श्रीगमा पुरस्कार
’माणूस’ या मराठी साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर याच्या स्मरणार्थ इ.स. १९९८ सालापासून दरवर्षी श्रीगमा स्मृति पुरस्कार देण्यात येतो.. २१हजार रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. पुरस्काराचे पूर्ण नाव ’श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार’ असे आहे. नावावरूनच हा पुरस्कार सामाजिक चळवळीत असामान्य काम करणाऱ्या व्यक्तीसाठी आहे हे स्पष्ट व्हावे. स्वतः श्री. ग. माजगावकर यांनी आपल्या लेखणीद्वारे इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लढा दिला होता. त्यामुळे, खरे तर बहुतेक वेळा हा पुरस्कार ग्रामीण विकास आणि विकासात्मक पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्यांनाच देण्यात येतो. अशा व्यक्तीला, ‘माणूस प्रतिष्ठान’तर्फे दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी, म्हणजे श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिदिनी, हा पुरस्कार प्रदान केला जातो.
आत्तापर्यंतच्या श्रीगमा पुरस्कारप्राप्त व्यक्ती
[संपादन]- इ.स. २००२ - महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (MASUM) पुणे/सासवड/राळेगण सिद्धी
- इ.स. २००९ - अगस्ती ग्रामीण शिक्षण संस्था अकोले(जिल्हा अहमदनगर)चे सल्लागार, दिशा फौंडेशनचे सचिव व बहिरवाडीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक पत्रकार भाऊसाहेब सखाराम चासकर यांना
- इ.स. २०१० - सातारा येथील श्रमजीवी जनता सहायक मंडळ या संस्थेस
- इ.स. २०११ - नांदेड जिल्ह्यामधील लोहा तालुक्यातील ‘लोकसत्ता’चे वार्ताहर हरिहर धुतमल यांना
- इ.स. २०१२ - चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांच्या 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्' या संस्थेला
- इ.स. २०१३ - पर्यावरण चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते दिलीप कुलकर्णी यांना
पहा : श्री. ग. माजगावकर