श्वेता गुलाटी
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | २९ मे 1979 |
| जन्मस्थान | मुंबई |
| व्यवसाय | अभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता |
| गट-प्रकार | पॉप संगीत |
श्वेता गुलाटी ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे, जी रिमीक्स (२००५) मधील टिया आहुजा आणि दिल मील गए (२००८) मधील डॉ. निकिता मल्होत्रा या भूमिकांसाठी ओळखली जाते.[१][२]
कारकीर्द
[संपादन]तिची पहिली जाहिरात प्रल्हाद कक्कड यांनी दिग्दर्शित केली होती. त्यानंतर तिला आणखी व्यावसायिक जाहिराती मिळाल्या. स्टार प्लसवरील शगुन या मालिकेमध्ये जुहीची भूमिका मिळाल्यावर तिच्या टेलिव्हिजन कारकिर्दीला सुरुवात झाली.[३]
एक टेलिव्हिजन अभिनेत्री म्हणून गुलाटीने क्यों होता है प्यार मधील आई-वडील गमावलेल्या आणि मावशींकडून वाईट वागणूक मिळालेल्या मुलीची भूमीका साकारली. नंतर रिमिक्स मधील सोन्यासारखं मन असलेली, लाडावलेली, फॅशनेबल, श्रीमंत मुलगी टिया आहुजा आणि अंबर धारा मधील सोनिया या तिच्या नकारात्मक भूमिकेपर्यंत विविध प्रकारच्या परस्परविरोधी भूमिका तिने साकारल्या आहेत. २००८ मध्ये, ती नवीन वैद्यकीय इंटर्न म्हणून दिल मिल गएमध्ये रुजू झाली.
शगुन मालिकेनंतर तिने क्यों होता है प्यार या युवा शोमध्ये तारा नावाच्या टॉमबॉयची भूमिका साकारली. स्टार प्लसवरील पर्दे के पीछे या शोचे सूत्रसंचालन करताना तिला पहिल्यांदा सूत्रसंचालनाचा अनुभव मिळाला, ज्यामध्ये टेलिव्हिजन कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकला जात असे. तिने झी टीव्हीवरील रोझ ऑडिओ व्हिज्युअल्स निर्मीत लिपस्टिकमध्ये एक नकारात्मक छटा असलेले पात्रही साकारले. त्यानंतर तिने रिमिक्समध्ये मुख्य भूमिका साकारली, जी १ नोव्हेंबर २००४ रोजी स्टार वनवर प्रदर्शित झाली. तेव्हा नव्याने सुरू झालेल्या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या पहिल्या काही कार्यक्रमांपैकी तो एक होता. रिमिक्स मध्ये १६ वर्षांच्या मुलीच्या भूमिकेसाठी तिला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्या मालिकेत रणवीर सिसोदियाची भूमिका साकारणाऱ्या, तेव्हा नवोदित असलेल्या अभिनेता करण वाहीसोबतचे तिचे कामही खूप गाजले.
रिमिक्सनंतर तिने एक चाबी... है पडोस में, मन में है विश्वास आणि दुर्गेश नंदिनी यांसारख्या विविध मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या. तिने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या अंबर धारा या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली. तिचा पुढचा प्रोजेक्ट किस किस बँग बँग ही स्त्री-पुरुष संघर्षावर आधारित एक सिटकॉम होती, जी बिंदास वाहिनीवर प्रसारित झाली. यामध्ये तिने रियाची भूमिका साकारली होती, जी एका जाहिरात एजन्सीमध्ये बिझनेस डायरेक्टर असते. अक्षय डोगराने साकारलेल्या तिचा सहकारी रोहनसोबतचा तिचा संघर्ष आणि संवाद हा या मालिकेचा गाभा होता. यात एका स्त्रीवादी आणि पुरुषसत्तावादी व्यक्तीमधील संघर्ष दाखवण्यात आला होता.[४]
तिने करण सिंग ग्रोव्हरसोबत जरा नचके दिखा या रिॲलिटी डान्स शोचे सूत्रसंचालनही केले. दिल मिल गये या वैद्यकीय मालिकेवर आधारित नाटकात इंटर्न डॉ. निकिता मल्होत्राच्या भूमिकेत तिने पुन्हा करण सिंग ग्रोव्हरसोबत काम केले. निकिता ही करण सिंग ग्रोव्हरने साकारलेल्या डॉ. अरमान मलिकची कॉलेजमधील मैत्रीण होती, जी हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर डॉ. अभिमन्यू मोदी (अमित टंडनने साकारलेली भूमिका) यांच्या प्रेमात पडते. २००९ मध्ये तिने सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कॉमेडी सर्कसच्या सहाव्या पर्वाचे आणि देख इंडिया देखचे सूत्रसंचालन केले. तिने २०१० च्या गोल्ड अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटचेही सूत्रसंचालन केले आहे.
२००९ मध्ये ती रोमिला मुखर्जी यांच्या डिटेक्टिव्ह नानी या विनोदी चित्रपटात नीती टिपणीसच्या भूमिकेत दिसली, ज्यात तिने एवा मुखर्जी, अंकुर नय्यर आणि अमित वर्मा यांच्यासोबत काम केले. तिने सब टीव्हीवरील जो बीवी से करे प्यार या मालिकेत सुहानीची भूमिकाही साकारली.
गुलाटीने ३१ ऑगस्ट २०२० रोजी प्रीमियर झालेल्या सब टीव्ही च्या तेरा यार हूँ मैं या मालिकेत जानवी राजीव बन्सलची भूमिका साकारली होती. पण एका अपघातात तिच्या पात्राचा मृत्यू होतो आणि त्यामुळे गुलाटी मालिकेतून बाहेर पडते. तिच्या पात्राची जागा सायंतनी घोषने साकारलेल्या दलजीत बग्गा या पात्राने घेतली आहे.[५]
संदर्भ
[संपादन]- ↑ Mulchandani, Amrita (19 July 2008). "Shweta: I wasn't married, eve". The Times of India (इंग्रजी भाषेत). 20 January 2021 रोजी पाहिले.
- ↑ Khan, Bushra (22 August 2011). "Shweta Gulati's beauty mantra". The Times of India. 20 January 2021 रोजी पाहिले.
- ↑ "इस एक्ट्रेस के पिता को कराया गया आईसीयू में भर्ती, घर में अचानक हो गए थे बेहोश". Amar Ujala (हिंदी भाषेत). 14 August 2019. 7 September 2020 रोजी पाहिले.
- ↑ "East meets West". The Hindu. 6 June 2008. 11 June 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Still Learning to be a Mother on Screen in Tera Yaar Hoon Main, Says Shweta Gulati". News18. 30 August 2020. 7 September 2020 रोजी पाहिले.