श्री.बा. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीकृष्ण बापूराव जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीकृष्ण बापूराव जोशी (जन्म : १८ जून, १९३० निधन १७ मार्च २०२१) हे मराठी भाषेतील एक बहुश्रुत लेखक . ज्ञानकोश आणि शब्दकोश यामधला एक वेगळाच स्फुटलेखनाचा प्रकार त्यांनी आपल्या नियमित सदरलेखनात वापरला आहे.[१]

शिक्षण[संपादन]

श्री.बा. यांनी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर कोलकात्याच्या राष्ट्रीय ग्रंथालयातून १९५७ साली डिप. लिब ही ग्रंथालयशास्त्रातली पदवी घेतली.[१]

राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकाता[संपादन]

श्री.बा. यांनी राष्ट्रीय ग्रंथालयात नोकरी केली. सन १९८८ साली ते संपादक, मराठी विभाग, राष्ट्रीय ग्रंथालय येथून निवृत्त झाले.

साहित्य[संपादन]

अनुवादित[१][संपादन]

अन्य भाषांतून मराठीत[संपादन]

  1. कपिलाकाठची कहाणी ( मूळ - नवकांत बारुआ यांच्या असमिया भाषेतील कांदबरी), नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली, १९७७.
  2. बादशाही अंगठी ( मूळ - सत्यजीत राय यांची मूळ बाङ्ला भाषेतील फेलूदा-कथा), किर्लोस्कर प्रेस,पुणे, १९८०.
  3. बंकीमचंद्र चतर्जी ( मूळ - सुबोधचंद्र चतर्जी यांचे मूळ इंग्रजी पुस्तक), साहित्य अकादमी, दिल्ली, १९८०.
  4. अंत नाही व प्रलाप ( मूळ- बादल सरकार यांचे ' शेष नई व प्रोलाप ' या नाटकाचा मुळ बाङ्ला नाटक).

मराठीतून बाङ्लाभाषेत[संपादन]

  1. चोप, अदालत चोल छे (मूळ - विजय तेंडूलकर यांचे 'शांतता, कोर्ट चालू आहे' हे मराठी नाटक) सहाय्यक-नीतीश सेन.

स्फुटलेखसंग्रह[संपादन]

  1. संकलन, प्रका- सर्जेराव घोरपडे, प्रेस्टिज प्रकाशन, पुणे-३०, मु. - सर्जेराव घोरपडे, प्रिंटेक्स्ट, पुणे-३०, १ली, १९८५, पाने २०+२४०.
  2. गंगाजळी १, प्रका - अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई-४, मु.- संतोष पाटील, अश्विनी ग्राफिक्स, पुणे, १ली, २००४,
  3. गंगाजळी २, प्रका - अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई-४, मु.- संतोष पाटील, अश्विनी ग्राफिक्स, पुणे, १ली, २००६,
  4. गंगाजळी ३, प्रका - अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई-४, मु.- संतोष पाटील, अश्विनी ग्राफिक्स, पुणे, १ली, नोव्हेंबर २००७, पाने १४+१९४.
  5. गंगाजळी ४, प्रका - अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई-४, मु. - संतोष पाटील, अश्विनी ग्राफिक्स, पुणे, १ली, ५ मे २००९, पाने ६+२०६.
  6. उत्तम मध्यम, प्रका- अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे-३८, मु.- श्रीबालाजी एंटरप्रायजेस्,पुणे-४१, १ली, १ एप्रिल २०१०, पाने २४०.

सन्मान[संपादन]

मॅजेस्टिक प्रकाशनाकडून देण्यात येणाऱ्या 'ग्रंथोपासक' या पुरस्काराचे पहिले मानकरी, ५ मे २००९.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c श्री.बा.जोशी, उत्तम मध्यम, समाविष्ट- लेखक परिचय, पद्मगंधा प्रकाशन, पुणे-३८, १ली, २०१०, २४०.