श्वेतशृंगी
श्वेतशृंगी
श्वेतशृंगी | |
|---|---|
|
तीर्थक्षेत्र | |
| गुणक: 17°01′30″N 74°24′00″E / 17.025000°N 74.399972°E | |
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र |
| जिल्हा | सांगली |
श्वेतश्रुंगी हे श्रीगुरुचरित्र या ग्रंथात उल्लेखलेले एक पवित्र तीर्थस्थान आहे. स्थानिक परंपरेनुसार ते नागठाणे, तालुका पलूस, सांगली जिल्हा, महाराष्ट्र येथील कृष्णा नदीच्या उत्तरवाहिनी तीराजवळील परिसराशी संबंधित मानले जाते. या भागात नदी काही अंतर उत्तरेकडे वाहते, आणि म्हणूनच स्थानिक श्रद्धेनुसार ते एक पुण्यप्रद तीर्थक्षेत्र आहे.[१]
धार्मिक संदर्भ
[संपादन]काही प्रदेशीय आवृत्त्यांमध्ये ‘‘श्रीगुरुचरित्र’’ (अध्याय १५, ओवी ८५–८६) मध्ये ‘‘श्वेतश्रुंगी’’ हे तीर्थ ‘‘उत्तरवाहिनी कृष्णा’’ नदीवरील म्हणून स्पष्ट उल्लेखिले आहे. मूळ ओवी पुढीलप्रमाणे आहे —[२]
कपिलऋषि विष्णुमूर्ति । प्रसन्न त्यासि गायत्री ।
श्वेतशृंगीं प्रख्याति । उत्तरवाहिनी कृष्णा असे ॥८५॥
तया स्थानीं स्नान करितां । काशीहूनि शतगुणिता ।
एक मंत्र तेथें जपतां । कोटीगुणें फळ असे ॥८६॥
यावरून श्वेतशृंगी हे कृष्णा नदीच्या उत्तरवाहिनी तीरावरील प्रसिद्ध तीर्थस्थान असल्याचे ग्रंथोक्त व परंपरागत दोन्ही अर्थाने सिद्ध होते.[३]
स्थान व भौगोलिक माहिती
[संपादन]- नदी: कृष्णा नदी
- स्थान: नागठाणे (श्वेतश्रुंगी), तालुका पलूस, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत. येथे कृष्णा नदी उत्तरवाहिनी होते, म्हणूनच हे क्षेत्र ‘श्वेतश्रुंगी तीर्थक्षेत्र’ म्हणून ओळखले जाते.
- निर्देशांक: 17.025000°N, 74.399972°E.
- स्थानिक नकाशे (Google Earth / Survey of India) आणि नदी प्रवाह अभ्यासानुसार नागठाणे परिसरात कृष्णा नदीचा एक छोटा उत्तराभिमुख वळण आढळते; हा वळण स्थानिक पातळीवर उत्तरवाहिनी म्हणून ओळखला जातो.[४][५]
धार्मिक संदर्भ
[संपादन]श्रीगुरुचरित्र (अध्याय १५) मध्ये कृष्णा नदीवरील अनेक तीर्थांची यादी दिलेली आहे; त्यात "श्वेतश्रुंगी" असा उल्लेख असून, "उत्तरवाहिनी कृष्णा तिरी" हे वर्णन आढळते. ग्रंथातील या उल्लेखावरून स्थानिक परंपरा व विद्वान हे संबध नागठाणे परिसराशी जोडतात.[६]
‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथात वर्णिलेल्या ‘उत्तरवाहिनी कृष्णा’ तीर्थाचा संदर्भ ह्याच श्वेतश्रुंगी परिसराशी जोडला जातो.[७][८]
- ^ "15". Shri Guru Charitra (Marathi भाषेत). Gita Press. 2017.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "गुरुचरित्र – अध्याय पंधरावा". Webdunia. 2025-11-12 रोजी पाहिले.
- ^ "गुरुचरित्र – अध्याय पंधरावा". Webdunia. 2025-11-12 रोजी पाहिले.
- ^ "Krishna River Profile". South Asia Network on Dams, Rivers and People. 2025-11-12 रोजी पाहिले.
- ^ "Google Earth – Krishna River northward bend near Nagthane". 2025-11-12 रोजी पाहिले.
- ^ "15". Shri Guru Charitra (Marathi भाषेत). Gita Press. 2017.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "गुरुचरित्र – अध्याय पंधरावा". Webdunia. 2025-11-13 रोजी पाहिले.
- ^ स्थानिक अभ्यासकांच्या मते व Google Earth नकाशांनुसार, उत्तरवाहिनी कृष्णा नदीचा वळण नागठाणे (श्वेतश्रुंगी) येथे आहे.
स्थानिक परंपरा
[संपादन]स्थानिक लोककथांमध्ये नदीकाठच्या पांढऱ्या खडी/शिलाशेपाशी संबंध दर्शविला जातो, म्हणून "श्वेतश्रुंगी" हे नाव (श्वेत = पांढरे, श्रुंग = शिखर) या भू-लक्षणाशी जोडले जाते. येथे स्थानिक तीर्थस्नान, दत्तअर्चना व श्राद्धकर्म करण्याची प्रथा आहे.