श्री कमलनयन स्वामी महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
नाशिक जिल्ह्यातील अंतापूर या गावी "सद्गुरू कमलनयन स्वामी महाराज" यांची संजीवन समाधी आहे. इ.स. १६८० ते १७५० हा त्यांचा कालखंड. अध्यात्म, आयुर्वेद, साहित्य, संगीत , निष्ठावंत भक्तीभाव इ. विविध अंगानी त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले होते. श्री उद्धव महाराजांचे ते पट्टशिष्य होते. {{संदर्भ हवा}}
  श्री लक्ष्मण शास्त्री वैद्य व माता शांतादेवी या पुण्यवान व भक्तीपरायण दांपत्याच्या पोटी स्वामींचा जन्म एका तेजस्वी यतीश्रेष्ठाच्या आशीर्वादाने झाला. बालपणीच त्यांनी वेद शास्त्र उपनिषदांचा सखोल अभ्यास केला. घराण्यात असलेली आयुर्वेद विद्या त्यांनी आत्मसात केली. औषधी वनस्पतींच्या माध्यमातून ते लोकसेवा करु लागले. दुर्मिळ अशी संजीवन विद्या ही त्यांनी प्राप्त केली. त्यांनी अनेक आसन्न मरणरुग्णाना जीवनदान दिले. आयुर्वेद चिकित्सा आणि औषधी वनस्पतींचा अभ्यास व संशोधन करून त्यांनी "नयन सुषेण" या ग्रंथाचे लेखन केले. {{संदर्भ हवा}}
  श्री स्वामी प्रतिभासंपन्न संतकवी होते. भाषा प्रभु होते. संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती, ब्रज व अहिराणी अशा विविध भाषातून त्यांनी अभंगावली, स्तोत्रे, आरत्या,  दोहे आदी स्वरुपातील साहित्य फार विपुल प्रमाणात लिहिले आहे. वृत्तबद्ध अशी ६५० च्यावर त्यांची अभंगरचना आहे. वामनचरित्र, प्रल्हाद चरित्र यासोबतच नामदेव आख्यान त्यांनी लिहिले आहे. बावन्न स्तोत्रे त्यांनी लिहिली. यापैकी गणपती स्तोत्र, पुष्पांजली स्तोत्र अत्यंत महत्वाची आहेत. हनुमानाची आरती प्रासादिक आहे. स्तोत्रावली व नयन बावनी ही सुंदर काव्य आहेत. एकूण वीस आरत्या त्यांनी लिहिल्या.{{संदर्भ हवा}}
  श्री कमलनयन स्वामी महान तपस्वी सिद्ध पुरुष होते. ते अकृराचे अवतार असल्याचे श्री उद्धवांनी स्वमुखाने सांगितले. त्यांनी श्रीमदभागवत ग्रंथातील तत्वे प्रत्यक्ष आचरणात आणलेली होती. संजीवन विद्यासंपन्न तर ते होतेच तसेच विविध प्रकारच्या दिव्य दुर्मिळ औषधी वनस्पतींचेही त्यांना ज्ञान होते.काव्य व साहित्य साधना अगाध होती.{{संदर्भ हवा}}

ज्ञानप्राप्तीसाठी व मोक्षमार्गाच्या वाटचालीसाठी सद्गुरूंना शरण गेले पाहिजे या वचनाप्रमाणे त्यांनी श्री उद्धवस्वामींचा अनुग्रह घेतला. समाजात सनातन संस्कृतीची तत्वे टिकून राहवीत म्हणून त्यांनी श्री बालकराम महाराज यांना तारकमंत्राचा उपदेश केला व गुरूगादी ची स्थापना केली.

 शके १६७२ मार्गशिर्ष शुध्द षष्ठी रात्री तिसऱ्या प्रहरात स्वामींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर स्वामींच्या चरणकमलांची स्थापना करण्यात आली.
  स्वामी कमलनयन महाराजांची तपश्चर्या, मानव सेवेची आस व श्रीरामचंद्रावरील निष्ठा यामुळे त्यांनी घालून दिलेल्या परंपरा व उत्सव आजपर्यंत नियमितपणे चालू आहेत. श्रीराम जन्मोत्सव, श्रीकृष्ण जन्मोत्सव, श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ, अन्नकुटोत्सव असे उत्सव भक्तीभावाने संपन्न होतात. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी व सप्तमीस संजीवन समाधी सोहळा असतो.याशिवाय भजन, पूजन, कीर्तन, हरिपाठ, नामस्मरण, गुरूमंत्राधिष्ठान, अन्नदान सतत चालू असते. {{संदर्भ हवा}}
  स्वामी समाधीस्थान अत्यंत प्रसन्न व रमणीय वातावरणात असून तेथे भक्तीभावाच्या सुखानंदाची प्रचिती येते. ज्ञानभक्तीचा नंदादीप संस्थानात गेल्या २६८ वर्षापासून आजपर्यंत अखंड तेवत 

{{संदर्भ

हवा}}

आहे....!!!