श्रीअरविंद आश्रम (दिल्ली शाखा)
श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा ही श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी यांची एकमेव शाखा आहे. १२ फेब्रुवारी १९५६ रोजी या शाखेची स्थापना झाली. श्रीमाताजी यांचे आशीर्वाद या शाखेला लाभले आहेत.[१] सध्या या आश्रमाची जबाबदारी पद्मश्री प्राप्त तारा जौहर सांभाळत आहेत.
स्थापना
[संपादन]या आश्रमाच्या स्थापनेमध्ये श्री. सुरेंद्रनाथ जौहर यांचा मोठा वाटा होता. स्थापनेनंतर अल्पावधीतच म्हणजे ०५ डिसेंबर १९५७ रोजी या आश्रमामध्ये श्रीअरविंद यांच्या स्मृती-अवशेषांची (Relics) स्थापना करण्यात आली. श्रीमाताजींनी या शाखेला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला. [१]
अन्य कार्य
[संपादन]आश्रमाच्या स्थापनेच्या वेळी, तेथे श्रीमाताजींच्या संकल्पनेनुसार एका शाळेचीही स्थापना केली.[२] शाळा स्थापनेची तारीख २३.४.५६ अशी वैशिष्ट्यपूर्ण होती. १९७१-७२ साली या शाळेचे नामकरण द मदर्स इंटरनॅशनल स्कूल असे करण्यात आले.नंतर पुन्हा त्याचे नामकरण झाले, तेव्हा श्रीअरविंद एज्युकेशन सोसायटी असे नाव निश्चित करण्यात आले.[१]
अधिकृत संकेतस्थळ
[संपादन]https://sriaurobindoashram.net/
संदर्भ
[संपादन]- ^ a b c My Mother - (श्रीमाताजी यांच्याशी संबंधित १०१ आठवणी) प्रकाशन - श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा, प्रथम आवृत्ती - १९८२, चौथी आवृत्ती - २०२१, ISBN:978-81-952762-5-7
- ^ "Read Surendranath Jauhar's correspondence with The Mother". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-12-25 रोजी पाहिले.
