Jump to content

श्रीअरबिंदोज ॲक्शन (इंग्रजी नियतकालिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीअरबिंदोज ॲक्शन - श्रीमाताजींच्या प्रेरणेने श्रीअरबिंदोज ॲक्शन या नावाच्या सोसायटीची १७ जून १९७० रोजी स्थापना करण्यात आली.[]

उद्देश

[संपादन]

श्रीअरबिंदोज ॲक्शनचे एकमेवाद्वितीय ध्येय म्हणजे देश - भारत हे आहे. "भारताला स्वतःच्या स्वातंत्र्याचे रक्षण करावे लागेल. भारताला स्वतःचे रक्षण करावे लागेल. भारताला स्वतःची पुनर्रचना करावी लागेल, असा संदेश श्रीमाताजींनी याच्या स्थापनेच्या निमित्ताने दिला होता.[]

कार्य

[संपादन]

श्रीअरविंद यांनी भारताच्या विविध समस्यांना तोंड देण्यासाठीचे उपाय वेळोवेळी सांगितले आहेत. ते विविध भारतीय भाषांमधून प्रकाशित करून भारतीय जनसमुदायांपर्यंत पोहोचविणे हे या सोसायटीचे व पर्यायाने नियतकालिकाचे कार्य आहे.

शाखा

[संपादन]

२००६ साली या सोसायटीच्या प.बंगाल शाखेची स्थापना करण्यात आली.[]

संस्थापक सदस्य

[संपादन]

श्रीमाताजी या सोसायटीच्या कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रद्योत, उदार पिंटो आणि श्यामसुंदर झुनझुनवाला यांची अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

मुखपत्र

[संपादन]

श्रीअरबिंदोज ॲक्शन या नावाने या संस्थेचे मुखपत्र प्रकाशित केले जाते. ते विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जाते. ऑक्टोबर १९७० मध्ये याचा पहिला अंक प्रकाशित झाला. त्याचे संपादक म्हणून श्री.मनोज दास यांनी एप्रिल १९७३ पर्यंत जबाबदारी सांभाळली. त्यानंतर श्री.श्यामसुंदर झुनझुनवाला यांनी संपादक-पदाची जबाबदारी सांभाळली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "Sri Aurobindo's Action - The Beginning". www.sriaurobindosaction.org. 2025-08-29 रोजी पाहिले.