श्रीभानुदासमहाराज देगलूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


सद्गुरू श्रीभानुदास महाराज देगलूरकर , पंढरपूर

वारकरी संप्रदायचे अध्वर्यू - ज्येष्ठ कीर्तनकार / प्रवचनकार

सद्गुरू धुंडामहाराज देगलूरकर व सौभाग्यवती कृष्णाबाई अम्मा यांच्या तिसऱ्या अपत्याच्या रुपात महाराजांचा जन्म झाला .
चैत्र शुक्ल ८ , अंगिरानाम संवत्सर , शा.शके १९५४ , दि. ३ एप्रिल १९३२ हा महाराजांचा जन्मदिवस .

जीवन परिचय[संपादन]

भानुदास महाराज यांनी ‘जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले। म्हणूनि या विठ्ठले कृपा केली।।’ या अभंगाप्रमाणे धुंडा महाराज देगलूरकरांच्या ‘शुचिष्मंत श्रीमंत’ घराण्यात त्यांचा जन्म झाला. घरात धार्मिक वातावरण, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन सतत चालू असायचे. वै. जोग महाराज, वै. मामासाहेब दांडेकर, वै. अनंतराव आठवले यांच्यासारख्या विभूती घरी येत-जात. त्यामुळे त्यांची उपजत बुद्धीच भक्ती संप्रदायाकडे वळली.त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात कवठेकर प्रशालेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण हैदराबाद येथे झाले. ते बी.ए. एलएल.बी. झाले, पण ‘वकिलीत खऱ्याचे खोटे, खोटय़ाचे खरे’ असल्याने मन रमले नाही. वकिली सोडून ते विधि महाविद्यालयात प्राध्यापक झाले. इंग्रजीवर प्रभुत्व व कायद्याचा अभ्यास यामुळे त्यांचा नावलौकिक वाढत गेला, पण त्यांचे वडील ह.भ.प. धुंडा महाराज हे व त्यांची आई वृद्धत्वाकडे झुकत होती. त्यांची सेवा करण्याची जरुरी होती. त्यामुळे त्यांनी आई-वडिलांची सेवा करण्यासाठी मोठय़ा पगाराची व प्रतिष्ठेची नोकरी सोडली. भक्त पुंडलिकाचा आदर्श त्यांनी गिरविला. धुंडा महाराजांच्या उत्तर आयुष्यात भानुदास महाराजांनी आई-वडिलांची सेवा ज्या निष्ठेने केली, त्याला तोड नाही. महाराजांचा पत्रव्यवहार पाहणे, कार्यक्रम ठरविणे, ग्रंथांचे लेखन करणे, अभिप्रायासाठी आलेल्या ग्रंथांचे अभिप्राय लिहिणे, प्रस्तावना लिहिणे हे सर्व कार्य ते करीत होते. महाराज प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिथे कीर्तन व प्रवचनाला जाऊ शकत नव्हते, तिथे भानुदास महाराज कीर्तन व प्रवचन करीत असत.कायद्याच्या क्षेत्रातून ते एकदम आध्यात्मिक क्षेत्रात आले. मूळचे घराण्याचे संस्कार होतेच. त्यावर आता अभ्यासाने तेज चढू लागले. धुंडा महाराजांच्या रोजच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला बसून टिपणे काढणे. सकाळच्या आध्यात्मिक ग्रंथाच्या पाठाला उपस्थित राहात वे.शा.सं. गोपाळशास्त्री गोरे यांच्या घरी वेदान्त ग्रंथाचा अभ्यास केला. शांकरभाष्य, पंचदशी, अद्वैतसिद्धी, सर्वदर्शनसंग्रह, चित्सुखी तर्कसंग्रह या वेदान्तातील कठीणतम ग्रंथांचा अभ्यास त्यांनी आपल्या वडिलांजवळ, गोरेशास्त्री यांच्याजवळ केला. भाद्रपद महिन्यात देहूकरांच्या विविध फडांवर तुकाराम गाथेतील सर्व अभंगांचे भजन पारायण असते. तेथे सहभागी होऊन अभंगाच्या चाली आत्मसात केल्या. थोडय़ा कालावधीत वारकरी संप्रदायाच्या ग्रंथांचे त्यांनी अध्ययन केले. त्यामुळे अद्वैतसिद्धीतील ज्ञानाची लक्षणे संतांच्या अभंगाला लावून त्याचे सहजसुंदर विवेचन केले. मूळचीच त्यांची घराण्यातून प्राप्त झालेली आध्यात्मिक बुद्धी संतसंगतीने व अभ्यासाने परिष्कृत झाली. तिला तेज चढले.धुंडा महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनावरून त्यांनी चार-पाच अध्यायांचे लेखन केले. महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रवचनावर सात प्रवचने केली. त्याचे पुस्तक करण्याचे कार्य त्यांनी केले. या काळातील महाराजांच्या बहुतेक ग्रंथांचे लेखन त्यांनी केले.भानुदास महाराजांची वाणी सौम्य, चंद्रासारखी शीतल होती. तिला व्यासंगामुळे तेज चढले होते. त्यांचे इंग्रजी ग्रंथांचे वाचन खूप असल्याने पाश्चात्त्य विचारवंतांची वचने ते विपुल प्रमाणात देत असत. त्यांचे व्यक्तिमत्त्व देखणे व सात्त्विक होते. गोरापान वर्ण, चेहऱ्यावर सात्त्विक तेज, ओघवती वाणी यामुळे श्रोत्यांवर छाप पडत असे.धुंडा महाराजांनंतर त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र कीर्तने, प्रवचने केली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेतला. औसेकर महाराजांच्या काशीच्या सप्ताहात दोन वेळा ते कीर्तनासाठी गेले.आई-वडिलांची सेवा त्यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत केली. ते पुंडलिकाचे खरे भक्त शोभतात. चंद्रमे जे अलांछन। मरतड जे तापहीन।। या माउलींच्या शब्दांत त्यांचे वर्णन केले तर सार्थ होईल .