral, Kareena Kapoor and Saif Ali Khan join" (इंग्लिश भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "बिजनेस वर्ल्ड के टाइकून्स में से एक थे करिश्मा कपूर के एक्स हसबैंड संजय कपूर, जानें एजुकेशन से प्रोफेशन तक सबकुछ". एबीपी लाइव्ह (हिंदी भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Who was Sunjay Kapur? Karisma Kapoor's ex-husband, businessman with degrees from MIT and Harvard, and polo enthusiast". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्लिश भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Sunjay Kapur, Businessman and Ex-Husband of Bollywood Star, Dies at 53". The New York Times (इंग्लिश भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "कौन थे संजय कपूर? जानिए करिश्मा के एक्स हसबैंड की वाइफ और बच्चों के बारे में सबकुछ". जनसत्ता (हिंदी भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Sunjay Kapur". फोर्ब्स (इंग्लिश भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b "How much will Karisma Kapoor and Sunjay Kapur's children inherit of billionaire's ₹10,300 crore wealth?". livemint (इंग्लिश भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Who is Sunjay Kapur's wife Priya Sachdev? Socialite-turned actor once shared screen with Kareena Kapoor". हिंदुस्तान टाइम्स (इंग्लिश भाषेत). १९ जून २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]