Jump to content

श्रुतकीर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shrutakarma (es); শ্রুতকীর্তি (bn); શ્રુતકીર્તિ (gu); Shrutakarma (ast); Шрутакирти (ru); श्रुतकीर्ती (mr); श्रुतिकीर्ति (mai); ଶୃତକୀର୍ତି (or); 输噜多吉哩底 (zh); श्रुतिकीर्ति (ne); श्रुतिकीर्ति (mag); శ్రుతకీర్తి (te); Srutakirti (id); 輸嚕多吉哩底 (zh-hant); ശ്രുതകീർത്തി (ml); Shrutakarma (nl); श्रुतकीर्तिः (sa); श्रुतिकीर्ति (hi); ಶ್ರುತಕೀರ್ತಿ (kn); ਸ਼ਰੂਤਕੀਰਤੀ (pa); শ্ৰুতকীৰ্তি (as); Shrutakarma (en); 输噜多吉哩底 (zh-hans); சுருதகீர்த்தி (ta) Sister of goddess sita (en); రామాయణం లో శతృఘ్నుని భార్య (te); देवी सीताके चचेरी बहिन आउ शत्रुघ्नके पत्नी (mag); देवी सीता की चचेरी बहन (hi); Sister of goddess sita (en); இராமாயண கதையில் வரும் சத்ருகனின் மனைவி (ta) श्रुतकीर्ति (mag); श्रुतकीर्ति (hi)
श्रुतकीर्ती 
Sister of goddess sita
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
वडील
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

श्रुतकीर्ती ही हिंदू महाकाव्य रामायणातील विदेहाची राजकुमारी आहे. ती शत्रुघ्नची पत्नी आहे आणि तिला देवी लक्ष्मीच्या चक्राचा अवतार मानले जाते.[] श्रुतकीर्ती तिच्या दूरदृष्टी आणि समर्पणासाठी ओळखली जाते.[] श्रुतकीर्ती ह्या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ "प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित" असा होतो.[]

आख्यायिका

[संपादन]

श्रुतकीर्तीचा जन्म राजा कुशध्वज आणि त्याची पत्नी चंद्रभागा यांची धाकटी मुलगी म्हणून झाला. ती मांडवीची धाकटी बहीण आहे.[][] तिचे वडील समकस्याचे शासक होते, परंतु श्रुतकीर्ती आणि मांडवी यांचे संगोपन सीता आणि उर्मिला यांच्यासह मिथिलामध्ये झाले. []

रामाने सीतेच्या स्वयंवरात तिचा हात जिंकल्यानंतर, त्याचे वडील, राजा दशरथ आपल्या मुलाच्या लग्नासाठी मिथिला येथे आले. तेव्हा लक्ष्मण- ऊर्मिला, भरत-मांडवी आणि शत्रुघ्न-श्रुतकीर्ती, अशे चारही बहिणींचे चार भावांशी लग्न जुळले, ज्यामुळे दोन्ही राज्यांमधील संबंध मजबूत झाले.[]

शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांना सुबाहू आणि शत्रुघटी असे दोन पुत्र होते. सुबाहू मथुरेचा राजा झाला तर शत्रुघटीने विदिशावर राज्य केले.[]


तुलसीदासांच्या रामचरितमानसातील एका आख्यायिकेनुसार, मांडवी व श्रुतकीर्ती तिच्या पतीसोबत सती गेली. उर्मिला तिच्या मुलाचे अंगद आणि चंद्रकेतू आणि सीतेचे पुत्र लव आणि कुश यांची काळजी घेण्यासाठी अयोध्येत राहिली.[]


पूजा

[संपादन]

तेलंगणातील मेदक जिल्ह्यात, श्री कल्याण रामचंद्र सन्नाधी नावाचे एक मंदिर आहे जे शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांना समर्पित आहे. हे मंदिर भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे रामाच्या भावांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत.[१०][११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Dawar, Sonalini Chaudhry (2006). Ramayana, the Sacred Epic of Gods and Demons (इंग्रजी भाषेत). Om Books International. ISBN 9788187107675.
  2. ^ Agarwal, Shubhi (20 April 2022). LakshmiLa : The Eternal Love Story. Om Books International. ISBN 978-93-92834-21-9.
  3. ^ www.wisdomlib.org (2015-09-21). "Shrutakirti, Śrutakīrti, Śrutakīrtī, Shruta-kirti: 11 definitions". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2022-08-03 रोजी पाहिले.
  4. ^ Prakāśa, Veda; Guptā, Praśānta (1998). Vālmīkī Rāmāyaṇa (इंग्रजी भाषेत). Ḍrīmalaiṇḍa Pablikeśansa. ISBN 978-81-7301-254-9.
  5. ^ "Sita's Sisters: Conversations On Sisterhood Between Women Of Ramayana". Outlook India. 26 October 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Ramayana | Summary, Characters, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 12 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-02-18 रोजी पाहिले.
  7. ^ Debroy, Bibek (2005). The History of Puranas (इंग्रजी भाषेत). Bharatiya Kala Prakashan. ISBN 978-81-8090-062-4.
  8. ^ "The Ramayana and Mahabharata: Conclusion". www.sacred-texts.com. 2020-08-07 रोजी पाहिले.
  9. ^ MacFie, J. M. (1 May 2004). The Ramayan Of Tulsidas Or The Bible Of Northern India. Kessinger Publishing. ISBN 978-1-4179-1498-2.
  10. ^ "Sri Kalyana Ramachandra Swamy temple: Small wonder on a hillock". Deccan Chronicle. 3 December 2017. 11 August 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 May 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "This unique Rama temple near Hyderabad where Hanuman finds no place". The News Minute (इंग्रजी भाषेत). 17 April 2016.