श्रीकांत जेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रीकांत जेना (जून १८, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील कटक लोकसभा मतदारसंघातून आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील केंद्रपाडा लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.त्यांनी एच.डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल सरकारमध्ये संसदीय कार्यमंत्री म्हणून काम बघितले. नंतरच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून ओडिशा राज्यातील बालासोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.