Jump to content

संघ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संघ विधानसभा मतदारसंघ
सिक्कीम विधानसभा मतदारसंघ
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानसिक्किम संपादन
भौगोलिक गुणक२७°३३′०″N ८८°३०′०″E संपादन
Map

संघ विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या ईशान्य प्रदेशातील सिक्कीम राज्याच्या ३२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा सिक्कीम लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.[१] सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा पक्षाचे सोनम लामा हे २०१४ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत.

ही जागा सिक्कीमच्या बौद्ध भिक्षू समुदायासाठी (संघ) राखीव आहे.[२] राज्यातील १११ मान्यताप्राप्त मठांमध्ये नोंदणीकृत असलेले बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी,[३] फक्त या विधानसभा जागेसाठी निवडणूक लढवू शकतात आणि मतदान करू शकतात.[२]

सिक्कीम राज्य परिषदेचे सदस्य

[संपादन]

चोग्याल यांच्याकडे मठ संघटनांनी केलेल्या विनंतीनंतर,[४] सिक्कीम राज्य परिषदेसाठी १९५८ मध्ये संघ मतदारसंघ तयार करण्यात आला होता.[५]

 
निवडणूक सदस्य पक्ष
१९५८ ल्हारिपा रिनझिंग लामा[६][७] सिक्कीम राष्ट्रीय पक्ष[४]
१९६७ पेमा लामा अपक्ष
१९७० रिनझिंग चेवांग लामा [८]
१९७३ पेचिंग लामा[९] सिक्कीम राष्ट्रीय पक्ष[४]
१९७४ कर्मा गोम्पू लामा[१०] सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेस[११]

विधानसभेचे सदस्य

[संपादन]

१९७५ च्या सिक्कीममधील राजेशाहीवरील सार्वमतानंतर, सिक्कीम भारताचे एक राज्य झाले आणि तत्कालीन राज्य परिषदेच्या सदस्यांना नवीन सिक्कीम राज्याची विधान सभा मानण्यात आले.

 
निवडणूक सदस्य पक्ष
१९७४ कर्मा गोंपू लामा[१०] सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेस[११]
१९७९[१२] ल्हाचेन गनचेन रिम्पुछी अपक्ष
१९८५[१३] नामखा ग्याल्तसेन[१०] सिक्कीम संग्राम परिषद
१९८९[१४]
१९९४[१५] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ पालदेन लामा[१६] अपक्ष
२००४ शेरिंग लामा[१७] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ फेतुक भूतिया[१८] सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट
२०१४[१९] सोनम लामा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा
२०१९[२०]
२०२४

सर्वोच्च न्यायालयातील खटला

[संपादन]

१९९३ मध्ये, रायझिंग सन पार्टीचे राम चंद्र पौड्याल [२१] यांनी सिक्कीममधील संघ मतदारसंघ आणि भुतिया-लेपचा मतदारसंघांसाठी असलेल्या आरक्षणाला आव्हान देत भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एक खटला दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली, कारण त्यांच्या मते पूर्वीच्या परिषदांच्या निर्णय प्रक्रियेत संघाने मोठी भूमिका बजावली होती आणि हे आरक्षण पूर्णपणे धार्मिक भेदांवर आधारित नाही आणि म्हणूनच ते घटनाबाह्य नाही.[२२][२३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008" (PDF). 26 November 2008. 24 June 2021 रोजी पाहिले.
  2. 1 2 "32-Sangha constituency: Sikkim's intangible seat, where only monks contest and vote". 4 April 2019. 3 January 2021 रोजी पाहिले.
  3. ↑ "32-Sangha Assembly constituency - One of its kind in the country". ceosikkim.nic.in. 2019-08-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 January 2021 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 Hamlet Bareh, ed. (2001). Encyclopaedia of North-East India: Sikkim. 7. Mittal Publications. p. 16. ISBN 9788170997948.
  5. ↑ Tashi Namgyal (16 March 1958). "Proclamation of His Highness Sir Tashi Namgyal, KCSI, KCIE, Maharaja of Sikkim, Dated the 16th March, 1958" (PDF). p. 102. 16 June 2021 रोजी पाहिले.
  6. ↑ "Results of elections - 1958". Sikkim Darbar Gazette. 8. December 1958.
  7. ↑ Pem Choden Tenzing (July 2019). Monarchy to Democracy Understanding Political Development in Sikkim, 1970-1994 (Thesis). 2021-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-05-19 रोजी पाहिले.
  8. ↑ "Sikkim Darbar Gazette - Declaration of the Results of Election, 1970". 14 May 1970. pp. 59–60. 16 June 2021 रोजी पाहिले.
  9. ↑ Sunanda K Datta-Ray (1984). Smash And Grab - Annexation Of Sikkim. p. 166. 15 June 2021 रोजी पाहिले. ...they were supported by Peyching Lama, who had been elected un-contested from the monasteries...
  10. 1 2 3 S. Balakrishnan. "Viewpoint: 'Sangha' Constituency - Sikkim's Unique Seat". thephoenixpostindia.com. 19 January 2021 रोजी पाहिले.
  11. 1 2 AC Sinha. "Chapter 8: Sikkim" (PDF). ...election to the State Assembly were held in April, 1974. With exception of one Lepcha-Bhotia seat to a nominee of Sikkim National Party, the remaining 31 seats were captured by the newly formed Sikkim Congress.[permanent dead link]
  12. ↑ "Statistical Report on General Election, 1979 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 1 July 2021 रोजी पाहिले.
  13. ↑ "Statistical Report on General Election, 1985 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 30 June 2021 रोजी पाहिले.
  14. ↑ "Statistical Report on General Election, 1989 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 28 June 2021 रोजी पाहिले.
  15. ↑ "Statistical Report on General Election, 1994 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 27 June 2021 रोजी पाहिले.
  16. ↑ "Statistical Report on General Election, 1999 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 22 June 2021 रोजी पाहिले.
  17. ↑ "Statistical Report on General Election, 2004 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 14 June 2021 रोजी पाहिले.
  18. ↑ "Statistical Report on General Election, 2009 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 13 June 2021 रोजी पाहिले.
  19. ↑ "Statistical Report on General Election, 2014 to the Legislative Assembly of Sikkim". eci.gov.in. 12 June 2021 रोजी पाहिले.
  20. ↑ "State Election, 2019 to the legislative assembly of Sikkim". eci.gov.in. 17 January 2021 रोजी पाहिले.
  21. ↑ Joydeep Sen Gupta (6 April 2019). "Sikkim's Sangha Assembly seat is a perfect example of the state's unique political process to protect minority rights - Politics News". 19 January 2021 रोजी पाहिले.
  22. ↑ "R.C. Poudyal and ANR. Vs. Union of India and ORS" (PDF). main.sci.gov.in. 10 February 1993. 20 January 2021 रोजी पाहिले. ...that the Sangha constituted a vital and important role in the life of the community in Sikkim and had played a major part in taking of decisions by the Councils in the past. [...] The reservation of one seat for Sangha to be elected by an Electoral College of Lamaic monasteries is not based purely on religious distinctions and is, therefore, not unconstitutional as violative of Articles 15(1) and 325 of the Constitution.
  23. ↑ "R.C. Poudyal & ANR Vs. Union of India & Ors (1993) INSC 77 (10 February 1993)". www.latestlaws.com. 19 January 2021 रोजी पाहिले.